ADVERTISEMENT
home / Family
लग्न ठरलंय, पण भविष्याचा विचार केलाय का

लग्न ठरलंय, पण भविष्याचा विचार केलाय का

लग्नासाठी प्रेम असणं तर आवश्यक आहेच. पण सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लग्नानंतर संसारासाठी लागणारा पैसा अर्थात Finanace. लग्न तर पटकन ठरतं. पण आपल्याला भविष्यात नक्की काय करायचं आहे हा विचार जोड्या करतात का? असाही प्रश्न पडतो. खरं तर हा विचार लग्नापूर्वी करणं आवश्यक आहे. कारण लग्नापूर्वी बऱ्याचदा या विषयावर नक्की कसं बोलायचं असं वाटून बोललं जात नाही. पण आपण ज्याच्याबरोबर आयुष्य जगणार आहोत त्याने आपल्या दोघांच्याही भवितव्याची काय सोय करून ठेवली आहे हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ज्याच्याबरोबर लग्न करणार आहात त्यांना हे प्रश्न नक्की विचारा –

1. कर्ज तर घेतलं नाही ना?

Shutterstock

याबद्दल बोलण्यासाठी तुम्हाला एका व्यवस्थित वेळेची वाट पाहावी लागेल हे नक्की. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलता बोलता त्याची आर्थिक परिस्थिती नक्की कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याने कुठून कर्ज तर घेतलं नाही ना किंवा तुम्ही कोणतंही कर्ज घेतलं नाही ना हे एकमेकांशी शेअर करणं गरजेचं आहे. यामध्ये शैक्षणिक कर्ज, घर कर्ज यागोष्टीदेखील समाविष्ट असतात. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा आपल्या जोडीदारावर दबाव टाकून नाही तर त्यांच्या मनाप्रमाणे या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही भविष्यात या सगळ्या गोष्टी दोघांनी कशा प्रकारे सोडवायच्या आहेत याचा विचार करू शकता आणि तुमच्या भविष्याचा योग्य विचार तुम्ही एकत्रित करू शकता. तसंच कशा प्रकारे यानंतर बचत करून आपला संसार करायचा आहे हेदेखील चित्र तुम्हाला या सगळ्यामुळे स्पष्ट होईल. 

ADVERTISEMENT

2. मुलं आणि त्यांच्या भविष्याच्या बाबतीत

Shutterstock

याबाबत लग्नाआधी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या जोडीदारा लग्नानंतर मुलं हवी असतील किंवा नको असतील या सगळ्याबाबत अर्थात पॅरेंटिंगबाबत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही लग्नानंतर नोकरी करणार की नाही किंवा तुम्हाला घरबसल्या काही काम करायचं आहे या सगळ्याच्या बाबतीतही तुम्ही तुमच्या जोडीदाराजवळ स्पष्ट मत मांडणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही घरी राहून मुलं सांभाळणार असलात किंवा मुलांना डे केअरमध्ये ठेऊन नोकरी करणार असलात तर तुमच्या जोडीदाराचीदेखील यासाठी मानसिक तयारी असायला हवी. त्यामुळे लग्न ठरताना अथवा अगदी ठरल्यानंतरही तुम्ही याबाबत एकमेकांशी स्पष्ट बोलायला हवं. कारण या सगळ्याची मानसिक आणि शारीरिक तयारी करण्याची वेळ तुमच्याजवळ राहील. 

3. नोकरीसाठी जागा बदलायची असल्यास

ADVERTISEMENT

Shutterstock

काही वेळा अशी परिस्थिती येते की, तुम्हाला अधिक पैशासाठी अथवा नोकरीसाठी आपलं शहर अथवा आपली जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊन काम करावं लागतं. अशावेळी तुमच्या जोडीदाराला याची कल्पना देणं महत्त्वाचं आहे. असं असल्यास, या गोष्टींचा नक्की काय फायदा आहे आणि तुमच्या दोघांच्याही भविष्यासाठी हे किती आणि कसं योग्य आहे हे तुमच्या जोडीदाराला तुम्ही योग्यरित्या पटवून द्यायला हवं. परिस्थितीनुसार तुम्ही तुमच्या जोडीदाराशी याबाबत बोलायला हवं.  लपवून ठेऊन कोणतीही गोष्ट करू नये. कारण नात्यात विश्वास महत्त्वाचा असतो. जर तुमचा जोडीदार दुसऱ्या ठिकाणी जायला तयार नसेल तर फायनान्शियली कसा फायदा आहे हे त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करा. तसंच त्याला अजिबातच शक्य नसेल तर मध्यमार्ग काढायचा प्रयत्न करा. मात्र याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. कारण या गोष्टी तुमच्या संसारासाठी महत्त्वाच्या असतात. 

4. प्राधान्य नक्की कशाला

Shutterstock

ADVERTISEMENT

लग्न करण्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीसह आयुष्यभर राहणं. यामध्ये तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करणंही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे एकमेकांचं प्राधान्य नक्की कोणत्या गोष्टींना आहे हेदेखील लक्षात घ्यायला हवं. तुम्हाला नक्की आयुष्यात काय काय हवंय? तुमच्या जोडीदाराला आयुष्यात काय हवंय? तुमच्यासाठी दर आठवड्याला फिरणं गरजेचं आहे किंवा नेहमी फिरणं, चित्रपट पाहणं, कोणत्या ठिकाणी घर घेणं अथवा फार्महाऊस खरेदी करणं अथवा कोणताही नवा व्यवसाय सुरु करणं यापैकी नक्की काय प्लॅनिंग तुम्ही करत आहात हे एकमेकांना विश्वासात घेऊन माहीत करून घ्यायला हवं. पहिल्यापासूनच या गोष्टी क्लिअर असल्या की एकमेकांना समजून घेणं सोपं जातं. तसंच एकमेकांची स्वप्नं नक्की काय आहेत हे माहीत असल्यामुळे त्या दिशेने काम करायला आणि एकमेकांना साथ द्यायला फारच सोपं होतं आणि एकमेकांची एकमेकांना मदतही होते. यासाठी नक्की कशा प्रकारे बचत करायला हवी याचं एक प्लॅनिंग तुम्ही व्यवस्थित आखून त्याप्रमाणे वागू शकता. 

5. पालकांची काळजी

Shutterstock

कदाचित तुम्हाला आता तुमच्या आईवडिलांची काळजी करण्याचं कारण नाही. पण दहा वर्षानंतर ही परिस्थिती अशीच राहणार नाही. तेव्हा तुम्हीच तुमच्या आईवडिलांचा आधार असता. त्याशिवाय तुम्हाला तुमचाही संसार व्यवस्थित सांभाळायचा असतो. त्यामुळे याविषयीदेखील तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे आधीपासूनच तुम्ही याची तयारी करू शकता. आई वडिलांना पाठिंबा देणं ही तुमची जबाबदारी तर आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या संसाराचीही जबाबदारी असते. त्यामुळे अशावेळी तुम्ही एकमेकांची साथ योग्यरित्या बोलून देणं गरजेचं आहे. तसंच आपल्या आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेणार की एकत्र घेणार हेदेखील क्लिअर करणं गरेजचं आहे.

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा 

श्रीमंत व्हायचं असेल तर टाळा ‘या’ 5 चुका, करा बचत

प्रत्येक महिन्याचा पॉकेटमनी वाचवायचा असेल तर 7 सोपे उपाय

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

ADVERTISEMENT
26 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT