तुम्ही चुकीच्या ठिकाणी तर Deodorant लावत नाही ना, लक्षात ठेवा या गोष्टी

तुम्ही चुकीच्या ठिकाणी तर Deodorant लावत नाही ना, लक्षात ठेवा या गोष्टी

हल्ली कुठेही घराबाहेर पडायचं म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जवळ लागतं ते Deodorant. काही लोकांना तर डिओने आंघोळ करायची सवय आहे. अर्थात काही लोक इतकं डिओ वापरतात की, त्यांच्या आजूबाजूला फक्त डिओचा सुगंध दरवळत असतो. मुंंबईसारख्या असो अथवा अन्य शहरांमध्येही धावपळीत आणि उन्हाने इतका घाम येत असतो की, नेहमी आपल्याजवळ डिओ असणं आणि तो अंगावर लावणं आपल्याला गरजेचं वाटत असतं. आपण नेहमीच डिओ वापरत असतो त्यामुळे यामध्ये काही शिकण्यासारखं आहे असं आपल्याला वाटत नाही. डिओची कॅप काढली आणि स्प्रे केला की झालं काम असाच आपला समज असतो. पण असं नक्कीच नाही. तुम्ही तुमचा डिओ नीट वापरत आहात की नाही हे खालील गोष्टी वाचून तुम्हीच ठरवा -

1. आंघोळ केल्यानंतरही कधी लावला आहे deo?

Shutterstock

Deo चं मुख्य आहे ते म्हणजे घामाची दुर्गंधी थांबवणं आणि तुम्हाला दिवसभर एक ताजा सुगंध येऊ देणं. त्यामुळे जेव्हा तुम्ही आंघोळ करून येता तेव्हाच तुम्ही डिओ लावायला हवा. कारण तुम्ही तेव्हा ताजे असता आणि हा सुगंध तुमच्या अंगावर टिकून राहातो. एकदा घाम आल्यानंतर अंगावर डिओ मारणं योग्य नाही. 

महिलांसाठी सर्वोत्कृष्ट डिओडोरंट देखील वाचा

2. खरं सांगा, तुम्ही कपड्यांवर लावता ना डिओ

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असतं की, कपड्यांवर डिओ लावल्याने त्याचा सुगंध कपड्यांवर जास्त काळ टिकून राहातो. पण डिओ आपल्या शरीरातील गंधरोधक (odour-causing) बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम करतो आणि त्याशिवाय antiperspirant प्रमाणेही याचं काम असतं. जेणेकरून तुमच्या शरीरावर जास्त घाम येणार नाही. त्यामुळे डिओ कपड्यांवर नाही तर तुमच्या अंगावर लावण्याची गरज आहे. 

3. Deo केवळ लावत नाही तर आंघोळ करता

Shutterstock

Deo लावल्याने घामाची दुर्गंधी येत नाही त्यामुळे तुम्ही एकदा डिओ हातात मिळाला की जणू काही त्यानेच आंघोळ करता. पण त्यामुळे तुम्हाला सुगंधाचा ओव्हरडोस होतो हे तुम्हाला कळत नाही आणि बऱ्याचदा तुमच्या या ओव्हरडोसमुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही त्याचा त्रास होत असतो याची तुम्हाला जाण असायला हवी. तसंच तुम्ही डिओ जास्त प्रमाणात लावल्यास, तुमच्या त्वचेलाही नुकसान पोहचू शकतं.

4. तुम्ही deo कसा निवडता नक्की

तुम्हाला जर सतत घाम येत असेल तर तुम्ही असा deo निवडा ज्यामध्ये antiperspirants अधिक प्रमाणात असेल. यामध्ये aluminium salt असल्याने घाम शोषून घेतं. तुम्हाला जर घाम कमी येत असेल तर केमिकल्सचं प्रमाण अधिक असणारे डिओ वापरण्याची अजिबात गरज नाही. अधिक घाम येत असल्यास roll-ons आणि gels चा देखील तुम्ही वापर करू शकता. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर यापासून तुम्ही दूर राहिलेलंच चांगलं. 

5. Deodorant तुम्ही perfume प्रमाणे लावाल तर...

Perfumes तुम्ही तुमच्या मनगट आणि कानामागे लावता. कारण हे परफ्युमचे pulse-points आहेत जे बऱ्याच कालावधीपर्यंत परफ्युमचा सुगंध दरवळत ठेवतात. पण हे नियम परफ्युमसाठी आहेत. Deo चा वापर करताना हा नियम लागू होत नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी शरीरावर घाम येतो तिथेच तुम्ही डिओ लावायला हवा. उदाहरणार्थ अंडरआर्म्स (underarms), तुमच्या हाताच्या कोन्याचा (elbow) आतला भाग, गुडघ्याच्या मागे. पुढच्या वेळी डिओ लावताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 

6. झोपण्यापूर्वी कोण लावतं Deo?

Shutterstock

असा विचार का करता तुम्ही? झोपल्यानंतर काय तुम्ही एलियन होता का? माणूसच असता ना? झोपेतही तुम्हाला घाम येत असतो. तुम्ही एकटे जरी झोपत असलात आणि तुम्हाला कोणालाही आकर्षित करायचं नसलं तरीही तुम्ही डिओ लावून झोपल्यास, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अतिशय फ्रेश वाटतं. झोपताना डिओ लावून झोपणंं हा एक चांगला पर्याय आहे. 

7. भैय्या! Deo द्या...कोणतंही चालेल

दुकानात गेल्यानंतर तुम्ही जर असं सांगत असाल तर तुमची खूप मोठी चूक आहे. दुकानात गेल्यानंतर विचारपूर्वक डिओ निवडा. तुमचा बाथिंग बार आणि ब्युटी प्रॉडक्ट्ससह मॅच करणारा डिओच तुम्ही निवडा. बॉडी वॉश आणि मॉईस्चराईजकरिता जर तुम्हाला फ्लोरल scent आवडत असेल तर deodorant देखील तुम्ही फ्लोरल सुगंधाचाच निवडा. नाहीतर या सगळ्याचा सुगंध मिक्स होईल आणि कोणत्याही वस्तूंचा सुगंध नीट येणार नाही. 

8. एकदा लावलं आता बास!

Shutterstock

तुम्हाला जर वाटत असेल की, डिओ एकदा लावला अथवा अगदी डिओ दिवसातून एकदा भरपूर लावलं की, बास झालं. पण असं नाही. साधारण चार तासानंतर पुन्हा एकदा वॉशरूममध्ये जाऊन तुम्ही डिओ लावलेला भाग साफ करा आणि पुन्हा एकदा डिओ लावा. Clean-up करणं यासाठी गरजेचं आहे कारण तुम्हाला येणारा घाम हा तुमच्या अंडरआर्म्समध्ये जमा होतो. तिथे साफ करणं गरेजचं असतं. नाहीतर घाम आणि डिओ असे वास एकत्र होऊन अंगाला दुर्गंधी येऊ लागते. घामावर डिओचा लेअर येऊ देऊ नका. Clean-up साठी तुम्ही wet-wipes चा उपयोगदेखील करू शकता.