आपण जेव्हा मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या हिरॉईन्सकडे बघत असतो तेव्हा त्यांचे ‘सेक्सी’ ओठ बघून प्रत्येक मुलीला असंच वाटतं की, आपलेही ओठ असेच असावेत. त्यासाठी नक्की काय करावं लागतं असा प्रश्नही सगळ्यांना पडतो. आपल्या ओठांचा पाऊट अप्रतिम दिसण्यासाठी नक्की काय करायला हवं असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपल्याला वाटतं की, या हिरॉईन्सने डॉक्टरकडे जाऊन सर्जरी करून घेतली असेल म्हणून यांच्या ओठांचा पाऊट इतका सुंदर दिसतो. पण खरं सांगायचं तर तुम्हाला घरच्या घरी राहून अगदी जास्त पैसे खर्च न करता तुम्हाला असा ओठांचा पाऊट मिळू शकतो. आहे ना कमाल! आता यासाठी नक्की काय करायला हवं तर मेकअप किट काढा आणि तुमच्या सोप्या ट्रिक्स वापरा आणि तयार व्हा अप्रतिम पाऊट दाखवण्यासाठी!!!
ओठांना काहीही लावण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, ओठ कधीही कोरडे ठेऊ नका. त्यासाठी ओठ exfoliate करणं आवश्यक आहे. असं केल्यामुळे कोरडी, डेड स्किन निघून जाते आणि ताजी आणि मुलायन त्वचा राहाते. तसचं यामुळे ओठांचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं त्यामुळे ओठ व्यवस्थित भरलेले दिसतात. Exfoliate करण्यासाठी तुम्ही ओठांसाठी कोणताही स्क्रब वापरू शकता अथवा तुमचा जुना टूथब्रश घ्या त्यावर थोडंसं नारळ तेल लावा आणि हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये ओठांना स्क्रब करा. 2-3 मिनिट्स नंतर तुम्हाला तुमचे ओठ अतिशय फ्रेश, मऊ आणि शायनी दिसतील. हे exfoliation सह ओठांना मॉईस्चराईजदेखील करतात. ओठ जितके हायड्रेटेड होतील तितके जास्त चांगले दिसतील.
ही ट्रिक तुम्ही कधीही कोणत्याही मेकअपसह करू शकता अर्थातच कोणत्याही लिप कलरसाठी तुम्ही हे वापरू शकता.
स्टेप-1
तुम्ही जी लिपस्टिक लावणार आहात त्याच्याशी मिळता जुळत्या रंगाचं लिप लायनर तुम्ही वापरून लिप लाईन करा. तुमचा वरचा ओठ जर थोडा पातळ असेल तर तुम्ही नैसर्गिक लिप लाईनच्या थोडं बाहेर जाऊन लिप लाईन बनवा आणि नीट ब्लेंड करा
स्टेप-2
लायनर सेट करण्यासाठी त्यावर अगदी थोडीशी translucent पावडर डस्ट करा. आता तुम्ही निवडलेली लिपस्टिक तुम्ही ब्रशच्या मदतीने लावा. तुमची लिपस्टिक जर खूप क्रिमी अथवा पिगमेंटेड असेल तर टिश्यूने ओठांवर प्रेस करा ज्यामुळे तुमच्या ओठांवर जास्त लिपस्टिक लावली असेल तर ती निघून जाईल.
स्टेप- 3
आता बोटाच्या मदतीने ओठांवर (वर आणि खाली दोन्ही दिशेला) मधल्या कन्सीलर लावा. अंदाजाने cupid bow वाल्या एरियावर लावा आणि ब्लेंड करा. वरच्या ओठावर जो M आकाराचा आकार असतो त्याला Cupid bow असं म्हटलं जातं.
स्टेप- 4
आपल्या आवडत्या लिप ग्लॉसने याला फिनिशिंग टच द्या आणि मिळवा सेक्सी पाऊट
तुम्हाला जर नैसर्गिक आणि साधा लुक हवा असेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. ही ट्रिक तेव्हा कामी येते जेव्हा तुम्हाला कोणत्या तरी पार्टीला नाही तर नेहमीच्या रूटिनमध्ये वेगळं दिसायचं असतं.
स्टेप-1
कन्सीलरचा कमालाची वापर यामध्ये करा. मॉईस्चराईज्ड ओठांवर अगदी मधोमध कन्सीलर अथवा लाईट न्यूड पेन्सिल लावा. Cupid bow वाला एरिया कव्हर होईल इतकं फिल करा. तुम्हाला जितकं फिल करता येईल तोपर्यंत ओठांच्या नैसर्गिक लाईनपर्यंत कन्सीलर लाईन करा. असं दोन्ही ओठांवर करा.
स्टेप-2
आपल्या नैसर्गिक ओठांच्या रंगापेक्षा एक डार्क कलरची तुम्ही लिप पेन्सिल घ्या आणि उरलेले ओठ आऊटलाईन करून फिल करा. नंतर आतल्याप्रमाणे हलक्या हाताने ब्लेंड करा.
स्टेप-3
बोटांच्या मदतीने कन्सीलरच्या एजेसने लिप कलरवर हलक्या हाताने ब्लेंड करा. हे तोपर्यंत ब्लेंड करा जोपर्यंत सर्व लाईन्स दिसणं बंद होत नाहीत. फक्त या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या की, लिप कलर कन्सीलर मध्ये मिसळून तुमचा जो मूळ रंग आहे तो बदलू नये.
स्टेप-4
सर्वात शेवटी न्यूड ग्लॉस लावा. ग्लॉस जितकं sheer असेल तितकाच पाऊट जास्त उठून दिसेल.
तुम्ही जर खूपच घाईत असाल आणि इतकी सगळी प्रक्रिया करू शकत नसाल तर ही ट्रिक तुमच्यासाठी आहे. ही ट्रिक करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन मिनिट्स लागतील.
स्टेप-1
ओठांच्या नैसर्गिक लिप लाईनच्या आजूबाजूला कन्सीलर लावा आणि मग नैसर्गिक लिप लाईनवरून थोडं बाहेर जाऊन लिप लाईन करा. यामुळे तुमचे पातळ दिसणारे ओठ संपूर्ण भरलेले वाटू लागतील.
स्टेप-2
तुम्हाला कन्सीलर लावायचं नसलं तरीही तुम्हाला जी लिपस्टिक लावायची आहे त्यापेक्षा एक ते दोन शेड जास्त डार्क लिपस्टिक घ्या आणि ओठांच्या बाहेरच्या भागावर (outer corner) लावा. आता मधल्या भागावर लाईट शेडवाली लिपस्टिक लावा. दोन्ही एजेस व्यवस्थित ब्लेंड करून घ्या सर्वात शेवटी क्लिअर ग्लॉसने फिनिशिंग टच द्या.
मेकअप करण्याची तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता. काही वेळासाठी हा उपाय तुमचे ओठ मोठे दाखवू शकतो. पण हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी नाही ना याची खात्री करून घ्या.
अर्धा चमचा नारळ तेलामध्ये 2 थेंब peppermint oil मिसळा. हे ओठांवर नीट घासा आणि मग लावा. आधी ओठांवर थोडी चरचर उठेल पण नंतर हे ओठांना plump दाखवून देतं.
आपल्या जुन्या टूथब्रशवर थोडीशी दालचिनी पावडर लावा आणि मग अगदी हलक्या तऱ्हेने तुमच्या ओठांवर घासा. स्क्रब तोपर्यंत करा जोपर्यंत तुमचे ओठ थोडे मोठे वाटत नाहीत. पण याचा अर्थ जास्त स्क्रब करायला हवं असा नाही. हे करत असताना तुम्हाला नक्कीच थोडा त्रास होईल. पण ही ट्रिक ट्राय करण्यापूर्वी दालचिनी पावडर तुम्ही तुमच्या ओठांच्या किनाऱ्यावर आधी लावून पाहा आणि मगच पुढे पाऊल उचला. जर तुम्हाला अतिच त्रास होत असेल तर याचा वापर करू नका.
या सगळ्या ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला हवं तसं पाऊट तुम्हाला मिळवता येईल. पण तुम्हाला त्रास होईल अशा कोणत्याही ट्रिक्स करू नका.