ADVERTISEMENT
home / Fitness
योगासनांचा सराव सुरू करताय, मग या गोष्टी  जरूर लक्षात ठेवा

योगासनांचा सराव सुरू करताय, मग या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

आजकाल दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रदूषण, कामाचा अती ताण, नातेसंबधांमधील दूरावा, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचा तुमच्या शरीर आणि मनावर नकळत परिणाम होत असतो. आजारपण आणि मानसिक विकारांपासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करणं आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीसाठी दररोज योगासनांचा सराव केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. योगासनांंमुळे शरीर आणि मन निरोगी आणि सुदृढ होते.आयुर्वेद शास्त्रात योगासने आणि त्याचे महत्त्व सांगितलेले आहे. दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासनांचा सराव केल्यास शरीर सुदृढ आणि मन निवांत राहते. योगासने ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ नक्कीच मिळू शकते. मात्र योगासनांचा सराव नेहमी सकाळी उठल्यावर अथवा सायंकाळी दोन ते तीन तास उपाशी राहून करणं गरजेचं आहे. शिवाय योगासनांचा सराव हा नेहमी एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या मदतीनेच करावा. यासाठीच जर तुम्ही पहिल्यांदा योगासने करत तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. 

जाणून घ्या योगासने करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

  • योगासने करण्यापूर्वी कमीत कमी तीन ते चार तास कोणताही जड आहार घेऊ नका. यासाठीच सकाळी योगासने करावीत. मात्र जर तुम्हाला संध्याकाळी योगासने करायची असतील तर त्याआधी दोन ते तीन तास काहिही खाऊ नका.
  • योगासने करताना नेहमी आरामदायक आणि सैलसर कपडे वापरा. तंग कपडे घातल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे योगासनाचे फायदे मिळत नाहीत.
  • योगासनांंचा सराव नेहमी मोकळ्या आणि हवेशीर ठिकाणी करा. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळू शकेल. जर तुमच्या घरात बाल्कनी अथवा गच्ची नसेल तर तुम्ही खोलीच्या खिडक्या उघड्या ठेऊन योगासने करू शकता.
  • योगासनांचा सराव हा नेहमी तज्ञ व्यक्तीच्या देखरेखीखाली करा. आसन चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. 
  • योगासने करण्यापूर्वी पाणी पिऊ नका. कारण योगासने करण्यापूर्वी पाणी पिण्याने तुम्हाला सर्दी, खोकला, कफ, अलर्जीचा त्रास होऊ शकतो.
  • योगासने सकाळच्या वेळी करणं नेहमीच फायदेशीर ठरतं. मात्र योगासने करण्यापूर्वी तुम्ही शौचविधी आधीच करणं गरजेचं आहे. कारण असे न केल्यास योगासनांमधील कठीण आसने करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो.
  • जर तुम्ही पहिल्यांदाच योगासनांचा सराव करणार असाल तर आधी साधी आणि सोपी आसने करा. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुम्हाला योगासने करण्याचा कंटाळा येणार नाही. 
  • योगासने नेहमी जमिनीवर आसन घेऊन करावीत. बेड अथवा सोफ्यावर बसून योगासनांचा सराव केल्याने फायदा होणार नाही.
  • योगासने केल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे योगासने केल्यावर लगेचच अंघोळ करू नये. योगासनांचा  सराव केल्यावर एक तासाने तुम्ही अंघोळ करू शकता.
  • योगासने नेहमी एका विशिष्ठ ठिकाणीच करावीत. वारंवार योगासनाचे ठिकाण बदलू नये
  • योगासने करताना नेहमी ते आसन घेऊनच करावे. थेट जमिनीवर योगासनांचा सराव करू नये.
  • एखादे आसन केल्यावर जर तुम्हाला त्रास होत असेल तर याबाबत तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. 
  • मासिक पाळीच्या काळात कठीण आसने करू नका.
  • जर तुम्ही आजारी असाल तर त्या काळात योगासने करू नका. कारण या काळात योगासने केल्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो.

अधिक वाचा

महिलांसाठी प्रेरणादायी संदेश

ADVERTISEMENT

#internationalyogaday निरोगी जीवनशैलीसाठी नियमित करा ‘ही’ योगासने

निरोगी राहण्यासाठी आणि चिरतरूण दिसण्यासाठी फिटनेस टीप्स (Fitness Tips For Women In Marathi)

वेटलॉससाठी करून पाहा ‘ही’ योगासनं (Yoga For Weight Loss In Marathi)

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT
28 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT