एकाएकी चर्चेत आलेल्या या अभिनेत्री सध्या काय करत आहेत, जाणून घ्या

एकाएकी चर्चेत आलेल्या या अभिनेत्री सध्या काय करत आहेत, जाणून घ्या

काही चित्रपटातून अचानक पुढे आलेल्या अभिनेत्री… अचानक कुठे गायब होतात कधीच कळत नाही. यशाच्या शिखरावर असताना या अभिनेत्रींसोबत असे काय होते की, त्यांना अभिनय क्षेत्र सोडून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होते. अशाच काही अभिनेत्रींविषयी आज जाणून घेऊया एकाएकी चर्चेत आल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री आता नेमकं काय करत आहेत.

स्नेहा उल्लाल

Instagram


ऐश्वर्या रॉय सारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून सलमान खान याने स्नेहा उल्लाल या अभिनेत्रीला त्याच्या एका चित्रपटातून ब्रेक दिला. Lucky no time for love या चित्रपटातून दिसली होती. या चित्रपटानंतर ती इतकी प्रसिद्ध झाली की, तिला ऐश्वर्या रॉयची डुप्लिकेट म्हटले जायचे. 2005मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर अनेक तेलुगु चित्रपटातून तिने काम केले. पण आता सध्या ती कोणत्याही मोठ्या बॅनरच्या चित्रपटात दिसली नाही. सध्या ती काय करते  असा प्रश्न पडला असेल तर स्नेहा सध्या अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग करत असून ती अनेक लाईव्ह इव्हेंटसदेखील करते.

भूमिका चावला

Instagram

सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट पाहिला नसेल असे फारच कमी लोक असतील या चित्रपटात राधेच्या नीरजाचे काम भूमिका चावला हिने केले होते. या एका चित्रपटानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. तिला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्सदेखील आल्या. 2003 तेरे नाव चित्रपट आल्यानंतर तिने रन, दिल ने जिसे अपना कहाँ अशा चित्रपटातून काम केले. साऊथ सिनेमातही तिने आपले नशीब आजमावले. धोनी या चित्रपटात तिने धोनीच्या बहिणीचे कॅरेक्टर साकारले होते. त्यामुळे सध्या ती लीड रोलमध्ये फार काही दिसत नाही.

सर्वाधिक मानधन घेणारे हे मराठी कलाकार

ग्रेसी सिंह

Instagram

2001 साली आलेल्या आमीरच्या लगान या चित्रपटातील लीड रोलमधून ग्रेसी सिंह पहिल्यांदा स्क्रिनवर दिसली. या चित्रपटातील तिने साकारलेली गौरीची भूमिका फारच गाजली. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारानेही गौरविण्यात आले. पण त्यानंतर तिने फार काही काम केले नाही. गंगाजल, मुन्नाभाई एम बी बी एस अशा चित्रपटातून तिने काम केले खरे. पण तिने चित्रपटांना फार लवकर राम राम केले. पण सध्या ती तिचे डान्स शो जास्त इन्जॉय करत आहे.

अंतरा माळी

Instagram

अंतरा माळी नावाची अभिनेत्री तुम्हाला आठवते का बघा? गायब, मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ, नाच, रोड, मिस्टर या मिस या चित्रपटात काम केलेली अंतरा माळी तिच्या बोल्डनेसमुळे फारच प्रसिद्ध झाली होती. अभिषेक बच्चन, आफताब शिवदासानी, तुषार कपूर यांच्यासोबत तिने काम केले. पण पुढे काही काम करण्याआधीच तिने चित्रपटात काम करणे सोडून दिले. सध्या ती काय करते याबद्दल काहीच माहिती नाही.

कोण आहे जान्हवी मेहता?

नीलम कोठारी

Instagram

 हा ही तिच नीलम जी अंजलीला कुछ कुछ होता है मध्ये आवडत होती. पण आता ती काय करते असे म्हणत असाल तर तिने 90 च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले. तिचा तो गोड चेहराच अनेकांना आवडायला.  नीलम कोठारीने 2011 साली समीर सोनीशी लग्न केले. सध्या ती चित्रपटात नसली तरी ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.


या काही अभिनेत्री आहेत. ज्यांना प्रसिद्धी मिळाली पण त्या फार काळ बॉलीवूडमध्ये राहिल्या नाहीत.

17 वर्षांनी पुन्हा येणार संजीवनी मालिका