चेहऱ्यावर चमक (Glow) आणण्यासाठी ट्राय करा 10 आयुर्वेदिक स्किन केअर नियम

चेहऱ्यावर चमक (Glow) आणण्यासाठी ट्राय करा 10 आयुर्वेदिक स्किन केअर नियम

मुंबईमध्ये उन्हाळा असो वा पावसाळा कायम गरम होत असतं. याच उकाड्यामुळे सर्वात जास्त नुकसान होतं ते आपल्या चेहऱ्याच्या त्वचेचं. सतत उकाडा, त्यात होणारी धावपळ या सगळ्यामुळे दिवसभर थकायला होतं आणि त्याचा परिणाम शरीर आणि सर्वात जास्त होतो तो म्हणजे चेहऱ्यावर. तसंच सूर्याची किरणं डायरेक्ट चेहऱ्यावर येत असल्यामुळे होणारं टॅनिंग, सनबर्न, खाज, रॅश हे सर्व साहजिकच होत असतं. पण अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल तर मदत करतं ते आयुर्वेद. अशावेळी त्वचा मऊ ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास 10 आयुर्वेदिक नियम सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही नेहमी तुमची त्वचा चमकदार ठेऊ शकता. 

1. हर्बल सनस्क्रिनची गरज

उन्हात अथवा अगदी पावसातही घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हर्बल सनस्क्रिन लावणं अत्यंत आवश्यक आहे. कारण यामधील घटक तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या सूर्याच्या किरणांपासून रक्षण करतात.

आयुर्वेदिक टीप्समुळे तुमच्या त्वचेला चांगला ग्लो येऊ शकेल

2. त्वचेला करा कव्हर

तुमची त्वचा डायरेक्ट सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येईल यापासून काळजी घ्या. कारण तसं झाल्यास, तुम्हाला सनबर्न आणि सनटॅनचा नक्कीच त्रास होतो. त्यामुळे तुमचा चेहरा तुम्ही ऊन असतातना दुपट्टा अथवा एखाद्या स्कार्फने व्यवस्थित कव्हर करा. 

2. त्वचेला करा कव्हर

3. नेहमी हायड्रेटेड राहा

तुमच्या चेहऱ्यावर नेहमी चमक असण्यासाठी तुमची त्वचा नेहमी हायड्रेटेड असणं आणि मॉईस्चराईज असणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवसभर तुम्ही खूप पाणी पित राहा. पण त्याची अतिशयोक्ती करू नका. तुमच्या शरीराला आवश्यक असणारं साधारण ८ ग्लास पाणी तुमच्या पोटात दिवसभर जाणं आवश्यक आहे.

4· साबणाच्या जागी वापरा सॉफ्ट क्लिंन्झर

4· साबणाच्या जागी वापरा सॉफ्ट क्लिंन्झर

तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्ही साबणाचा वापर करणं शक्यतो टाळा. कारण त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी पडते. त्यासाठी रोज तुम्ही हर्बल अथवा सॉफ्ट क्लिंन्झरचा वापर करा. तसंच तुम्ही तुमच्या त्वचेवर रोज मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. 

5. कोरफड जेल आहे अप्रतिम

5. कोरफड जेल आहे अप्रतिम

आंघोळ केल्यानंतर तुम्ही तुमच्या त्वचेवर कोरफड जेल लावल्यास तुमची त्वचा अगदी तुकतुकीत आणि मॉईस्चराईज्ड होते. तुमची त्वचा कोरडी असल्यास, तुम्ही घरगुती उपायदेखील फॉलो करू शकता. त्यासाठी तुम्हाला पपई अथवा अव्होकॅडो घेऊ त्यात काही थेंब लिंबाचा रस घालावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या कोरड्या त्वचेवर हे मिश्रण रोज लावा. साधारण 10-15 मिनिट्सने चेहरा थंड पाण्याने धुवा. यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक नक्कीच दिसून येईल. 

6· कच्चं दूध आहे नैसर्गिक क्लिंन्झर

6· कच्चं दूध आहे नैसर्गिक क्लिंन्झर

कच्चं दूध हे नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय आहे. एक चमचा दूध घेऊन त्यात कापूस बुडवा आणि त्याने तुमचा चेहरा नीट साफ करून घ्या. नंतर तसंच साधारण 15 मिनिट्स हे दूध चेहऱ्यात मुरू द्या. नंतर पुन्हा चेहरा पाण्याने धुऊन घ्या. 

7· नियमित बेडटाईम रूटिन

आयुर्वेदानुसार चांगल्या त्वचेसाठी तुम्हाला नियमित बेडटाईम रूटिन फॉलो करणंं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही रोज सकाळी 10-15 मिनिट्स व्यायाम, भरपूर पाणी पिणं, ताजी फळं खाणं आणि भाजी खाणं हे करायला हवं. तसंच जंक फूड, तेलकट आणि मसालेदार खाणं टाळायला हवं. 

7· नियमित बेडटाईम रूटिन

सूर्यकिरण आपल्या त्वचेला विटामिन डी मिळवून देतात. पण जर हे विटामिन डी जास्त झालं तर आपली त्वचा टॅन होऊ लागते आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेचा रंग बदलण्यात होतो. यालाच सनटॅन असं म्हणतात. सनटॅनची समस्या सध्या कॉमन आहे. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी तुम्ही संपूर्ण रात्र आपल्या शरीरावर कोरफड जेल (घरच्या कोरफडचं ताजं जेल) लावून ठेवा आणि सकाळी आंघोळ करताना स्वच्छ करा. याचा तुम्हाला फायदाच होतो.

8. सन- टॅन पासून करा बचाव

9. गुलाबपाणी डीटॅन मिक्स्चर

याशिवाय तुम्ही गुलाबपाण्यात बेसन मिसळा. ही  पेस्ट तुमची त्वचा सुंदर करण्यास आणि तुमच्या शरीरावरील डीटॅन काढून टाकण्यासाठी उपयोगी आहे. ही लावल्याने तुमचं टॅन हळूहळू निघून जाईल. हे मिश्रण तुम्ही तुमच्या मान, चेहरा आणि हातावर लावून साधारण  20 मिनिट्स रोज लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा. त्वचा चमकदार होते. 

10. बदाम, मध आणि दूध

10. बदाम, मध आणि दूध

याशिवाय तुम्ही हा उपायदेखील करून पाहू शकता. बदाम  वाटून त्यात मध आणि दूध मिसळून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट आंघोळीच्य आधी काही मिनिट्स तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि मग साध्या पाण्याने तोंड धुऊन घ्या. यामुळेदेखील तुमचा चेहरा चमकदार राहातो.