पावसाळ्यात आवर्जून खायला हवीत ही 5 चविष्ट फळं

पावसाळ्यात आवर्जून खायला हवीत ही 5 चविष्ट फळं

पावसाळा आला की सगळीकडे मस्त आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं. छान गरम गरम खावसं वाटतं. मग काय भजी पाव, वडापाव या सगळ्यावर ताव मारला जातो. पण या दिवसात काही खास फळ बाजारात येतात. ही फळं फारच Limited काळासाठी असतात. या चविष्ट फळांचा आस्वाद तुम्ही पावसाळ्यात घ्यायलाच हवा. तुम्हाला फळ आवडत असतील. पण पावसाळ्यात कोणती फळं खायची हे समजत नसेल तर तुम्ही या 5 चविष्ट फळांचा आस्वाद घेऊ शकता.

पावसाळ्यात खायलाच हव्यात या रानभाज्या

लालचुटुक चेरी (cherry)

shutterstock

आता सर्रास सगळीकडे तुम्हाला फळ विक्रेत्यांकडे लालचुटुक चेरी दिसणार नाही असे होणार नाही. लहान लहान दिसणारे हे फळ आंबट- गोड लागते. याचा रंग फिक्कट लाल किंवा अगदीच काळपट लाल असा असतो.या दिवसात या फळाची किंमतही खूप असते. हे फळ नुसतं चवीलाच चांगले नाही तर या फळाचे अनेक फायदेसुद्धा आहेत. चेरीमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्हाला चांगली झोप येण्यासाठीही हे फळ फायदेशीर आहे. या शिवाय उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवून तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे फळ मदत करते.

आलुबुखार (Plum)

shutterstock

 पावसाळ्यात आणखी एक दिसणारं फळं म्हणजे आलुबुखार… आता या फळाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. थोडसं मरुन रंगाचं हे फळं असतं. हे फळ पाहिल्यानंतरच ते किती पाणीदार असेल याचा अंदाज येतो. या फळाची चव तशी आंबट असते. पण तो आंबटपणा तोंडाला चव आणणारा असतो. हे फळ याच दिवसात मिळते. त्यामुळे सिझनल फळ म्हणून तुम्ही ते खायला हवेच. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आलुबुखार चांगले असते. याशिवाय बद्धकोष्ठता,रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी, तुमची त्वचा चांगली करण्याचे कामदेखील आलुबुखार करते.

पावसाळ्यात नक्की ट्राय करा या पौष्टिक भजी

पीच (Peach)

shutterstock

आलुबुखारच्याच आकाराचे पण टेक्चर आणि चवीला थोडे वेगळे असते पीच. या दिवसात पीच हे फळ सगळीकडे दिसते. पीचची किंमतही इतर फळांच्या तुलनेत अधिक असते.व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी पीच हे भरलेले असते. या फळाची चव निम गोड असते. हल्ली हे फळ बाजारात नेहमीच पाहायला मिळते. पण पावसात जरा वाजवी दरात हे फळ मिळते. या फळांचे भरपूर फायदे आहे. पीचचा रंग आणि तुम्ही त्याचे टेक्सचर जर तुम्ही पाहिले असेल तर हे फळ मखमली असते. या फळांचे भरपूर फायदे आहेत. ह्रदयविकार नियंत्रणात ठेवणे, पचनशक्ती वाढवणे,अॅलर्जी कमी करणे आणि तुमची त्वचा सुधरवण्याचे काम पीच करते. 

लिची (Lychee)

shutterstock

या दिवसात आणखी एक फळ दिसतं ते म्हणजे लिची. या फळाचे साल जाड आणि वाळलेले असते. ते साल काढून तुम्हाला आतील पारदर्शक गर खायचा असतो. या फळामध्ये चॉकलेटी रंगाची मोठी बी असते. या फळाची चव इतर फळांसारखी नसते. तर हे फळ खाल्ल्यानंतर या फळाची चव नेमकी काय सांगायची हे कळत नाही. पण या दिवसात हे फळ आवर्जून खावे याची किंमतही अगदी वाजवी असते. लिचीमध्ये व्हिटॅमिन C आणि B कॉम्पलेक्सचा पुरेपूर साठा असते. तुमची त्वचा सुधारण्यासोबतच तुमचे रक्त वाढण्यासाठी मदत करते.

मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ

डाळींब (Pomegranates)

shutterstock

डाळींब हे फळ खरंतरं वर्षभर मिळते. पण पावसात लाल चुटुक आणि फ्रेश दिसणारी डाळींब मिळतात. डाळींबाची चव गोड थोडीशी तुरट अशी असते. डाळींब खाण्याचे भरपूर फायदे आहेत. अनेकदा आजारपणात डाळींब खाण्याचा सल्ला दिला जातो तो याचसाठी..कॅन्सर, अल्झायम आणि ह्रदयविकारावर डाळींब हे अत्यंत गुणकारी असते. 

 त्यामुळे आता या पावसाळ्यात तुम्ही ही फळं नक्कीच खाऊन पाहायला हवीत.