आपली त्वचा सुंदर दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. चेहरा आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध असतात. तुमचा स्किन टोन आणि त्वचेचा दर्जा चांगला राहण्यासाठी चारकोल ब्युटी उत्पादनांचा वापर करणं आजकाला बरेच जण करताना दिसतात. चारकोल हे तुमच्या त्वचेचा स्किन टोन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं मानलं जातं. त्यामुळे आजकाल या उत्पादनांचा वापर आपलं सौंदर्य जपण्यासाठी केला जातो. पण अजूनही बऱ्याच जणींना याविषयी जास्त माहिती नाही. नक्की चारकोल उत्पादनांमध्ये काय आहे आणि कशाचा वापर करता येऊ शकतो हे काहींना माहीत नसतं. चारकोल उत्पादनांमध्ये फेशिअल स्क्रब, फेस मास्क आणि अन्य त्वचेसंबंधित उत्पादनांचा समावेश असून नैसर्गिकरित्या याचा चांगला उपयोग करता येतो. याविषयी सर्व काही माहिती आम्ही तुम्हाला आमच्या लेखातून देणार आहोत.
चारकोल म्हणजे नक्की काय आणि हे आपल्या त्वचेसाठी वापरणं योग्य आहे का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. वास्तविक चारकोल हा प्रक्रियाकृत कार्बनचा एक प्रकार आहे जो त्वचेपासून टॉक्झिक अर्थात त्वचेतील विष शोषून घेण्यास मदत करतो. बऱ्याच उत्पादनांमध्ये सक्रिय कोळशाला सक्रिय कार्बन म्हणूनदेखील ओळखलं जातं. ओरल फॉर्म्युलेशन्स, सौंदर्य उत्पादनं इत्यादी स्वरूपात याचा वापर केला जातो. विषबाधेवरील उपचार, विषारीपणा कमी करणे, हँगओव्हरला प्रतिबंध करणे आणि इतर अतिरिक्त फायद्यांमध्ये चारकोलची मदत होते. तर चारकोलचा अधिक फायदा हा त्वचेची देखभाल आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये होतो. प्रदूषणामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण, चेहरा साफ करण्यासाठी चारकोल उत्पादनांचा वापर करता येतो. मुळात यामध्ये कोळसा असल्याने हे सर्व उत्पादन नैसर्गिक असून त्वचेसाठी चारकोल नक्कीच उपयुक्त आहे. त्वचा शुद्ध करण्यासाठी सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सक्रिय कोळशाला अर्थात चारकोलला सुरक्षित पदार्थांपैकी एक म्हणून संबोधलं जातं. कोरड्या ते तेलकट त्वचेपर्यंत असलेल्या सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे उपयुक्त आहे. बॉडी स्क्रॅब, केसांसाठी स्पा उत्पादनं आणि फेसमास्क यासाठी चारकोलची उत्पादनं खूपच उपयुक्त ठरतात.
चारकोलचा वापर हा त्वचेचे डिटॉक्सिफिकेशन, दातामध्ये सफेदपणा आणण्यासाठी आणि ऑईल कंट्रोल एजंट म्हणून जास्त प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळे चारकोलचा वापर यासंबंधित उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात करण्यात येतो.
आपल्या सगळ्यांनाच चॉकलेट खाणं, कॉफी पिणं आणि आईस्क्रिम खाणं नक्कीच आवडत असतं. यामध्ये जास्त प्रमाणात कॅफेन असतं. त्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो दातावर. तुमचे दात पिवळे पडू लागतात. पण टूथपेस्टमध्ये असणाऱ्या चारकोलमुळे तुमच्या दातावरील पिवळटपणा दूर करायला मदत होते. त्यात समाविष्ट असलेला कोळसा हा दातावरील पिवळटपणा काढून टाकायला मदत करतो.
फेसमास्कमधील चारकोल हे आजकाल मुख्य घटक आहे. तुमच्या त्वचेला डीप क्लिन्झिंग आणि त्यावरील पोअर्स कमी करण्यासाठी चारकोल असणारे फेसमास्क अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे बाजारात या चारकोलच्या उत्पादनांना जास्त मागणी आहे. यामध्ये असणारं चारकोल तुमच्या चेहऱ्यावरील टॉक्झिन शोषून घेतं आणि तुमचा चेहरा अधिक तजेलदार बनवतं. चेहऱ्यावरील पोअर्स कमी करण्यासाठीही याची मदत होते.
तेलकट त्वचा ही सर्व प्रकारात थोडी गुंतागुंतीची त्वचा असते. या त्वचेवर कोणत्याही उत्पादनाचा वापर करताना विचार करावा लागतो. पण या त्वचेवरही तुम्ही चारकोलच्या उत्पादनांचा वापर करू शकता. तेलकट त्वचेवरील तेल नियंत्रणात आणण्यासाठी चारकोलचा साबण, फेसमास्क, क्लिन्झर्स, पोअर स्ट्रिप्स याचा वापर करता येतो. काही डॉक्टर्सदेखील चारकोलच्या या उत्पादनांची शिफारस तेलकट त्वचेसाठी करताना दिसतात. त्यामुळे अशा त्वचेसाठी चारकोल उपयुक्त ठरतं.
बाजारामध्ये अनेक चारकोलची उत्पादनं उपलब्द आहेत. त्यापैकी काही अप्रतिम उत्पादनांची माहिती आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे फायदे आणि दुष्परिणाम काय आहेत याचीही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
हे उत्पादन आयुर्वेदाने प्रभावित होऊन बनवण्यात आलं आहे. तुमची त्वचा चांगली होण्यासाठी या उत्पादनामध्ये चारकोलचा वापर करण्यात आला आहे. तुमच्या त्वचेवरील पोअर्स काढून टाकण्यासाठी यामध्ये बांबू चारकोल आणि अन्य नैसर्गिक उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे. तुमची त्वता चमकदार ठेवण्यासाठी आणि त्वचेवरील तेल काढून टाकण्यासाठी याचा उपयोग करता येतो.
फायदे
- 100 टक्के वेगन
- पॅराबेनमुक्त
- सिलिकॉनमुक्त
- मिनरल ऑईलमुक्त
तोटे
काहीही नाही
तुमची त्वचा अधिक टाईट करण्याचा आणि अधिक उजळवण्याचा दावा हा फेसमास्क करतो. तसंच तुमच्या त्वचेची काळजी घेऊन यावरील अॅक्ने काढून टाकण्याचाही दावा या उत्पादनाकडून करण्यात येतो. तुमच्या त्वचेवर साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल या उत्पादनामुळे निघून जातं.
फायदे
- डर्मिटॉजिकली परीक्षण करण्यात आलेले
- पॅराबेनमुक्त
- सिलिकॉनमुक्त
- सल्फेटमुक्त
- कोणत्याही प्राण्याचे घटक यामध्ये समाविष्ट नाहीत
- सिंथेटिक सुगंध यामध्ये नाही
तोटे
काहीही नाही
तुमच्या त्वचेवर साचलेली घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्याचं काम हे चारकोल मास्क करतं. तुमच्या त्वचेवरील पोअर्स काढून टाकण्याचं कामही हे मास्क करतं. यामुळे तुमची त्वचा डिटॉक्सिफाय तर होतेच शिवाय त्वचेच्या अन्य समस्या दूर होण्यासही याचा फायदा होतो.
फायदे
- तेलकट आणि कोरड्या दोन्ही त्वचेसाठी योग्य
- पॅराबेनमुक्त
- ऑईलफ्री फॉर्म्युला
- कृत्रिम सुगंध यामध्ये नाही
तोटे
महाग आहे
हे उत्पादन तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. तुमच्या त्वचेच्या संपूर्ण खोलवर जाऊन याचा चांगला परिणाम होत असतो. यामध्ये तुळशीचा अर्क असल्याने हे तुमच्या त्वचेवरील अॅक्ने काढून टाकण्यासाठी उपयोगी ठरतं.
फायदे
- नैसर्गिक घटकांचा समावेश
- पीएच बॅलेन्स
- सल्फेट मुक्त
- आठवड्यातून तुम्ही 3 - 4 वेळा याचा वापर करू शकता
तोटे
काहीही नाही
हे उत्पादन तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी असून तेलावर नियंत्रण ठेवायचा दावा करते. बांबू चारकोल हे यातील महत्त्वाचा घटक आहे. यामुळे तुमच्या त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. तसंच यामध्ये चीनी मातीचाही वापर करण्यात आलेला असून यामुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत होते.
फायदे
- पॅराबेन मुक्त
- सल्फेट मुक्त
- यामध्ये पॅराफिन, मिनरल ऑईल्स आणि पेट्रोलियमचा समावेश नाही
- कोणत्याही प्राण्याच्या घटकांचा समावेश यात नाही
तोटे
महाग आहे
हे एक आयुर्वेदिक उत्पादन असून तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. यात चारकोल असल्यामुळे प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेवर साचलेली धूळ काढून टाकण्यासाठी याची मदत होते.
फायदे
- नैसर्गिक घटक
- सर्व त्वचेसाठी उपयुक्त
- पॅराबेन मुक्त
- कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा समावेश नाही आणि मिनरल ऑईलमुक्त
तोटे
काहीही नाही
हे उत्पादन सौम्य असलं तरीही अतिशय परिणामकारक आहे. त्वचा क्लिन करण्यासाठी आणि अॅक्ने काढून टाकण्यासाठी या चारकोल फेसमास्कचा चांगला उपयोग होतो. तसंच तुमच्या त्वचेवरील पोअर्स कमी करून तुमची त्वचा उजळवण्यासाठीही याची मदत होते. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी याचा वापर करता येतो.
फायदे
- परवडण्यायोग्य
- वापरण्यास सोपं
- ऑईल कंट्रोल
- चांगला सुगंध
तोटे
काहीही नाही
चेहऱ्यावरील तेल कमी करण्यासाठी आणि अॅक्ने काढून टाकण्यासाठी या चारकोल फेसमास्कचा उपयोग होतो. त्वचेवर जमा झालेली घाण आणि धूळ काढून टाकण्यासाठीही याचा वापर करता येतो. चारकोलमुळे धूळीचे कण त्वचेबाहेर शोषून घेण्यास मदत होते.
फायदे
- परवडण्यायोग्य
- तेलकट त्वचेसाठी उपयुक्त
तोटे
पॅराबेन समाविष्ट
चारकोलचे जसे फेसमास्क असतात त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला काही चारकोल पील ऑफ मास्कदेखील सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्हाला तुमची त्वचा सुंदर करता येईल.
तुमची त्वचा रिहायड्रेट करण्यासाठी आणि त्वचेला उजळपणा आणण्यासाठी या उत्पादनाची मदत होते. या चारकोलच्या मदतीने तुम्ही तुमचे डेड स्किन सेल्स काढून टाकून चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठीही उपयोग करू शकता. तसंच यामधील मिनरल्स असल्यामुळे तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी मदत होते. त्वचेतील टॉक्झिन्स आणि बॅक्टेरियाविरूद्ध लढा देण्यासाठी या उत्पादनाचा उपयोग होतो.
फायदे
- परवडण्यायोग्य
- तेलकट त्वचेसाठी उपयुक्त
तोटे
काहीही नाही
दाताचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी या उत्पादनाचा वापर होतो. तुम्हाला जर थोडी दातदुखी असेल तर चारकोलयुक्त ही पावडर तुम्हाला नक्कीच मदत करेल. तसंच दातावरील पिवळटपणा हटवण्यासाठी याचा खूपच उपयोग होतो. याशिवाय ही पावडर तुम्ही तुमच्या केस आणि त्वचेसाठीही वापरू शकता. ही पावडर तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरते.
फायदे
- दातांसाठी उपयुक्त
- सहज मिळते
- चारकोलचा होतो फायदा
तोटे
काहीही नाही
त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी आणि पोअर्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश असून वापरण्यास अतिशय सोपं आहे. तसंच हे चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा जड होत नाही. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.
फायदे
- कॉम्बिनेशन त्वचा असणाऱ्यांसाठी फायदेशीर
- परवडण्यायोग्य
- त्वचा मऊ होते
- ब्लॅकहेड्स काढण्यास फायदेशीर
तोटे
पहिल्यांदा वापरल्यावर ब्लॅकहेड्स निघताना थोडा त्रास होतो
कोणत्याही व्यक्तीसाठी याचा उपयोग करता येतो. याचा उपयोग तुम्ही स्किन टॅन काढून टाकण्यासाठीही करू शकता. अॅक्ने काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. आठवड्यातून किमान दोन वेळा तुम्ही याचा वापर करू शकता
फायदे
- कॉम्बिनेशन त्वचा असणाऱ्यांसाठी फायदेशीर
- परवडण्यायोग्य
- वापरायला सोपा
तोटे
काहीही नाही
पोअर्स क्लोगिंग घाण काढून टाकण्यासाठी या पील ऑफ मास्कचा उपयोग होतो. तसंच यातील घटकांमुळे तुमच्या त्वचेवरील ब्लॅकहेड्सदेखील निघून जातात. तुमच्या त्वचेवरील बेबी हेअर या उत्पादनामुळे पटकन निघण्यास मदत होते.
फायदे
- नैसर्गिक घटक
- तेलकट त्वचेसाठी
- डॉक्टर्सकडून परीक्षण
- रसायनमुक्त
तोटे
पॅकेजिंग चांगलं नाही
हे चारकोल पील ऑफ मास्क तुमची त्वचा डिटॉक्सिफाय करतं. तुमच्या त्वचेवरील पोअर्स काढून तुमची त्वचा उजळवण्याचं काम करतं. फेशिअल हेअर काढण्यासह तुमच्या ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठीही या उत्पादनाचा उपयोग होऊ शकतो.
फायदे
- नैसर्गिक घटक
- वापरण्यास सोपं
- तेलावर नियंत्रण
तोटे
काहीही नाही
हे चारकोल पील ऑफ मास्क आयुर्वेदिक असून तुमचा चेहरा अगदी हळूवारपणे हाताळतं. तुमची त्वचा मुलायम होण्यास याची मदत होते. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे चारकोल उत्पादन चांगलं आहे असा दावा हे उत्पादन करतं. तसंच हे पुरुष आणि महिला दोघेही वापरू शकतात.
फायदे
- आयुर्वेदिक घटक
- पेराबॅनमुक्त
- मिनरल ऑईलमुक्त
तोटे
चांगलं पॅकेजिंग नाही
यामध्ये चारकोलचं प्रमाण जास्त असून तुमच्या त्वचेवरील सर्व टॉक्सिन्स काढून टाकण्यास याची मदत होते. त्वचेवरील घाण निघून जाते. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या लिंबाचा रस आणि हळदीमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
फायदे
- वापरायला सोपं
- चांगलं पॅकेजिंग
- विटामिन ई आणि सी समाविष्ट
तोटे
ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत होत नाही आणि मास्क काढताना दुखतं
या उत्पादनांचा वापर वाढल्यामुळे सौंदर्य उत्पादनांमध्ये चारकोलचाही वापर वाढवण्यात आला आहे. बाजारामध्ये तुमच्या त्वचेला सूट करणारी चारकोलची अनेक उत्पादनं बाजारामध्ये आलेली आहेत. तसंच या उत्पादनांचे काही तोटेही आहेत. पण सध्या चारकोलचा वापर केली जाणारी अनेक उत्पादनं यासाठी विकत घेतली जातात कारण त्याचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होत असतो. तसंच ही उत्पादनं इको फ्रेंडली असल्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही. सौंदर्यप्रसाधानाच्या वापरात होणारी वाढ पाहूनच सध्या चारकोलचा वापर असणारी उत्पादनही वाढत आहेत हे नक्की. जर तुम्हाला तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही उत्पादनं घ्यायची असतील तर आम्ही शिफारस केलेली उत्पादनंही वापरून पाहा.
चारकोलची उत्पादनं ही कोणत्याही त्वचेसाठी वापरता येतात. फक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी नाही ना हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. त्यानंतर तुम्ही याचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास, तुम्हाला काहीही त्याचा तोटा होत नाही.
चारकोलच्या वापराने संवेदनशील त्वचेलाही त्रास होत नाही. कारण हे अतिशय नैसर्गिक आहे. पण तुम्ही कोणतं उत्पादन विकत घेत आहात त्यामध्ये कोणते घटक आहेत हे नीट तपासून पाहा. तुमच्या त्वचेला त्रासदायक ठरणारे कोणतेही घटक यात असतील तर तुम्ही शक्यतो याचा वापर करू नका.
बऱ्याच जणांना असा गैरसमज आहे. पण चारकोल असणारी उत्पादनं ही महाग नसतात. यामध्येदेखील तुम्हाला परवडण्यासारखी बरीच उत्पादन तुम्हाला मिळतात.