आपल्या देशात फळ खाणं हे नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने चांगलं समजण्यात येतं कारण यामध्ये असे अनेक गुण असतात जे आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात. या फळांमध्येही अशी काही खास फळं आहेत जी तुमचं आरोग्य तर चांगलं राखतातच पण त्याचबरोबर तुमची त्वचा सुंदर करण्यातही महत्त्वाची भूमिका साकारतात. अशी फळं खाल्ल्याने तुमची त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार होते. त्याच फळांपैकी एक फळ आहे ते म्हणजे किवी (Kiwi). बाहेरून दिसायला हे फळ जरी आकर्षक दिसत नसलं तरीही या फळाचे फायदे अनेक आहेत. अनेक जणांना या फळाबाबत माहिती नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला या लेखातून किवीबद्दल इत्यंभूत माहिती देणार आहोत. कारण हे फळ त्वचेसाठी वरदान असून नक्की याचा उपयोग आपल्यासाठी कसा करून घ्यायचा हे आपण जाणून घेऊया.
बऱ्याच लोकांना किवी या फळाबाबत माहिती नाही. आता गेल्या काही वर्षात किवीबद्दल जागरूकता झाली आहे. याचे गुण लक्षात घेता आता याची मागणीही वाढू लागली आहे. आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी हे अतिशय पोषक आहे. म्हणजेच याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूपच जास्त आहे. आपल्या रोजच्या डाएटमध्ये तुम्ही हे फळ समाविष्ट करून घेतल्यास याच्या पोषक तत्वाचा लाभ तुम्हाला घेता येतो. किवीची चव ही दुसऱ्या फळांपेक्षा थोडी वेगळी असते. थोडंसं आंबट हे फळ असून यामध्ये विटामिन सी असतं. त्याचमुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार दिसते. वजन कमी करण्यासाठीदेखील तुम्हाला किवीचा उपयोग होतो. तुम्हाला फिट आणि तजेलदार राहायचं असेल तर तुम्ही रोज एक तरी किवी खायला हवं. याचा तुमच्या शरीराला जास्तीत जास्त फायदा होत असतो हे जाणून घेणं गरजेचं आहे.
थोडंसं भुऱ्या रंगाची परत असणारं अंडाकार आकाराचं हे किवी फळ म्हणजे अँटिऑक्सिडंट्ससाठी पॉवरहाऊस आहे. काही दिवस तुम्ही रोज जर हे एक फळ खाल्लंत तर तुमच्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे. किवीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरातील आजार दूर होतात.
किवीवर केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, किवीमध्ये संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन सी असतं. त्यामुळे हेल्थ एक्स्पर्टदेखील डाएट फॉलो करताना रोज त्यामध्ये किवीचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तुम्हाला माहीत आहे का? साधारण 100 ग्रॅम किवीमध्ये 154 टक्के इतक्या प्रमाणात विटामिन सी असतं. जे विटामिन सी चा स्रोत समजण्यात येणाऱ्या संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांंपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
याचबरोबर तुम्ही निरोगी राहण्यासाठी सर्वात गरजेचं असणारं विटामिन ए देखील किवी या फळामध्ये अंतर्भूत असतं. ही दोन्ही विटामिन्स अप्रतिम अँटिऑक्सिडंट्स असून आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे. किवीमध्ये विटामिन सी असल्यामुळे आपली इम्यून सिस्टिम अर्थात प्रतिकारशक्ती क्षमता अधिक चांगली होण्यास मदत होते. तसंच शरीरामध्ये होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचण्यासदेखील याची आपल्याला मदत होते.
बदलत्या वातावरणानुसार जे बॅक्टेरिया पसरतात त्याने इन्फेक्शन होत असतं. पण किवी त्यापासून संरक्षण करण्यास मदत करतं. तुम्ही तुमच्या रोजच्या डाएटमध्ये किवीचा समावेश करून घेतलात तर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम अर्थात पचनक्रिया मजबूत होऊन आजारांवर मात करण्यासाठी तुमच्या शरीराला अधिक बळ मिळतं. यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर निघून जातात.
किवीमध्ये फायबर असतं आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने कार्डिओवॅस्क्युलर आजार, सीव्हीडी अथवा कोरोनरी हार्ट आजार होण्याची शक्यता कमी होते. हाय फायबरयुक्त असल्यामुळे किवी हे रक्तदाब, कोलस्ट्रॉल आणि ब्लडशुगर नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं.
किवी एक असं फळ आहे ज्यामध्ये चरबीयुक्त कोणतीही मात्रा नाही. तसंच यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात फायबर स्वरूपात असतात. किवीमध्ये फायबर असल्यामुळे तुम्हाला ते खाल्ल्यावर लवकर भूक लागत नाही आणि त्यामुळे सतत खाण्याची तुमची इच्छा राहात नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास याची मदत होते. तुम्ही योग्य आणि प्रमाणात खायला लागता.
आजकाल लोक आपल्या शरीराकडे जास्त लक्ष पुरवताना दिसतात आणि प्रत्येकाला फिट राहायचं असतं. त्यामुळे बरेच लोक औषधं आणि सप्लिमेंट्सचा उपयोग करताना दिसतात. पण फिट राहण्यासाठी बाजारामध्ये असलेली औषधं आणि सप्लिमेंट्स हे तुम्हाला काही काळासाठीच फिट ठेवतात. त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स अर्थात दुष्परिणाम दिसू लागतात. पण किवी खाल्ल्याने तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. तर यामधील समाविष्ट असणारे पोषक तत्व तुमच्या शरीरातील नको असलेली चरबी काढून टाकण्यास मदत करतात. तुमचं शरीर निरोगी राहण्यासाठी किवीची खूपच मदत होते. बऱ्याचदा तुम्ही पाहात असाल की, बरेच लोक वर्कआऊट केल्यानंतर किवीची स्मूदी पितात. हेल्थ एक्स्पर्ट्सच्या म्हणण्यानुसार, किवीमध्ये विटामिन ई, फोलेट, विटामिन सी आणि पोटॅशियमबरोबरच अनेक गुण असतात. ज्याचा शरीरावर डायरेक्ट चांगला परिणाम होत असतो. या सगळ्या गोष्टी किवीला आपल्या शरीरासाठी उपयुक्त बनवतात. किवीमध्ये एसटिनिडेन नावाचं एका एंजाईम असतो. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहून चरबी कमी करण्यासाठी मदत होते. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, यामुळे पोट भरलेलं वाटत राहातं आणि आजार निघून जातात. किवी केवळ मेटबॉलिजम वाढवत नाही तर तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठीदेखील याची मदत होते.
किवी तुमच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा आणि चमक राखण्यासाठी फायदेशीर आहे. केवळ फिटनेसच नाही तर त्वचेसाठीदेखील किवी हे एक वरदान आहे. किवीने त्वचेला कसा फायदा मिळतो हे आपण जाणून घेऊया.
जसं वय वाढत जातं तसं चेहऱ्यावर सुरकुत्या येतात आणि वय दिसायला लागतं. त्यामुळे बरेच जण महाग आणि केमिकलयुक्त अशा त्वचा उत्पादनांचा वापर करतात, पण त्याऐवजी तुम्ही किवीचा वापर करून पाहा. यातील विटामिन सी तुमच्या त्वचेला चमकदार आणि तरूण दिसण्यासाठी सहाय्य करतात.
तुमच्या त्वचेला अॅक्नेचा त्रासस असल्यास, तुम्ही किवीचा वापर करू शकता. किवीमध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी घटकांमुळे अॅक्नेबरोबर किवी योग्य लढा देतं. तसंच किवमध्ये त्वचेवर निर्माण होणाऱ्या तेलाला नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते.
वयानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि एजिंग स्पॉट्स किवी फळातील अँटिऑक्सिडंट्स दूर ठेवायला मदत करतात. साधारण तिशीनंतर तुम्ही काळजी म्हणून बदाम आणि किवीचा फेसपॅक बनवूनदेखील लावू शकता.
किवीमध्ये असणारे अमिनो असिड आणि विटामिन सी हे तुमचं सूर्यकिरणांपासून संरक्षण करतं. तसंच सूर्यकिरणांमुळे त्वचा टॅन झाली असेल तरीही याचा उपयोग होतो
तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं अर्थात डार्क सर्कल्स जमा झाली असतील तर कोणतेही कॉस्मिक उत्पादन वापरण्यापेक्षा किवी हा चांगला पर्याय आहे.
किवीमध्ये ते सर्व घटक आहेत जे तुमच्या त्वचेला अधिक तजेलदार बनवतात. तसंच किवीमध्ये त्वचेच्या समस्या दूर करणारेही सर्व घटक आहेत. याचा वापर करून तुम्ही अधिकाधिक सुंदर दिसू शकता. बाजारात येणारी महाग क्रिम्स वापरण्यापेक्षा तुम्ही किवीचा घरच्या घरी फेसपॅक बनवून उपयोग करून घेऊ शकता. यातील कोलेजन त्वचेला लाईट करण्यासाठी मदत करतं. तर त्वचा अधिक मऊ आणि मुलायमदेखील होते. याशिवाय किवीमुळे डोळेही चांगले होतात. घरच्या घरी किवीचे फेसपॅक कसे बनवायचे जाणून घेऊया. किवीचा फेसपॅक वापरल्याने त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते.
किवी टोनरचा त्वचेवर जादुई परिणाम होतो. याचा वापर केल्याने त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज कमी होते आणि त्वचा अधिक चमकदार होते. जाणून घेऊया घरच्या घरी कसा करायचा टोनर
साहित्य
कसा बनवाल किवी स्किन टोनर
स्टेप 1: किवी नीट साफ करून त्यावरील साल काढा आणि मॅश करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घाला
स्टेप 2: आता या पेस्टमध्ये ताजेपणासाठी गुलाबपाणी घाला आणि मग त्यात मधाचे काही थेंब घाला
स्टेप 3: या पेस्टच्या गरजेनुसार त्यात अगदी थोडं पाणी मिसळा आणि तुमचा किवी स्किन टोनर तयार आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा टोनर लावा
किवी तुम्हाला नुसतं खाता येतंच. पण त्याव्यतिरिक्त तुम्हाला त्याच्या इतर गोष्टी करूनही खाता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किवीची स्मूथी बनवू शकता. आम्ही तुम्हाला किवीचे काही पदार्थ कसे बनवयाचे याची रेसिपी देत आहोत.
स्टेप 1: किवी स्मूदी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारातून ताजे किवी आणून धुवून घ्या
स्टेप 2: यासाठी तुम्हाला किवीबरोबरच दही, मध आणि बदाम या वस्तूदेखील लागतात त्या सर्व एका ठिकाणी ठेवा
स्टेप 3: या सगळ्या वस्तू एकत्र करून कंटेनरमध्ये घाला. त्यानंतर तुम्ही ती मॅश्ड करून घ्या. किवी स्मूदी अधिक हेल्दी बनवण्यासाठी तुम्हाला आवडत असलेले पदार्थही घालू शकता. जेणेकरून तुमचं पोट अधिक काळ भरलेलं राहील.
स्टेप 1: किवी स्मूदी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारातून ताजे किवी आणून धुवून घ्या
स्टेप 2: यासाठी तुम्हाला किवीबरोबरच पालक, नाशपाती आणि सफरचंद हे पदार्थ लागतात त्या सर्व एका ठिकाणी ठेवा.
स्टेप 3: या सगळ्या वस्तू एकत्र करून कंटेनरमध्ये घाला. त्यानंतर तुम्ही ती मॅश्ड करून घ्या. किवी स्मूदी अधिक हेल्दी बनवण्यासाठी तुम्हाला आवडत असलेले पदार्थही घालू शकता. गरमीच्या दिवसात तुम्ही हे करून पिऊ शकता.
स्टेप 1: कलिंगडाच्या बिया काढून त्याचे स्लाईस करून घ्या
स्टेप 2: किवी, लिंंबाचा रस आणि साखर एकत्र करून कंटेनरमध्ये घाला. हे व्यवस्थित मॅश्ड करून घ्या
स्टेप 3: हे कंटेनरमधून काढल्यानंतर एका बाऊलमध्ये हे सारण घाला आणि त्यावर सी सॉल्ट अर्थात काळं मीठ घाला आणि बाजूने कलिंगडाचे स्लाईस लावा. एक चमचा हे सूप आणि कलिंगड स्लाईस असं खा
प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. किवी जसं शरीरासाठी लाभदायक आहे तसंच याचे काही साईड इफेक्टही आहेत. याबाबत जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे.
गरोदरपणात महिलांना रोज साधारण 400 ते 600 मायक्रोग्रॅम फॉलिक असिडची गरज भासते. हे किवीतून मिळतं. गर्भातील बाळाच्या विकासासाठी हे चांगलं असतं. पण काही जणींना गरोदरपणात काही गोष्टी खाण्यापासून थांबवलं जातं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किवी खाऊ नये.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नये. पण ज्या व्यक्तींना टाईप 2 मधुमेह आहे त्या व्यक्ती दिवसातून एक किवी खाऊ शकतात.
किवीमध्ये विटामिन ई चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे त्वचेवरील पिंपल्स निघून जातात. तसंच सर्दी खोकला यासारखे लहान सहान आजारही याने दूर होतात.