राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची भीती असते.  काही व्यक्ती ही भीती बोलून दाखवतात तर काही व्यक्तींना भीती बोलून दाखवायला लाज वाटते. बरेचदा आपल्याला असणाऱ्या भीतीकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पण बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या व्यवहारातून ही भीती दिसून येत असते. तुम्हाला जर विचारण्यात आलं की, तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते, तर तुम्हाला जरी याचं उत्तर द्यावंसं वाटत नसलं तरीही ग्रह आणि राशीनुसार तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींची भीती वाटते हे समजून घेता येतं. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना असते कोणत्या गोष्टींची भीती - 

मेष (21 मार्च - 19 एप्रिल)

GIPHY

या राशीच्या व्यक्तींना साहस खूपच प्रिय आहे. पण त्याचबरोबर त्यांना शांततेचीही गरज भासते. तुमच्या व्यक्तिमत्वाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुमचा प्रेमळ आणि समजून घेणारा स्वभाव. तुम्हाला नेहमी या गोष्टीची भीती वाटत राहते की, कोणत्याही नात्यापासून तुम्ही दुरावले जाऊ नये. कंटाळवाणं आयुष्य जगण्याची तुम्हाला मनापासून भीती वाटते. 

वृषभ ( 20 एप्रिल - 20 मे)

GIPHY

तुम्ही स्वतःच्या दुनियेमध्ये अत्यंत आनंदी राहणाऱ्या व्यक्ती आहात. पण यामध्ये थोडासाही बदल झाल्यास तुम्हाला त्रास व्हायला लागतो. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर तर पडावं लागणार नाही ना? हीच तुमची सर्वात मोठी भीती आहे. तुम्हाला माहीत आहे की, तुम्हाला नक्की काय हवं आहे. पण ती गोष्ट तुम्हाला न मिळाल्यास, तुमची बेचैनी वाढत जाते आणि भीतीही. 

मिथुन (21 मे - 21 जून)

GIPHY

आयुष्यात एकटेपणा ही सर्वांनाच वाटणारी भीती आहे. तुम्ही स्वतःला नीट भावना व्यक्त न करण्याची भीती वाटत राहाते. तसंच आपल्या पॅशनच्या मागे धावण्याचीही तुम्हाला भीती वाटते. आव्हानं तुम्हाला आवडतात, पण याचा सामना करण्याची मात्र तुम्हाला भीती असते. तुम्हाला प्रत्येक कामात परफेक्शन हवं असतं. पण हे काम व्यवस्थित होईल की नाही याचीदेखील तुमच्या मनात सतत भीती वाटत राहाते. त्यामुळे हे काम पूर्ण होणार असेल तरीही ते अर्धवट राहातं. 

कर्क (22 जून - 22 जुलै)

GIPHY

कोणत्याही प्रकारचा नकार तुम्हाला पचनी पडत नाही. कोणाकडूनही नकार येणं ही तुमची सर्वात मोठी भीती आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनी तुमचे लाड करावेत आणि तुमच्यावर प्रेम करावं ही तुमची अपेक्षा असते. अचानक आपल्याबरोबर कोणीच नाही आणि आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही याचा विचारही तुम्हाला भीतीदायक वाटतो. त्यामुळे यापासून दूर राहणंच तुम्ही पसंत करता. 

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

GIPHY

तुमची जागा कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येईल याचा विचारही तुमच्यासाठी भीतीदायक आहे. मग ही गोष्ट नात्यात असो अथवा प्रोफेशनली. तुम्ही कोणाच्याही विश्वासाला नक्कीच पात्र ठरता पण तरीही आपल्याकडे कोणी दुर्लक्ष तर करत नाही ना याची तुम्हाला सतत भीती जाणवत राहाते. तुम्ही केलेल्या चांगल्या कामासाठी जर तुमचं कौतुक झालं नाही आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करत आहात, त्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केल्यास, तुम्हाला सहन होत नाही. या गोष्टीचीदेखील तुम्हाला भीती वाटत राहते. 

कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

GIPHY

तुम्हाला प्रत्येक काम हे व्यवस्थित करायलाच आवडतं. पण तुम्हाला नेहमी ही भीती वाटत राहाते की, तुमच्याकडून कामात कोणतीही चूक घडायला नको. त्याशिवाय तुम्हाला ज्यांच्याबरोबर बोलायचं आहे अथवा ज्या व्यक्तींपर्यंत तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे, त्यांच्यापर्यंत बोलणं पोहचवल्यानंतरही त्यावर नीट लक्ष देण्यात येईल की नाही याचीदेखील तुम्हाला भीती वाटत राहाते. असं झालं तर पुढे तुम्ही काय करणार हा प्रश्न तुमच्यासमोर आधीच उभा राहतो. 

तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

GIPHY

शांतता आणि तडजोड हे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. तुम्हाला भांडण करणं अजिबातच आवडत नाही. तुम्हाला नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवायला आवडतं. त्यामुळे तुमच्यावर तुमच्या जवळच्या व्यक्ती नाराज तर होणार नाहीत ना ही सर्वात मोठी भीती तुमच्या मनात असते. तुमच्यामुळे कोणाला दुःख होऊ नये अथवा त्रास होऊ नये याची काळजी तुम्हाला वाटत राहाते. 

वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

GIPHY

या राशीच्या व्यक्ती अतिशय सहनशील असतात. पण जेव्हा भावनांची गोष्ट असते, तेव्हा तुम्ही त्या जपून ठेवणं गरजेचं समजता. खोटे दिखावे करणं या राशीच्या व्यक्तींंना मान्य नाहीत आणि कोणत्याही प्रयत्नात अशयस्वी होण्याची भीती या व्यक्तींना त्रासदायक वाटते. तुमच्या भावना आणि असुरक्षितेबद्दल ज्या व्यक्ती जाणतात, त्याच व्यक्तींची तुम्हाला जास्त भीती वाटते की, त्यांच्याकडून तुम्ही फसवले तर जाणार नाही ना? कारण बऱ्याचदा या व्यक्तींच्या जवळची माणसंच यांच्या भावनांचा फायदा उचलतात. 

धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

GIPHY

तुम्हाला स्वातंत्र्य अतिशय जवळचं आहे. तुमच्याकडे भरपूर उत्साह असतो आणि स्वबळावर काहीही करण्याची तयारी असते. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्यावर कोणी जबरदस्ती तर करणार नाही ना अथवा आपल्याला कोणी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना याची भीती वाटत राहाते. या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं बंधन आवडत नाही. या व्यक्ती आपल्या अटी आणि शर्तींवर जगतात. 

मकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

GIPHY

या व्यक्ती प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात पण त्याचबरोबर या व्यक्ती प्रॅक्टिकलदेखील असतात. प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाचं ऐकूनच या व्यक्ती काम करतात. आपण ज्या कामामध्ये आपला उत्साह दाखवत आहोत, ते काम यशस्वी होईल की नाही याची या व्यक्तींना नेहमी भीती वाटत राहाते. त्यामुळे बरेचदा हातात घेतलेलं काम कमी आत्मविश्वासामुळे पूर्ण होत नाही. 

कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

तुम्हाला लोकांची मदत करणं आणि त्यांच्या कठीण काळात साथ देणं या दोन्ही गोष्टी आवडतात. पण कोणाच्याही आयुष्यात तुम्ही पर्याय म्हणून राहावं ही गोष्ट कदापिही तुम्हीला मान्य नाही. तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल काळजी करता, त्यांनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यात दूर करणं तुम्हाला सहन होणार नाही आणि तुम्हाला सर्वात मोठी भीती याच गोष्टीची वाटत राहाते.  

मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

GIPHY

तुम्हाला प्रशंसा जास्त आवडत नाही. या गोष्टीची जास्त भीती वाटते.  तुम्ही अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्तीमत्व आहात. कोणाचाही सामना करणं अथवा कोणालाही विरोध करण्याची तुम्हाला भीती वाटते. व्यक्तींना समजून घेणं आणि इतरांना चुकीचं समजून तर नाही ना घेणार याचीदेखील भीती या व्यक्तींना वाटत राहाते.