ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
जुनी वा घट्ट झालेली Bra टोचत आहे किंवा क्लिपचा होतोय त्रास तर होईल दूर

जुनी वा घट्ट झालेली Bra टोचत आहे किंवा क्लिपचा होतोय त्रास तर होईल दूर

शॉपिंग प्रत्येक मुलीला आवडतं. मग ते कोणत्याही स्वरुपाचं शॉपिंग असलं तरीही. अगदी महिला आपल्याला लागणऱ्या ब्रा (Bra) ची खरेदीदेखील मनापासून करतात. पण आपणच घेतलेल्या ब्रा चा आपल्यालाच जेव्हा त्रास होतो तेव्हा काय? आपला बॅकलेस ड्रेस हा आपल्या वॉर्डरोबचा नेहमीचा भाग असेल तर ब्राबाबत आपली चिंता अधिक वाढते. पण ही गोष्टदेखील आहे की, ब्रा च्या बाबतीत आपण कधीही काणाडोळा करत नाही. बऱ्याचदा आपण घेतलेल्या ब्रा जुन्या झाल्या की टोचतात अथवा घट्ट होतात. बऱ्याचदा ब्रा च्या क्लिपचाही त्रास होतो. असं झाल्यावर आपल्याला ती ब्रा फेकून द्यावी असंच वाटतं. पण तरीही असं करणं आपल्या जीवावर येतं. मग असं असताना नक्की काय करायचं? याचा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सर्व समस्यांपासून कशी मिळवायची सुटका ते जाणून घ्या. 

1. आपली Regular bra बनवा अशा पद्धतीने Racerback

Racerback जेव्हा आपण घालतो तेव्हा आपल्या ब्रा (bra) च्या straps दिसणं हे अतिशय कॉमन आहे आणि बऱ्याचदा याबद्दल आपल्याला काही वाटत पण नाही. पण जेव्हा आपण काही स्टायलिश ड्रेस घालतो तेव्हा त्याचा लुक आपल्या या फंकी कलर्ड ब्रा च्या स्ट्रेप्सने खराब होतो. पण असं झालं तर कोणत्याच मुलीला ते आवडणार नाही. त्यामुळे आपल्या रेग्युलर अर्थात नेहमीच्या ब्रा ला रेसर ब्रा चा लुक देण्यासाठी तुम्हाला जास्त काहीच करावं लागत नाही. तुम्हाला केवळ एका पेपरक्लिप (paperclip) ची गरज आहे. या क्लिपच्या मदतीने तुम्ही ब्रा चे स्ट्रेप्स होल्ड करा आणि मग तुम्हाला त्याकडे पुन्हा लक्ष द्यायची गरज भासणार नाही.  

ADVERTISEMENT

ब्राचे प्रकार देखील वाचा

https://www.instagram.com/p/By0k50kJt6Z/

2. तुमची ब्रा shrink झाली का…

जेव्हा तुम्ही तुमची आवडती ब्रा NO machine wash असा सूचनेनंतरही चुकून वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकता अथवा चुकून गरम पाण्याने धुता तेव्हा तुमच्या ब्रा चा आकार हा लहान होतो. पण आता ती पुन्हा घालता येणार नाही अशी भीती नक्कीच तुमच्या मनात आली असेल. पण मग हे नक्की कसं करू शकतो असाही प्रश्नही मनात येतो. तर तुम्हाला त्यासाठी तुमची एखादी जुनी ब्रा शोधायची गरज आहे. आता त्याचे हुक आणि आय कट करून दोन्ही edges वर शिऊन टाका. आता हे एक्स्टेन्शन आपल्या ब्रा मध्ये सेट करून घालण्यासाठी तयार आहे. या tucks ने तुमची फक्त क्रिएटिव्हिटीच नाही दाखवली तर तुमची आवडती ब्रा टाकून देण्यापासूनही वाचवली. 

ADVERTISEMENT

3. Low बॅक ब्रा करा अशी तयार

3. Low बॅक ब्रा करा अशी तयार

बऱ्याच जणींना Deep neck टॉप्स घालायचे असतात. पण त्यातून येणारी ब्रा ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे काही मस्त टॉप्स घातल्यानंतर गरजेचं आहे की, त्यातून ब्रा चे पट्टे बाहेर दिसू नयेत. तुमच्या नेहमीच्या ब्रा चा देखील तुम्ही यासाठी उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला इलॅस्टिक, हुक आणि आय आणि मुलभूत शिलाईची गरज आहे. हेदेखील तुम्ही एक्स्टेंडरप्रमाणेच करायचं आहे आणि मग त्याला इलॅस्टिक जोडून घ्यायचं.  यामुळे तुमची ब्रा साधारण दोन इंचापर्यंत खाली येईल. अर्थात deep होईल. असं केल्याने तुम्ही आता तुमच्या डीप नेक टॉपसह तयार होऊन जाऊ शकता बाहेर. 

https://www.instagram.com/p/BpevPuGnB–/

ब्रा आपल्याला नक्कीच आपल्याला हवा तसा सपोर्ट देत असते. पण सतत याचा वापर केल्यावर याची underwire आपल्याला टोचू लागते. बऱ्याचदा घाम आल्यावरही याचा खूप त्रास होतो. यापासून आपल्याला सुटका मिळवायची असेल तर एका चांगल्या रिबीनचा यासाठी तुम्ही वापर करू शकता आणि त्याशिवाय तुम्हाला एका glue ची देखील गरज आहे. ही रिबीन तुम्ही गमच्या सहाय्याने pokey wire hole वर फिक्स करा आणि तुम्हाला टोचत असलेल्या गोष्टीपासून सुटका मिळेल.

ADVERTISEMENT

4. Pokey Underwire करा रिबीनने फिक्स

5. ब्रा फेकून द्यायला हवी का?

धुलाई आणि ड्रायरच्या कारणांमुळे underwire येणं हीदेखील एक समस्या आहे पण त्याहीपेक्षा मोठी समस्या आहे ती म्हणजे, हे सहन करणं. पण ब्रा टोचत राहते म्हणून ती निकालात काढायला हवी अथवा फेकून द्यायला हवी का? पण असं करण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही याचा unwired bra प्रमाणे उपयोग करू शकता. तुम्हाला टोचत असलेल्या या दोन्ही wire बाहेर काढा. त्यासाठी तुम्ही कात्रीचा वापर करू शकता. तुम्ही शेवटच्या ठिकाणी एक कट करा आणि वायर बाहेर काढून खेचून घ्या. अशा रितीने तुमची unwired bra तयार होते. 

हेदेखील वाचा –

ADVERTISEMENT

प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 10 Bra Rules!

कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या

स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा कशी निवडावी

 

ADVERTISEMENT

 

09 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT