ADVERTISEMENT
home / Care
केस पांढरे झालेत तर ट्राय करा 6 घरगुती उपाय

केस पांढरे झालेत तर ट्राय करा 6 घरगुती उपाय

आजकाल अगदी लहान वयातच बऱ्याच जणांना केस पांढरे होण्याचा अनुभव येत असतो. ही खूपच मोठी समस्या सध्या झाली आहे. केस पांढरे होण्याची प्रक्रिया ही हल्ली वयाच्या विशी अथवा तिशीपासून चालू होते. सतत डोक्यावर असणारा ताण आणि तणाव याचा परिणाम होऊन केस लवकर पांढरे होतात. पण यावर नेहमी हेअरडाय करणं हा उपाय असू शकत नाही. एकदा हेअरडाय करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला नेहमी करत राहावा लागतो. त्यामुळे यावर नैसर्गिक उपचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही तुम्हाला काही खास घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला तुमचे केस काळे राखण्यासाठी फायदेशीर ठरतील.

1. जुनी पण विश्वासयोग्य पद्धत

Shutterstock

पांढऱ्या केसांपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर मेंदीची पानं तुम्ही वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. त्या पेस्टमध्ये आवळा पावडर, दही आणि कॉफी या तिन्ही वस्तू एक एक चमचा मिसळा. तयार पेस्ट केसांना लावा आणि सुकल्यावर केस धुवा. यामुळे तुमच्या केसांना एक वेगळा रंग मिळतो आणि त्याशिवाय तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. तसंच तुमच्या केसांना मेंदीमुळे deep conditioning मिळतं. आवळ्याच्या पावडरनेही चांगला लुक मिळतो. तुम्ही नक्की आवळा पावडरचाही वापर करून पाहा.

ADVERTISEMENT

2. Melanin ची कमतरता

केस पांढरे होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुमच्यामध्ये असणारी Melanin ची कमतरता. आपल्या शरीरात मेलानिनची कमतरता ही योग्य पोषण न मिळाल्यामुळे होते. त्यामुळे आपल्या जेवणात आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक पदार्थ तुम्ही खायला घेतले पाहिजेत.

3. सुकलेले रीठा-आवळा आणि नारळ तेल

Shutterstock

सुकलेल्या आवळ्याचे तुकडे नारळाच्या तेलामध्ये घालून ते उकळून घ्या. हे तयार झालेलं तेल एका बरणीत भरून ठेवा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा या तेलाने केसांना मालिश करा आणि एक तासाने तुम्ही तुमचे केस शँपूने धुवा. तुम्हाला हवं असल्यास, रात्री झोपण्यापूर्वीही तुम्ही केसांना या तेलाने मालिश करून झोपू शकता.

ADVERTISEMENT

4. रसायनांचा वापर नको

तुम्ही ज्या केसांच्या उत्पादनांचा वापर करता, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात केमिकल्स अर्थात रसायनांचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे तुमचे केस अगदी लहान वयात पांढरे होऊन तुम्ही म्हातारे दिसू लागता. असं असल्यामुळे कोणतंही उत्पादन खरेदी करताना ही गोष्ट निश्चित बघा की, ज्या उत्पादनाची तुम्ही खरेदी करत आहात त्यामुळे तुम्हाला नुकसान तर पोहचत नाही ना.

5. कांदा आणि लिंबाची कमाल

Shutterstock

केसांचा रस केस पांढरे होण्यापासून थांबवतो. तसंच केसगळती रोखण्याचं कामही कांदा करतो. एक कांद्याचा रस आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि केसांमध्ये मूळापासून हे मिश्रण लावून मालिश करा. साधारण अर्धा तास ठेवा आणि नंतर हर्बल शँपूने केस धुवा. कारण लिंबाचा रस आणि कांदा हे दोन्ही थंड पदार्थ आहेत. तसंच हा उपाय गरमीच्या दिवसात करणं योग्य आहे. थंडीच्या दिवसांमध्ये हा उपाय करू नये. करणारच असाल तर त्या काळापुरतं तुम्ही उन्हात येऊन बसा.

ADVERTISEMENT

6. Magical Three!

Shutterstock

आवळ्याचा रस, बादामाचं तेल आणि लिंबाच्या रसाचं योग्य मिश्रण करून घ्या आणि हे मिश्रण केसांना लावून मालिश करा. मग एक तासानंतर तुम्ही केस धुवा. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा असं करा. वेळ लागतो पण या प्रयोगाने तुमचे पांढरे केसही काळे होतात. तुम्ही नियमित स्वरूपात याचा वापर करायला हवा.

हेदेखील वाचा 

ADVERTISEMENT

घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार

23 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT