शेंगाचा कोणताही प्रकार हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. डाळी, सोयाबीन, मटर, काळे चणे, लाल चणे आणि पांढरे वाटाणे हे सर्व प्रोटीनयुक्त असतात. छोले आणि काळे चणे यांना भारत आणि मध्य पूर्व देशात आवडीने खाल्लं जातं. हे दोन्ही चण्याचे प्रकार आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.
छोले आजकाल सॅलड, सूप, डीप किंवा करीच्या रूपात तुम्ही करू शकता. हिरव्या पालेभाज्या असोत वा नॉनव्हेज सर्व पदार्थांमध्ये तुम्ही चण्याचा समावेश करू शकता. चण्याचा समावेश जेवणात केल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटीक वाटतं. तर काळे चणे खाण्याचेही अनेक फायदे आहेत. मोड आलेले काळे चणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
*जर तुम्ही भाजलेले लाल चणे गुळासोबत खाल्ले तर तुमची आर्यनची गरज पूर्ण होते. त्यामुळे तुमच्या शरीराला उर्जाही मिळते. थंडीच्या दिवसात खासकरून शरीराला उब मिळण्यासाठी आपल्याकडे लाल चणे आणि गूळ खाल्ला जातो.
*कडधान्याच्या रूपातील चणे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आर्द्रता, कॅल्शिअम आणि आर्यन आणि व्हिटॅमीन के चा चांगला स्त्रोत आहेत. चला जाणून घेऊया दोन्ही प्रकारचे चणे खाण्याचे काय काय फायदे आहेत.
Shutterstock
काबुली चणे खाण्याचे फायदे
– सफेद काबुली चण्यांमध्ये लोह सत्त्वामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगलं राहतं. तसंच यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते.
– वजन कमी करण्यासाठीही चण्याचं सेवन उपयुक्त ठरतं. कारण चणे खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहतं. तर याउलट अशक्त लोकांसाठी हे वजन वाढवण्यास उपयुक्त ठरतं.
– कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यातही हे मदत करतं. काबुली चण्यातील पोटॅशिअम रक्तदाबाला कंट्रोलमध्ये ठेवतं.
– महिलांमधील अनेक समस्यांवर काबुली चण्यांचं सेवन खूपच फायदेशीर असतं. कारण हे हार्मोन कंट्रोल करतं.
Shutterstock
भिजवलेले चणे खाण्याचे फायदे
– काळ्या चण्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनक्रियेसाठी खूपच फायदेशीर असतं. रात्रभर चणे पाण्यात भिजवून ठेवून ते खाल्ल्यास बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. तसंच चणे भिजवलेलं पाणी फेकून न देता ते प्यायल्यासही फायदा होतो.
– मधुमेहाच्या रूग्णांसाठीही चणे खाणं खूपच उपयोगी असतं.
– जर तुम्ही अॅनिमिक असाल तर चणे खाण्याची सवय करून घ्या. कारण हे त्यांच्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी चण्यांचं सेवन खूपच चांगलं असतं. कारण चणे हा लोह सत्त्वाचा खूप चांगला स्त्रोत आहे.
– तसंच चण्याचं पाणी हे चेहऱ्यासाठीही उत्तम आहे. चणे भिजवलेल्या पाण्याने तुम्ही चेहरा धुतल्यास तो उजळतो.
Shutterstock
चणे खाण्याचे काही तोटे
चणे खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही दुष्परिणामही आहेत. जर प्रमाणात चण्याच्या कोणत्याही प्रकाराचं सेवन केलं तर ते फायदेशीर ठरतं. पण चणे जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास शरीरातील आतड्यांना त्रास होऊ शकतो. ज्यामुळे पोटात गॅस होण्याची तक्रार उद्भवू शकते. त्यामुळे चण्याच्या कोणत्याही प्रकारचं सेवन हे योग्य प्रमाणातचं करावं.
हेही वाचा –
वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर
वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी