कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे फॅमिली कोटस (Best Family Quotes In Marathi)

कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे फॅमिली कोटस (Best Family Quotes In Marathi)

तुमच्या कुटुंबावर तुमचं किती प्रेम आहे? आता तुम्ही म्हणाल की, प्रेम किती आहे हे काय मोजता येणारे का किंवा त्याच काही परिमाण आहे का? नक्कीच नाही. पण अनेकदा सोशल मीडियावर आपण अनेक प्रकारचे कोटस सर्च करतो आणि वाचत असतो. मग ते कधी यशस्वी होण्यासाठी, कधी प्रेरित होण्यासाठी तर कधी अगदी मैत्रीचे कोटसही असतात. पण तुम्ही कधी फॅमिली कोटससाठी सर्च केलं आहे का? जास्तीत आपण वॉट्सअप येणारे कुटुंबासंबंधीचे मेसेजेस एकमेकांना फॉरवर्ड करतो. पण त्यापुढे जाऊन काहीच नाही.

Table of Contents

  कुटुंबाचं आयुष्यातील महत्त्व (Importance of the Family)

  खरंतर कुटुंब या शब्दाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. सुख असो वा दुःख असो…कुटुंब आहे तर आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंब नेहमीच आपल्या आधाराला असतंच. कुटुंब मोठं असो वा छोटं असो मोठं असो प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंस वाटतं. कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्येत असल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंब उभं असतं. आपल्या यशाचं आणि प्रगतीचं सेलिब्रेशनही आपलं कुटुंब एकत्र येऊन करतं. पण असं असलं तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकसारखा नसतो. कोणी थोडं गंभीर स्वभावाचं असतं तर कोणी विनोदी. कोणी शिस्तीचं असतं तर कोणी एकदम मेणबत्तीसारखं विरघळणारं. कोणी एखाद्याचं आवडतं असतं तर काहींमधील विस्तव तर जात पण एकमेकांशिवाय चैनही पडत नाही. एखाद्या सणाला किंवा फंक्शनला तेव्हाच मजा येते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र सेलिब्रेट करतात. कुटुंबाच्या याच छोट्या मोठ्या गोष्टी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास फॅमिली कोटस (Family Quotes), जे कुटुंबातील प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवण्यासाठी परफेक्ट आहेत.

  कुटुंबातील प्रेमाचं समीकरण सांगणारे फॅमिली कोटस (Family Love Quotes)

  कुटुंबात आणि तुमच्यात कधी कोणता मतभेद झाला किंवा दुरावा आला तरी प्रत्येकाचं कुटुंबावरील प्रेम हे कायम असतं. असंच कुटुंबावरील प्रेम व्यक्त करणारे काही खास फॅमिली लव्ह कोटस.

  • बाकी सगळं खोटं आहे, पण कुटुंब आपलं आहे. 
  • कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही.
  • भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही. म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही. 
  • सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं. 
  • आपल्या कुटुंबाला मित्रांप्रमाणे माना आणि मित्रांना कुटुंबाप्रमाणे माना, मग आनंद आपोआपच तुमच्या दाराशी येईल. 
  • कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे. 
  • आपलं कुटुंब हीच आपली खरी ताकत आहे. 
  • जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब आहे. 
  • कुटुंबाने केलेलं कौतुकाची सर जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही. 
  • कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे. 
  • आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत. 

  लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश (Marriage Anniversary Wishes In Marathi)

  कुटुंबाबाबतचे काही विनोदी फॅमिली कोटस (Funny Family Quotes)

  Instagram

  कुटुंब म्हटल्यावर नेहमी गंभीर विचारच केला पाहिजे असं नाही. कुटुंबाची विनोदी बाजू सांगणारे काही विनोदी फॅमिली कोटस. 

  • जर घरचे रोज सकाळी तुम्हाला उशिरापर्यंत झोपायला देत असतील तर ते तुमच्यावर प्रेम करतात असं नाहीतर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय. 
  • हे बघ. इकडे बघ हा मराठी आईबाबांचा मुलांना शांत करण्याचा राष्ट्रीय मार्ग आहे. 
  • कितीही कौतुक करा तुमच्या आईला या दोन गोष्टी कधीच आवडत नाही. हॉटेलचं जेवण आणि तुमच्या आवडीची पोरगी
  • आईच्या फोनचा ब्राईटनेस माझ्या फ्युचरपेक्षाही जास्त ब्राईट आहे. 
  • जर तुमचा भूतांवर विश्वास नसेल तर तुम्ही कधीच फॅमिली रियुनियनला गेला नाहीत. 
  • काही कुटुंबाचा जादुई शब्द प्लीज असतो तर आमच्या घरात मात्र सॉरी आहे. 
  • कुटुंब ही फजसारखी असतात. थोडी गोड थोडी नटी.
  • मुलं तुमच्या घराला उजळवतात, कारण ते कधीच लाईटस बंद करत नाहीत. 
  • मी सहा भावंडासोबत वाढलो आहे. त्यामुळेच मी बाथरूमसाठी थांबल्यावर डान्स करायला शिकलो. 
  • माझं कुटुंब खूपच विनोदी होतं कारण आम्ही कोणीही घर सोडून जायचोच नाही. 

  फॅमिलीबद्दलचे काही शॉर्ट कोटस (Short Family Quotes)

  कुटुंबाची व्याख्या अगदी छोट्या वाक्यातही मांडता येते. मग ते आजी-आजोंबावरील कोट्स असो वा फॅमिलीवरचे काही शॉर्ट कोटस पाहा.

  • एक आनंदी कुटुंब स्वर्गासमान असतं. 
  • जगावर प्रेम करायचं असल्यास सुरूवात कुटुंबापासून करा. 
  • कुटुंब म्हणजे घराचं हृदय आहे. 
  • कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं.
  • कितीही मतभेद असले तरी कुटुंबापेक्षा महत्त्वपूर्ण काहीच नाही. 
  • आनंदी कुटुंब म्हणजे स्वर्गाआधीचा स्वर्ग.
  • कुटुंबासोबतचा वेळ खूपच अमूल्य आहे त्यामुळे तो नेहमी जपून वापरा. 
  • कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी कलाकृती आहे. 
  • कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे सहाय्यक आहेत. 
  • कुटुंब ही मानव समाजातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. 

  रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane For Female & Male)

  Instagram

  प्रेरणादायी फॅमिली कोटस (Inspirational Family Quotes)

  कुटुंबाचं महत्त्व प्रत्येकाला कळलंच पाहिजे. कुटुंबाबाबत प्रेरणादायी विचार मांडणारे काही प्रेरणादायी फॅमिली कोटस  

  • आपली सर्वात मोठी शाळा म्हणजे आपलं स्वतःच कुटुुंब होय.
  • तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो.
  • नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत. नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.
  • घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही, एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात.
  • जी लोकं पैशांना कुटुंब समजतात, ती त्यांची सर्वात मोठी चूक असते.
  • जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.
  • इतर गोष्टी बदलता येतात, पण आपली सुरूवात आणि अंत हा कुटुंबासमवेतच होतो.
  • कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यातील एकजुटीवर अवलंबून असतो.
  • पूर्ण जगात कुटुंबच अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता मिळते.   
  • जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.
  Instagram

  कुटुंबाबतच्या काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगणारे (My Family Quotes)

  प्रत्येक कुटुंबाबाबत आणि नात्याबाबत काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि केल्या तर ते नातं आणि कुटुंबही नेहमी आनंदी राहील.  

  • नातं मजबूत करण्यासाठी एका छोटा नियम आहे, रोज काही चांगल आठवा आणि वाईट विसरून जा. 
  • या जगात आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे. जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं. 
  • कधी मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा. खरं सुख त्यात नक्कीच मिळेल.
  • आपला अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे. 
  • काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं... नात्यात स्थिरता आणण्यासाठी. नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही. 
  • कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी केलेलं भांडण काही मिनिटात संपत पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात.
  • कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळतंही नाही. 

  Birthday Wishes For Friend In Marathi

  कुटुंब आणि वेळेचं महत्त्व सांगणारे काही फॅमिली कोटस (Family Time Quotes)

  Instagram

  आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकजण धावतोच आहे. पण या शर्यतीत धावण्याचं बळ मिळतं ते कुटुंबाकडून म्हणूनच आयुष्यातील शर्यतीतून वेळ काढा आणि तो कुटुंबाला नक्की द्या. नव्या उर्जेसाठी आणि उमेदीसाठी. 

  • जे कुटुंबासोबत घालवले ते आयुष्य आणि जे कुटुंबाविना घालवले ते वय.
  • आपण एका खोलीत राहतो पण ते घर तेव्हाच बनतं जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो. 
  • कुटुंब हे झाडासारखं असतं जे कडक उन्हात सावली देतं.
  • आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा, फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही. 
  • कुटुंब ही अशी एक जागा आहे जिथे आपण मनाने एकमेकांच्या संपर्कात येतो. 
  • तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे ज्यात तुम्ही सुरक्षित असता. 
  • तुमच्या कुटुंबाने जे तुमच्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यासाठी करा. 
  • कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ आणि आनंदात घालवल्याने बनतं. 
  • आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही. 
  • कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं. 

                                                वाचा- लग्नसोहळ्यासाठी चारोळ्या (Marathi Charoli On Wedding)

  कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे काही फॅमिली कोटस (I love My Family Quotes)

  Instagram

  प्रत्येकाचंच आपल्या कुटुंबावर प्रेम असतं. पण कधी कधी ते व्यक्त करणंही गरजेचं असतं. तुम्हालाही तुमच्या कुटुंबावरील प्रेम व्यक्त करायचं असल्यास हे कोटस नक्कीच उपयोगी पडतील. त्याचप्रमाणे त्यांना झोपण्यापूर्वी शुभेच्छा देण्यासाठी वापरा हे शुभ रात्री संदेश मराठीतून

  • कोणताही सोपा मार्ग नको...ना कोणती ओळख हवीयं...एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू हवंय. 
  • खूप नम्रता हवी, नाती टिकवण्यासाठी, छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जातात. 
  • संयम आपल्या चरित्राची किंमत वाढवतो तर मित्र आणि कुटुंब आपल्या आयुष्याची किंमत वाढवतात. 
  • कुटुंब हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. 
  • कुटुंब ही प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते. 
  • मातीचं मडकं आणि कुटुंबाची किंमत फक्त ते बनवणाऱ्यालाच माहीती असते तोडण्याऱ्याला नाही. 
  • आपल्या चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार कुटुंबाला जोडून ठेवतात आणि स्वर्गसमान बनवतात. 
  • जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात. 
  • कागदाला जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते, तसंच कुटुंबातील ती व्यक्ती प्रत्येकालाच खुपते, जी कुटुंबाला जोडून ठेवते. 
  • प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं. 

  जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी कुटुंबाबाबत सांगितलेले फॅमिली कोटस (Best Family Quotes By Famous Personalities)

  जगभरातील काही प्रसिद्ध व्यक्तीनींही कुटुंबाचं महत्त्व सांगणारे विचार मांडले आहेत. पाहूया प्रसिद्ध व्यक्तींनी कुटुंबाबाबत सांगितलेले काही कोटस. 

  • तो एक बुद्धीमान पिता आहे जो आपल्या मुलांना चांगलं ओळखतो. - विल्यम शेक्सपिअर 
              (आपल्या मुलांबद्दल प्रत्येक पित्याला संपूर्ण माहिती असली पाहिजे.)
  • एका व्यक्तीने जगाची यात्रा केली, त्याला काय हवं हे शोधण्यासाठी पण शेवटी तो उत्तर शोधण्यासाठी घरीच आला - जॉर्ज ए मूर  (कुटुंबाच स्थान आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे.)
  • माझ्या आयुष्यातील सर्वात सुखी क्षण मी माझ्या कुटुंबासमवेत घरी घालवले आहेत. - थॉमस जेफरसन. (कुटुंबासमवेत वेळ घालवा.)
  • आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवर सुंदर जीवनाचा आनंद घ्या. - अल्बर्ट आईनस्टाईन
  • कोणत्याही व्यक्तीने व्यवसायासाठी आपल्या कुटुंबाला निराश करू नये. - वॉल्ट डिजनी
  • जगात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट कुटुंब आणि प्रेम आहे. - जॉन वुडन.
  • कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात. - जॉर्ज डब्ल्यू बुश
  • आई-बाबांचा आवाज म्हणजे देवांचा आवाज आहे, कारण त्यांच्यासाठी मुल म्हणजे स्वर्गाची फुलं असतात. - विल्यम शेक्सपिअर.
  • तुम्ही कुठेही गेलात अगदी स्वर्गात जरी गेलात तरी तुमच्या कुटुंबाची आठवण नक्की काढाल. - मलाला युसूफजाई.
  • जगभरात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान फक्त कुटुंबाला आहे. - प्रिन्सेस डायना. 

  कुटुंबाबद्दलचे विचार मांडणारे काही कोटस (Thoughts on Family)

  कुटुंब सुखी तर आपण सुखी असंच कुटुंबाबाबतचं सार सांगणारे काही कोटस.

  • जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होईल. 
  • तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब.
  • कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे, जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही. 
  • नाती जपणं ही एक कला आहे, जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकेल. 
  • कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं. 
  • घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही. 
  • चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबात मिळतात. 
  • कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो. 
  • पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो. 
  • आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे. 

  You Might Like This:

  बालदिनाच्या निमित्ताने चाचा नेहरूंचे विचारधन

  सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी (Seva Nivrutti Messages In Marathi)

  Raksha Bandhan Messages In Marathi - यंदाच्या ‘रक्षाबंधना’ला पाठवा हे शुभेच्छा संदेश

  भावपूर्ण श्रद्धांजली संदेश (Condolence Message In Marathi)

  भावासाठी बर्थडे कोट्स - Birthday Quotes For Brother In Marathi

  Zindagi Shayari in Hindi