चॉकलेट आवडत नाही असे म्हणणारे फारच तुरळक असतात नाही का? महिलांच्या बॅगेत तर हमखास एखादे चॉकलेट असतेच. चॉकलेटच्या अति सेवनामुळे जाड व्हायला होते, दात किडतात किंवा अन्य त्रास होऊ शकतो असे कितीही सांगितले तरी महिलांसाठी चॉकलेट ह एक प्रकारचे वरदान आहे असे म्हणायला हवे. कारण महिलांनी चॉकलेट खाणे फारच गरजेचे असते. कोणत्या कारणासाठी चॉकलेट महिलांसाठी चांगले आहे ते पाहुयात
महिलांना चॉकलेट खाण्याची इच्छा सतत होत असते. कारण पिरेड्स दरम्यान महिलांच्या मेंदूतील सेरोटोनीन (serotonin) कमी होते. त्यामुळेच या काळात महिलांना अधिक थकवा जाणवतो, झोप पूर्ण होत नाही. यावेळी चॉकलेटचे सेवन केल्याने महिलांना बरे वाटते. थकवा दूर जाऊन मूड चांगला होतो. त्यामुळे महिलांनी त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी चॉकलेट खाणे गरजेचे असते.
रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी चॉकलेटची मदत होते हे माहीत असेलच. पण त्याचा फायदा तुमच्या सेक्स ऑरर्गन्सना रक्त पुरवठा करण्यासाठीही होते. त्यामुळे तुमच्यातील सेक्सची इच्छा टिकून राहते. चॉकलेटमधील अमिनो अॅसिड नैसर्गिक पद्धतीने तुमच्यातील सेक्सला चालना देते. चॉकलेटच्या सेवनामुळे सेक्सची इच्छा, कामुकता आणि सेक्समधील समाधान टिकवून ठेवते. हे महिला आणि पुरुष दोघांच्या बाबतीत आहे. महिला आणि पुरुष दोघांनी चॉकलेटचे सेवन करायला हवे. महिलांना थकवा अधिक लवकर जाणवतो म्हणून त्यांनी चॉकलेटचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो
गर्भावस्थेत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.या काळांमधील ताणांमधून दूर करण्याचे काम चॉकलेट करत असते. त्यामुळे जर तुम्ही गरोदर असाल तर या दिवसात आवर्जून चॉकलेट खा. तुम्हाला होणारा त्रास थोडाफार कमी होईल.शिवाय या दिवसात काहीही खाण्याची इच्छा नसते. अशावेळी एक चॉकलेटचा बार जरी तोंडात टाकला तरी तोंडाला चव येते.
आता चॉकलेट खाऊन वजन नियंत्रणात राहते हे तुम्हाला सांगितले तर कदाचित पटणार नाही. पण हे खरे आहे. तुमच्या शरीरातील बॉडी मास वाढू न देत नाही. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. ज्या महिला नियमित चॉकलेट खातात. त्यांचा बांधा हा चांगला सडसडीत असतो. त्यामुळे तुम्ही किमान चॉकलेटचा एक तुकडा तरी चघळा.
वेदना दूर करण्यासाठीही चॉकलेट चांगले आहे. जर तुम्हाला काही दुखत आहे. असे वाटत असेल तुम्हाला डॉक्टरकडे जाणे सहज शक्य नसेल त्यावेळी तात्पुरती वेदना शमवण्यासाठी तुम्ही चॉकलेटचे सेवन करु शकता. त्यामुळे तुमच्या वेदना कमी होतात. पण वेदना कमी होतात. म्हणून एकाचवेळी भरपूर चॉकलेट खावू नका.
चॉकलेटचे नित्य सेवन शरीरासाठी चांगले आहे. पण त्यासाठी तुम्हाला एकाच वेळी भरपूर चॉकलेट खण्याची सवयही वाईट आहे.