सुंदर केस हे सर्वांनाच आवडतात. पण तुम्हाला जर सुंदर केस हवे असतील तर त्याचं सिक्रेट तुम्ही रात्री नक्की काय करता यावर अवलंबून असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रात्री काय करता म्हणजे काय? जास्त विचार करू नका. याचा अर्थ रात्री झोपताना तुम्ही केसांची काळजी कशी घेता असा आहे. तुम्ही झोपण्यापूर्वी केसांना तेल लावता की नाही किंवा रात्री झोपताना तुम्ही केस मोकळे सोडून झोपता का की बांधून झोपता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या केसांवर परिणाम करत असतात.
बऱ्याचदा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या उशीवर केस गळलेले दिसून येतात. पण यातून तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर, त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले उशीचं कव्हर बदलणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं का? तर कॉटनच्या कव्हरपेक्षा सिल्क अथवा सॅटीनच्या मुलायम कव्हरवर डोकं ठेऊन झोपल्यास, सकाळी उठल्यावर केसांमध्ये जास्त गुंता होत नाही आणि केस जास्त स्मूथ राहतात. खरं आहे की, कॉटन कव्हरच्या तुलनेत महाग असतात. पण केसांसाठी हे सिल्क कव्हर अतिशय चांगले असतात आणि त्यासाठी ही गुंतवणूक करणं योग्य आहे.
कोणतेही हेअर एक्स्पर्ट्स या गोष्टीला पाठिंबाच देतील. केस नैसर्गिकरित्या कितीही सुंदर असतील तरीही रात्री केस सोडून झोपणं योग्य नसल्याचं सिद्ध झालं आहे. केस सोडून झोपणं हे संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी वाईट असतं. त्यामुळे तुम्ही तुमचे केस झोपण्यापूर्वी एखाद्या लहान रबरने हलकेसे बांधून झोपा.
चांगल्या केसांसाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी तुम्ही केसांना तेलाने मालिश केल्यास, हे तेल तुमच्या मुळापर्यंत जातं आणि केसांना परफेक्ट उपचार देतं. रात्री तेल लावून तुम्ही सकाळी तुमचे केस धुवा. असं केल्यास, तुम्हाला स्वतःला केसांवरील फरक दिसून येईल.
तुम्हाला जर सॉफ्ट पिलो कव्हरच्या उशीवर झोपायचं नसेल तर तुम्ही सॉफ्ट हेड कव्हर हा एक चांगला पर्याय निवडू शकता. एका सिल्क स्कार्फमध्ये तुम्ही तुमचे केस बांधा आणि मग झोपा. यामुळे तुमचे केस गुंतणार नाहीत आणि शिवाय सकाळी कोणत्याही प्रकारे तुमच्या उशीवर गळलेले केस दिसणार नाहीत.
वेणी बांधणं हा केवळ वाईट अथवा तेलकट केसांच्या दिवशीचा पर्याय नक्कीच नाहीये. सुंदर केसांचीही वेणी तुम्ही बांधू शकता. खरं तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केसांची अशी वेणी घालून झोपल्यास, तुमच्या केसांचे खूपच सुंदर कर्ल्स तयार होतात. शिवाय तुमचे केस गुंतण्यापासून दूर राहतात आणि केसांची नीट काळजी घेतली जाते.
सकाळी सकाळी उठून केसांचा गुंता सोडवणं ही जर तुमची रोजची समस्या झाली असेल तर यावर पर्याय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही केसांना लिव इन कंडिशनर लावा. तुमचा मेकओव्हर लिव इन कंडिशनरमुळे होतो. हे कंडिशनर केवळ केसांना शाईन नाही देत तर केसांना अतिशय मऊ बनवतं.