कपड्यांची खरेदी (Shopping) करताना चुकीचे कपडे खरेदी करण्याऐवजी तुम्ही काही योग्य गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. काही महिला ज्यांच्या कपड्यांची साईज प्लस असते त्या कपड्यांची खरेदी करताना सहसा जास्त चुका करतात. कारण आपले curves योग्य तऱ्हेने दाखवून बॅलेन्स करण्याऐवजी ते लपवण्यासाठी कपड्यांचा वापर जास्त केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? Full figured अर्थात ज्यांची साईज प्लस आहे अशा महिलादेखील फॅशनेबल आणि ट्रेंडी आऊटफिट नक्कीच घालू शकतात. याबद्दलच आम्ही तुम्हाला काही बेसिक टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराबद्दल लाज वाटणं सोडून देऊन आपलं शॉपिंग अधिक मजेशीर बनवाल आणि अधिक मॉडर्न कपडे घालायला लागाल. चला तर मग चालू करूया “प्लस साईज फॅशन मंत्रा”
शॉपिंग करताना जर तुम्ही विचार करत असाल की, तुमच्यावर कोणतेही कपडे चांगले दिसत नाहीत किंवा माझं वजन जास्त आहे तर माझं शरीर झाकण्यासाठीच मला कपडे खरेदी करायचे आहेत. तर असा विचार करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण असा विचार करत असाल तर तुम्ही कधीच शॉपिंग करू शकणार नाही. त्यामुळे आपल्या शरीराची लाज बाळगण्यापेक्षा तुम्ही तुमचं शरीर व्यवस्थित जाणून घ्या आणि मग तुमचा कोणता भाग जास्त सुंदर दिसेल हे तुम्हाला कळेल त्याप्रमाणे तुम्ही कपड्यांची खरेदी करा.
जेव्हा तुम्ही शॉपिंग करण्यासाठी जाता तेव्हा सर्वात चांगल्या फिटिंगची lingerie (ब्रा और panty) घालूनच जा. कारण जेव्हा तुम्ही कपडे ट्राय कराल तेव्हा त्या कपड्यांचे आऊटफिट कसे आहेत आणि त्याचा लुक कसा दिसत आहे हे योग्य तऱ्हेने तुम्ही तपासून पाहू शकता. अयोग्य फिटिंग असणारी lingerie चांगल्यात चांगल्या आऊटफिटचा लुक खराब करू शकते. तसंच तुम्ही तुमच्या शरीराची अतिरिक्त चरबी झाकण्यासाठी काही काळासाठी shape-wear देखील वापर करू शकता.
तुम्ही प्लस साईज अर्थात full figured आहात याचा अर्थ तुम्हाला आकार नाही असा होत नाही. शॉपिंग करण्यापूर्वी तुम्ही आपल्या शरीराचे curves आणि proportions योग्यरित्या समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला खरेदी करणं सोपं होईल. आपली फिगर आणि आपल्याला नक्की आपल्या वॉर्डरोबमध्ये काय हवं आहे हेदेखील तुम्हाला कळेल. याशिवाय तुम्हाला तुमची फिगर नीट समजून त्याप्रमाणे कपडेदेखील खरेदी करता येतील.
तुमच्या शरीराला कपडे योग्य फिट होत आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला श्वास घेता येईल इतपत कपडे फिट ठेवणं गरजेचं आहे. तसंच उगीचच आपण प्लस साईज आहोत म्हणून ढगळ कपडे घालणंही चुकीचं आहे. केवळ आपलं शरीर लपवायचं आहे म्हणून ओव्हरसाईज कपड्यांनी लेअर्स लपवण्याचा प्रयत्न करू नका. कारण असे कपडे तुम्हाला अधिक जाड दाखवतात. चांगल्या फिटिंगचा अर्थ हादेखील नाही की, कपडे तुमच्या शरीराला टाईट असावेत. कारण जास्त टाईट कपडे घातल्यास, तुमच्या शरीरावरील bulges अथवा bumps हायलाईट करतात. त्यामुळे असेच कपडे निवडा जे तुमच्या शरीराचा आकार accentuate करतील. परफेक्ट फिटसाठी तुम्ही तुमचे आऊटफिट तुमच्या टेलरकडूनही अल्टर करून घेऊ शकता.
तुम्ही असं आऊटफिट निवडा ज्यामध्ये खूप सारे सी प्रिंट्स, frills, ruffles इत्यादी असतील. कारण असे डिटेल्स तुम्हाला अधिक जाड दाखवतात. त्यामुळे क्लीन, टेलर्ड आणि चांगल्या फिटिंगचे फॅब्रिक तुम्ही निवडा.
आपल्या शरीराच्या स्केलच्या हिशेबाने तुम्ही प्रिंट आणि पॅटर्न निवडा. अशा आकाराचे प्रिंट निवडा जे तुमच्या शरीराच्या योग्य प्रपोर्शनमध्ये असतील. कारण मोठी प्रिंट अथवा पॅटर्न तुम्हाला अधिक जाड दर्शवतील. Stripes मध्ये vertical stripes तुम्हाला उंच आणि trim silhouette चा आभास देते. त्यामुळे तुम्हाला असेच प्रिंट घ्यायला हवेत जे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांना साईड ते साईड न दिसता वरपासून ते खालपर्यंत अर्थात vertical line ने दिसावेत.
तुमच्या शरीराच्या बेस्ट feature ला तुम्ही highlight करा. उदाहरणार्थ तुम्हाला जर अप्रतिम collar bone लाभला असेल तर तुम्ही कपड्यांमध्ये थोडी डीप आणि रूंद necklines घाला अथवा तुमचे पाय सुंदर असतील तर तुम्ही शॉर्ट ड्रेस अथवा स्कर्ट घाला. हे सर्व silhouette तुम्हाला उंच आणि lean असा लुक देतात. त्यामुळे शॉपिंग करताना या लहानसहान गोष्टींवर लक्ष द्या. सर्वात जास्त तुम्ही necklines, आऊटफिटची उंची, pleats याकडे लक्ष द्या.
प्लस साईज कपड्यांनी लेअर करण्याऐवजी तुम्ही आपला टॉप अथवा ड्रेस हा चांगल्या जॅकेट, कार्डिगन्स अशा कपड्यांनी लेअर करा. म्हणजे हे आऊटफिट तुम्हाला दिसायला तर चांगलं दिसतंच शिवाय तुमच्या लुकला एक डेप्थही मिळते. ब्राईट कलर, horizontal stripes इत्यादी गोष्टी तुम्ही जर नीट लेअर केल्यात तर तुम्हाला अतिशय चांगला स्टायलिश लुक मिळू शकतो.
हे खरं आहे की,तुमचं शरीर proportionate आणि बॅलेन्स करण्यासाठी तुमच्या पायांची भूमिका महत्त्वाची आहे. लांब पाय तुमची फ्रेम अधीक elongate करतात आणि कमी जाड आणि उंच असण्याचा आभासही याने निर्माण करता येतो तर तुमचे पाय लहान असतील तर तुम्ही उंचीने कमी दिसता. कारण पाय vertical line बनवतात. त्यामुळे असं असेल तर हिल्स हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर हिल्स घालून चालता येत नसेल तर तुम्ही एक अथवा अगदी दोन इंंचाची हिल्स घालूनदेखील बघू शकता. यामुळे तुमच्या लुक्समध्ये नक्कीच फरक पडतो.
आपल्या शरीराच्या स्केलच्या हिशेबाने योग्य accessory निवडा. जर तुम्ही लहान नेकपिस घातलात तर तुम्ही अजून जाड दिसाल. पण तुम्ही जर chunky आणि मोठे दागिने घातलेत तर तुम्हाला ते चांगले दिसतील. उदाहरणार्थ स्टेटमेंट neckpieces, rings, earrings इत्यादी तुम्ही घातल्यावर तुमच्यावर ते शोभून दिसतील. तसंच तुम्ही नेकपिसचे लेअर्सदेखील घालू शकता. हे तुमच्या लुकला fuller लुक देतात आणि तुमच्या शरीराच्या स्केलला नक्कीच सूट करतात. तसंच मोठ्या हँडबॅग्ज तुम्हाला शोभून दिसतील.
काहीही खरेदी करताना ती वस्तू ट्राय करणं विसरू नका. आपण कधी कधी कशाला ट्राय करायचं म्हणून एखादी गोष्ट तशीच विकत घेतो. पण तसं करणं योग्य नाही. तुमच्या योग्य आकाराचेही कपडे असले तरीही तुम्ही ते घालून बघायलाच हवेत. कारण ते तुम्हाला योग्य फिट होत आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे कपडे ट्राय करा आणि ही प्रक्रिया चालू असताना त्याचा योग्य आनंदही घ्या. कारण तुम्ही शॉपिंग करताय म्हणजे ती तुमच्यासाठी एक मजाच आहे.
या लहानसहान टिप्सने तुम्ही तुमच्या शॉपिंगचा अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तींसह अधिक एन्जॉय करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपले curves आणि सौंदर्य सगळ्यांना दाखवा.