भारतात पाऊस पडो अथवा थंडी तरीही वर्षभर आपल्याला त्वचेच्या डीटॅनची समस्या सतावत असते. ही चिंता सर्वांनाच असते. भारतामध्ये कितीही गारवा निर्माण झाला तरीही त्वचा डीटॅन करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. सूर्याची किरणं आपल्या त्वचेच्या डायरेक्ट संपर्कात येत असल्यामुळे आपल्याला अनेक लोकांना त्वचेच्या समस्या उद्भवलेल्या दिसतात. तुम्ही यासाठी त्वचेवर आणि चेहऱ्यावर अनेक क्रिम्सचा वापर करता, त्यावर अनेक सनस्क्रिन्सचाही वापर करता. पण तरीही तुमची त्वचा टॅन होतेच. पण या सगळ्यावर काही उपाय करता येतात का याचा आपण सतत विचार करतो आणि बरेचदा अगदी डॉक्टरांकडे जाऊन पैसेही खर्च करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण घरगुती उपाय करूनही आपल्या त्वचेवरी टॅन घालवू शकतो अर्थात त्वचा डीटॅन (Detan) करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील किचनमध्येच अथवा तुमच्या जवळच्या ग्रोसरी दुकानांमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तू मिळू शकतात. यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनच केवळ निघून जात नाही तर नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेवर निखारही येतो. जाणून घेऊया काय पद्धती आहेत ज्यामुळे तुमच्या चेहरा आणि त्वचेवरील सनबर्नला तुम्ही कायमस्वरूपी गुडबाय म्हणाल.
बऱ्याचदा तुमच्या त्वचेचा रंग वेगळा असतो पण सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेवर काळपटपणा यायला लागतो यालाच टॅन असं म्हणतात. हा रंग तुमच्या मूळ रंगापेक्षा वेगळा उठून दिसतो. त्यामुळे तुमचा चेहरा आणि तुमच्या मांडी अथवा पोटाचा रंग यामध्ये तफावत दिसते. कारण हे भाग कपड्यांनी झाकले असल्यामुळे त्याचा मूळ रंग तसाच राहतो. त्याचा संपर्क सूर्याच्या किरणांशी येत नाही. तो भाग टॅन होण्यापासून सुरक्षित राहातो. पण बाकीच्या भागाचा रंग हा पूर्ण बदललेला असतो. बऱ्याचदा हे डिटॅन करण्यासाठी अनेक क्रिम्स आणि इतर गोष्टींचा वापर करण्यात येतो.
टॉमेटो हा केवळ आपल्या सॅलेडचा भाग नाही. तर आपल्या त्वचेला डिटॅन करण्यासाठीदेखील याची खूपच मदत होते. टॉमेटोमध्ये असणाऱ्या लोईकोपीनमुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरूपात सनस्क्रिन मिळतं. हे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक सनस्क्रिन स्वरूपात काम करतं. यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स सेल्सेना कोणताही धक्का पोहचल्यास, त्वचेवर आलेले रॅश टॉमेटोमुळे साफ होतं. तुम्ही तुमच्या सौंदर्यासाठी टॉमेटोचा वापर नक्कीच करू शकता.
स्टेप 1: काही ताजे टॉमेटो घ्या
स्टेप 2: टॉमेटो क्रश करून त्यातील बी काढून टाका
स्टेप 3: टॉमेटो वाटून घ्या आणि नंतर त्याचा रस तुमच्या चेहऱ्यावर लावा
स्टेप 4: चेहऱ्यावर 15 मिनिट्स हा रस तसाच सुकू द्या
स्टेप 5: यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या
स्टेप 6: आठवड्यातून दोन वेळा तुम्ही असं केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल
कोरफड तुमच्या त्वचेसाठी अतिशय उपयोगी ठरते. विशेषत तेव्हा जेव्हा तुमच्या त्वचेरा रंग जास्त टॅन झाला आहे. हे त्वचेसाठी प्रोटेक्टिव्ह हिलिंग केअर म्हणून काम करतं. त्वचेवर वाढणाऱ्या सुरकुत्या आणि वाढत्या वयाचा परिणाम कमी होण्यासाठीदेखील याची मदत होते. तसंच तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सना कमी करण्यासाठीदेखील नैसर्गिक वस्तू म्हणून याचा उपयोग होतो. आपला चेहरा आणि हाताना डिटॅन करण्यासाठी याचा अशा प्रकारे उपयोग करा.
स्टेप 1: एका भांड्यात तुम्ही कोरफड जेल आणि लिंबाचा रस मिसळून घ्या.
स्टेप 2: नंतर साधारण 15-20 मिनिट्सपर्यंत हे चेहऱ्याला लावून ठेवा
स्टेप 3: ही पेस्ट लावण्यासाठी आणि काढण्यासाठी तुम्ही कापसाच्या गोळ्याचा वापर करा. (असं करणं हे हायजिनिक आहे)
हे मिश्रण तयार करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला लिंबाचा रस आणि एका भांड्यात क्रिस्टल साखर घ्यावी लागेल. लिंबू हे डाग काढण्यासाठी आणि डिटॅन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर सारखेचा उपयोग तुम्हाला स्क्रबप्रमाणे करता येतो. हे मिश्रण याप्रमाणे वापरा :
स्टेप 1: एका लहानशा भांड्यामध्ये लिंबाचा रस आणि साखर मिक्स करून घ्या
स्टेप 2: हे मिश्रण आता आपल्या चेहऱ्यावर लावा
स्टेप 3: सर्क्युलर मोशनमध्ये हे मिक्स्चर त्वचेवर प्रभावित ठिकाणी लावा
स्टेप 4: 20 मिनिट्सनंतर चेहरा धुवा
स्टेप 5: आठवड्यातून एकदा तरी ही ब्युटी ट्रिटमेंट नक्कीच ट्राय करून बघा
बटाटा हा आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. याचा उपयोग तुमच्या त्वचेसाठीही तितकाच चांगला आणि महत्त्वाचा असतो. बटाट्याचं साल काढून बनवलेला ज्युस हा अनेक ब्युटी ट्रिटमेंटसाठी उपयुक्त ठरतो. तुम्हाला पटो वा न पटो त्वचा डिटॅन करण्यासाठी बटाटा अतिशय परिणामकारक घटक आहे. याचा सर्वात जास्त फायदा तुम्ही घेऊ शकता.
स्टेप 1: बटाटा मिक्सरमधून वाटून त्याचा जाड ज्युस काढून घ्या
स्टेप 2: नंतर हा ज्युस एका वाटीत काढा
स्टेप 3: त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा
स्टेप 4: हे मिश्रण तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर लावा
स्टेप 5: अर्ध्या तासानंतर हे भाग साफ करून घ्या. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल
काकडी आणि दूध या दोन्ही गोष्टी त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. काकडी थंड असल्यामुळे तर दुधामध्ये मॉईस्चर असल्यामुळे दोन्ही गोष्टी अतिशय उपयुक्त ठरतात. या दोघांचं मिश्रण हा एक खूपच चांगला फेसपॅक बनतो. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे स्टेप्स करू शकता:
स्टेप 1: ब्लेंडरच्या मदतीने तुम्ही काकडीचा ज्युस काढून घ्या
स्टेप 2: हे ज्युस एका ग्लासात घ्या आणि त्यामध्ये दूध मिसळा
स्टेप 3: हे दोन्ही नीट मिक्स करून घ्या आणि टॅन असलेल्या त्वचेवर लावा आणि लावून साधारण 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा
स्टेप 4: असं दिवसातून नियमित दोन वेळा करा. लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल
दही हे नैसर्गिक मॉईस्चराईजर आहे. त्वचेची चमक योग्य राखण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. हे डेड सेल्सची सफाई करून त्वचेच्या छिद्रांना निरोगी आणि साफ ठेवतं. आपल्या त्वचेला डिटॅन करण्यासाठी दह्याचा असा उपयोग करता येतो :
स्टेप 1: दही आणि लिंबाचा रस एक बाऊलमध्ये मिक्स करा
स्टेप 2: आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर हे मिश्रण लावा
स्टेप 3: 30 मिनिट्स लावून ठेवल्यावर नंतर धुवा
स्टेप 4: चांगल्या परिणांमसाठी हा उपाय तुम्ही रोज करा
पपई तुमच्या त्वचेसाठी तितकीच उपयोगी आहे जितकी तुम्हाला रोज जगण्यासाठी खाण्याची गरज भासते. आपल्या चेहऱ्यावर चमक राखण्यासाठी पपईचा खूपच चांगला उपयोग होतो. तसंच तुमची त्वचा डिटॅन करण्यासाठी हा एक अप्रतिम उपाय आहे.
स्टेप 1: पपईचे पातळ स्लाईस करून घ्या
स्टेप 2: हे स्लाईस तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रगडा अथवा तुम्हाला जिथे टॅन असेल तिथे रगडा
स्टेप 3: 20 मिनिट्स हे असंच ठेऊन द्या आणि नंतर तुम्ही साफ करा
स्टेप 4: दिवसातून असं दोन वेळा करा आणि फरक बघा
तुम्हाला सर्व उपाय करून झाल्यावरही टॅनिंगची समस्या येत असेल आणि तुम्हाला जादुई उपाय हवा असेल तर तो हा उपाय आहे. दही हा थंड पदार्थ असून यामध्ये टॅन घालवण्याचे पोषक तत्व आहेत तसंच बेसन तुमच्या त्वचेला चमक आणून देतं. या दोघांचं मिश्रण तुमची त्वचा कोमल, चमकदार आणि चांगली ठेवण्यासाठी अप्रतिम ठरतं.
स्टेप 1: एका भांड्यात दही घ्या
स्टेप 2: त्यामध्ये बेसन मिक्स करा
स्टेप 3: ही पेस्ट तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा
स्टेप 4: साधारण 10-15 मिनिट्स हे लावून ठेवा
स्टेप 5: जेव्हा पूर्णपणे सुकेल आणि कडक होईल तेव्हा धुवा
स्टेप 6: आठवड्यातून हा प्रयोग एकदा करून पाहा
हळद ही मुळातच त्याच्या अँटिसेप्टिक घटकांसाठी ओळखली जाते. तर बंगाली बेसन पीठ हे तुमचा चेहरा चमकवण्यासाठी तुम्हाला मदत करतं. या दोन्ही वस्तू मिक्स केल्यानंतर घरच्या घरी एक उत्तम फेसपॅक तयार होतं. पाहूया कसं :
स्टेप 1: अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन चमचे बंगाली बेसन मिक्स करा
स्टेप 2: त्यामध्ये थोडंसं दूध आणि एकच चमचा गुलाबपाणी घालून मिश्रण थोडं घट्ट करा
स्टेप 3: ही पेस्ट तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा
स्टेप 4: साधारण 15 ते 20 मिनिट्स हे लावून ठेवा
स्टेप 5: सुकल्यावर थंड पाण्याने धुवा
स्वयंपाकघरात असलेली मसूर डाळ ही तुम्हाला प्रोटीन तर देतेच. पण जेव्हा त्वचेवरील टॅनिंग काढण्याची वेळ येते तेव्हा ही डाळ फारच उपयुक्त ठरते. यामध्ये तुम्ही टोमॅटो आणि कोरफड जेल मिक्स केलीत तर तुमच्या त्वचेवर टॅन लगेच निघून जातील.
स्टेप 1: पाण्यामध्ये रात्री एक चमचा मसूर डाळ भिजत घाला
स्टेप 2: सकाळी उठून त्याची पेस्ट करा आणि त्यामध्ये टॉमेटो पेस्ट आणि कोरफड जेल मिक्स करा
स्टेप 3: ही पेस्ट तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा
स्टेप 4: साधारण 30 मिनिट्स हे लावून ठेवा
स्टेप 5: थंड पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका आणि नंतर बघा जादू
आपल्या त्वचेच्या सर्व समस्यांवर ताक हा खूपच चांगला उपाय आहे. तुमच्या त्वचेवरील डेड सेल्स आणि त्वचेवरील लेअर्स चांगले करण्यासाठी ओटमीलचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या हातावर टॅनिंग काढण्यासाठीही या दोन्ही वस्तूंचा उपयोग करून घेता येतो.
स्टेप 1: तीन चमचे ताकामध्ये दोन चमचे ओटमील मिक्स करा
स्टेप 2: मिक्स करून हे मिश्रण थोडं जाडसर ठेवा
स्टेप 3: ही पेस्ट तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा आणि अर्धा तास तसंच ठेवा
स्टेप 4: थंड पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका
संत्र्याच्या रसामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात विटामिन सी मिळतं. त्यामुळे तुमची त्वचा डिटॅन करण्यासाठी हा एक अप्रतिम घरगुती उपाय आहे. नैसर्गिक ब्लिचींग म्हणून आपल्याला विटामिन सी चा वापर करता येतो. तर दही तुममच्या त्वचेवरील नैसर्गिक पीएचचा बॅलन्स योग्य ठेवण्यास मदत करतं. जेणेकरून तुम्हाला त्वचेच्या जळजळीचा त्रास होत नाही.
स्टेप 1: अर्धा चमचा दह्यामध्ये तुम्ही एक चमचा संत्र्याचा रस मिक्स करा
स्टेप 2: हे मिश्रण तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा आणि अर्धा तास तसंच ठेवा
स्टेप 3: थंड पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका
स्टेप 4: चांगल्या परिणामासाठी एक दिवस आड करून हा प्रयोग नक्की करा
हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. हे फक्त स्वीट काँम्बिनेशन नाहीये तर परफेक्ट घरगुती उपाय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे टॅनिंग घालवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.
स्टेप 1: सेरामिक बाऊलमध्ये पाच स्ट्रॉबेरीज घेऊन व्यवस्थित मॅश करा
स्टेप 2: हे मिश्रण तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा आणि 30 मिनिट्स तसंच ठेवा
स्टेप 3: त्यानंतर दोन चमचे दुधाची साय अर्थात क्रिम त्या पेस्टवर लावा
स्टेप 4: थंड पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका
चंदन हे आपल्या त्वचेसाठी व्हाईटनिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. टॅनिंग काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये तुम्ही नारळ पाणी मिक्स करून लावलं तर एक योग्य मिश्रण ठरतं. तुमच्या शरीरावरील टॅनिंग भाग या मिश्रणामुळे निघून जातो.
स्टेप 1: दोन चमचे नारळ पाण्यात एक चमचा चंदन पावडर घाला
स्टेप 2: हे मिश्रण तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा आणि 30 मिनिट्स तसंच ठेवा
स्टेप 3: थंड पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका
स्टेप 4: चांगल्या परिणामासाठी एक दिवस आड करून हा प्रयोग नक्की करा
जेव्हा डिटॅन करण्याची गोष्ट येते तेव्हा सायट्रस कधीच तुम्हाला नाऊमेद करत नाही. त्यामुळे डिटॅनसाठी तुम्ही अननसाच्या पल्पचा वापर करा. त्यामध्ये तुम्ही मध मिक्स करून एक चांगला फेसपॅकदेखील तयार करू शकता.
स्टेप 1: अननसाचे तुकडे करून तुम्ही ते व्यवस्थित मॅश करून पल्प करा
स्टेप 2: मॅश केलेल्या या अननसाच्या पल्पमध्ये तुम्ही एक चमचा मध घाला
स्टेप 3: हे मिश्रण तुम्ही टॅन झालेल्या ठिकाणी लावा आणि 20 मिनिट्स तसंच ठेवा
स्टेप 4: थंड पाण्याने तुम्ही हे धुऊन टाका
डिटॅन करण्याचे काही घरगुती उपाय तर आपण पाहिले पण टॅनिंगपासून वाचण्यासाठी आपण नक्की काय करायला हवं तेसुद्धा आपण पाहूया.
उन्हापासून वाचण्यासाठी आपण योग्य कपड्यांचा वापर करायला हवा. बाहेर पडताना चेहऱ्याला स्कार्फ बांधून ऊन असताना बाहेर पडावं. अगदी पावसाच्या दिवसातही त्वचा टॅन होते. त्यामुळे अशावेळी इतर गोष्टींचा वापर करावा.
कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही घराबाहेर निघताना सनस्क्रिन लावायला हवं. सूर्याची किरणं डायरेक्ट आपल्या त्वचेवर येतात आणि त्यामुळे त्वचा टॅन होते. असं असल्यामुळे सनस्क्रिन लावायला विसरू नका. तसंच सनस्क्रिन लावल्यामुळे तुमचा चेहरा नेहमी तजेलदार राहतो. कारण हे सूर्याची किरणं आपल्या शरीरावर आल्यास, त्यापासून त्वचेचं रक्षण करतं.
हॅटचा वापर नेहमी करावा. हॅट घातल्यास, उन्हापासून आपलं संरक्षण होतंच शिवाय हॅटची एक वेगळी फॅशनही आपल्याला कॅरी करता येते.
सनग्लासेस आपल्या डोळ्यांचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण तर करतातच. शिवाय सनग्लासेसमुळे आपल्या लुकला एक वेगळी शोभा येते. आपल्या फॅशन सेन्सला सनग्लासेसमुळे अजून चार चांद लागतात असंच म्हणावं लागेल.
तुम्ही सूर्याच्या किरणांच्या डायरेक्ट संपर्कात याल अशा प्रकारचे कपडे घालू नका अथवा असे कपडे असले तर सनस्क्रिन लावायला विसरू नका.
इतर खर्चिक पर्यायांपेक्षा घरगुती उपाय त्वचेला डिटॅन करण्यासाठी जास्त चांगले आहेत. या वस्तू तुम्हाला सहजासहजी घरामध्ये मिळतात आणि हे उपाय पटकन करताही येतात.
त्वचा संवेदनशील असल्यासदेखील तुम्ही घरगुती उपाय वापरू शकता कारण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा समावेश नसतो. पण तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची अलर्जी तर ना याचीदेखील आधी नीट तपासणी करून घ्या आणि मगच हे उपाय वापरा.
तसं तर कोणतंही सनस्क्रीन त्वचा डिटॅन करण्यासाठी चांगलं असतं. पण साधारण SPF 30 सनस्क्रिन नेहमीच तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्यासाठी जास्त उपयोगी ठरतं.