अनिकेत विश्वासरावच्या 'सासूचा डान्स' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अनिकेत विश्वासरावच्या 'सासूचा डान्स' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता विश्वासराव मागील वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकला होता. अनिकेतने स्नेहा चव्हाण या अभिनेत्रीसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी ‘ह्रदयात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. सोशल मीडियावर सध्या अनिकेतच्या सासूचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्नेहाने तिच्या आईचा हा भन्नाट डान्स व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केला आहे. या सोबत स्नेहाने तिच्या आईबाबतच्या भावनादेखील शेअर केल्या आहेत. स्नेहाने लिहीलं आहे की, “ कोण म्हणेल ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहापट उर्जा आणि उत्साह तिच्यामध्ये आहे.”  या व्हिडिओमध्ये तिची आई स्वयंपाक करता करता अचानक डान्स करू लागली आहे. स्री या चित्रपटातील ‘मिलेगी मिलेगी’ या गाण्यावर हा अफलातून डान्स केला आहे. ज्यामुळे हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनिकेत झळकणार ये रे ये रे पैसाच्या रिमेकमध्ये

मागील वर्षी ये रे ये रे पैसा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा या चित्रपटाचा रिमेक येत आहे. पहिल्या भागात उमेश कामत, तेजस्विनी पंडीत, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव यांच्या कॉमेडीची धमाल पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव,अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या "ये रे ये रे पैसा 2 " या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात अश्विनी ये गा या गाण्याचं रिमिक्स

मुंबईत झालेल्या एका म्युजिक लॉंच सोहळ्यात "ये रे ये रे पैसा २"  या चित्रपटाची गाणी प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर  उपस्थित होते. कारण या चित्रपटात अश्विनी ये ना हे लोकप्रिय गाण्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात ‘अश्विनी ये ना’ हे गाणे स्वरबद्ध करण्यात आलं असून या चित्रपटातील इतर दोन गाणी शाल्मली खोलगडे, मिक्का सिंग यांनी गायली आहेत. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या चित्रपटात 'अश्विनी ये ना' हे गाणं विशेष गाजलं होतं. आता जवळपास 32 वर्षांनी हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. 

या गाण्याबाबत जुन्या कलाकारांनी मांडलं स्वतःचं मत

"अश्विनी ये ना...." गाण्याच्या रिमेकविषयी अशोक सराफ आणि चारुशीला साबळे या कलाकारांनी आपलं मत शेअर केलं, 'हे गाणं ऐकून ३२ वर्षांपूर्वीची आठवण झाली. हे गाणं त्यावेळी ज्या पद्धतीने केलं, त्याचा ताल, चाल यासाठी संगीतकार अरूण पौडवाल यांना सलाम आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं हे पहिलं मराठी गाणं  होतं. मराठी चित्रपट संगीतातलं हे माईलस्टोन गाणं आहे. सचिन पिळगांवकर यांनी या गाण्यातल्या स्टेप्स बसवल्या होत्या. हे गाणं चित्रीत करताना मजा आली होती. जवळपास एकाच टेकमध्ये प्रत्येक स्टेप ओके झाली होती. त्यावेळी हे गाणं इतकं लोकप्रिय होईल असं वाटलं ही नव्हतं. या गाण्याने खूप लोकप्रियता दिली.'  तर गाण्याचा नृत्यदिग्दर्शक चित्रीकरणाच्या दिवशी न आल्याने आयत्यावेळी गरज म्हणून या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केल्याची आठवण सचिन पिळगांवकर यांनी सांगितली. 

अधिक वाचा

Good News: ग्रॅबिएलाने दिला गोंडस मुलाला जन्म, अर्जुन पुन्हा झाला बाबा

त्या मोटरमनचं नेमकं चुकलं काय?,नेचर्स कॉल कोणीच चुकवू शकत नाही

14 महिन्यांनंतर सोनम कपूर आणि नवऱ्यामधील दुरावा संपणार

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम