आपल्या या जगामध्ये विविध लोक आपल्याला भेटत असतात. काही लोक असतात जे कायम आनंदी असतात आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवतात. तर काही लोकांना कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नसतो. काही जण आनंदी असण्याचा दिखावा करत असतात. आनंदी राहणं ही एक कला आहे, जी प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण आयुष्यात प्रत्येक गोष्टीत समाधान मानून आनंदी राहणाऱ्या माणसांना जगायला जास्त चांगलं बळ मिळतं. काही जण अगदी लहान लहान गोष्टीतूनही आनंद शोधत असतात. आजकाल आपल्या धावपळीच्या आयुष्यात आनंद मिळणंही कठीण झालं आहे. पण अशावेळी काही कोट्स अर्थात काही वाक्य असतात जी आपल्याला आनंद देतात आणि जगायला बळंही देतात. कधी प्रचंड उकाड्यात आलेली पावसाची छोटीशी सरही आनंद देते तर कधी सकाळीच तुमच्या आवडीच्या माणसांकडून मिळणारी कॉम्प्लिमेंट आपला दिवस अप्रतिम करते. अचानक कधी बॉसने केलेली प्रशंसाही मनाला समाधान देऊन जाते किंवा अचानक तुमची सुट्टी बॉसने पास केली की, आनंद गगनात मावत नाही. कारण काहीही असो, आवश्यक आहे ते आनंदी राहाणं. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही कोट्स सांगत आहोत, जे वाचून तुम्ही तुमचा वाईट मूडही करू शकता चांगला. जाणून घेऊया असे कोणते कोट्स आहेत जे आपल्याला जगायला बळ देऊन आनंद देतात.
1. तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो
2. तासाचा आनंद हवा असेल तर झोप घ्या, दिवसभरासाठी हवा असेल तर आवडती गोष्ट करा, वर्षभरासाठी हवा असेल तर कामाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि जीवनभरासाठी हवा असेल तर, दुसऱ्यांनाही मदत करा
3. लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो
4. चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद
5. तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता
6. आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टींचा आनंद व्यक्त करायला हवा
7. दुसऱ्यांचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो
8. काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याचा स्रोत असतो पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं
9. आनंदी व्यक्ती कधीही परिणामांची चिंता करत नाहीत
10. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद आहे
11. जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंद
12. लहान लहान यशदेखील आनंदने सेलिब्रेट करता येतं
13. आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्यायचा प्रयत्न करा
14. आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट वेळेची गरज नक्कीच नाही
15. जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल
16. आनंद काही विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच मिळतो
17. आनंद मिळवणं हे आपल्याच हातात असतं
18. दुसऱ्यांना दोष देत जगलात तर कधीच आनंद मिळणार नाही
19. आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो
20. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद
21. माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं? आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे
22. आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतातच असं नाही
23. सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं हाच आनंद
24. सतत काम करत राहाणं हाच आनंद
25. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा बाऊ न करणं हा खरा आनंद. आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स अशावेळी नक्कीच कामी येतात.
काही प्रसिद्ध व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टी आपण आता जगण्यासाठी बळ अथवा आनंदी राहण्यासाठी वाचतो आणि ते आपल्या आयुष्यात आत्मसात करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. असेच काही कोट्स आहेत जे काही प्रसिद्ध व्यक्तींनी सांगितले आहेत. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, जे बोलता आणि जे करता त्यामध्ये सामंजस्य असेल तरच तुम्हाला आनंद मिळेल - महात्मा गांधी
2. आनंद ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमच्या कर्मांमुळे मिळते - दलाई लामा
3. आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो - बुद्ध
4. दुसऱ्यांची काळजी करत राहिलात तर तुम्हाला कधीच आनंदी राहाता येणार नाही - अल्बर्ट कॅमस
5. आपल्या कुटुंबासह जोडलेल्या माणसाला नेहमीच भीती आणि चिंता असते, त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर जास्त भावनिक राहून चालणार नाही - चाणक्य
5. पैसे तुमच्यासाठी आनंद खरेदी करू शकत नाहीत पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतात - स्पाईक मिलगॅन
6. पैशाने आनंद मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा, ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल - बेंजमिन फ्रँकलिन
7. तुम्ही कोण आहात, यावर तुमचा आनंद अवलंबून नाही, तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे - डेल कार्नेगी
8. काही लोक जिथे जातात, तिथे आनंद वाटतात, तर काही लोक आयुष्यात निघून जातात तेव्हा आनंद येतो - ऑक्सर वाईल्ड
9. आनंद हा स्वतःवर अवलंबून असतो - अरस्तु
10. त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्यांचा स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहे. कारण अशी मैत्री तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरी असलेल्यांशी करा - चाणक्य
11. तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील आनंद अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा - मार्क्स ऑरेलियस
12. मला वाटतं आनंद मिळवण्याची एक निश्चित पद्धत आहे की, आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्याची जिद्द असावी - बेट डेव्हिस
13. आनंदाप्रमाणेच पैसाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही. कोणत्यातरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्ही गोष्टी मिळतात - हेनरी फोर्ड
14. दुसरं कोणी काय म्हणत आहे, याकडे कधीही लक्ष देऊ नका. कारण असं केलंत तर आनंंद कधीच मिळणार नाही - रिचर्ड बॅक
15. आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही - हेलेन केलर
16. प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे, जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगल्यास प्राप्त होतो - रिचर्ड बॅक
17. ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे. पण जे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे - डेल कार्नेगी
18. आनंद ही अशी गोष्ट नाही की, जी भविष्यासाठी राखून ठेऊ. ही अशी गोष्ट आहे, जी तुम्ही वर्तमानासाठी तयार केलेली असते - जिम रॉन
19. जेव्हा महत्त्वाकांक्षा संपतात, तेव्हा आनंद सुरु होतो - थॉमस मर्टन
20. लग्नानंतर आनंद हा तर नशीबाचा खेळ आहे - जेन ऑस्टेन
21. अंधारातून एका प्रकाशाची केवळ गरज आहे. आनंद आपोआप मिळतो - जे. के. रोलिंग
22. आज तुम्ही जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर नेहमीच आनंदी राहाल - पावलो कोएलो
23. आनंद म्हणजे तुमच्याजवळ आज जे काही आहे, त्याबरोबर जगण्याची आणि स्वतंत्र राहण्यासाठी एक चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र असण्याची गरज आहे - दिव्यांका त्रिपाठी
24. आयुष्य खूपच लहान आहे. त्यामुळे तुमचे दात शाबूत असेपर्यंत हसत राहा - मलोरी हॉपकिन्स
25. चिंता कशाला करत राहायची. चांगली वेळ येते, मग वाईट वेळ येत, पुन्हा चांगली वेळ येते. स्थायी काहीच नाही. त्यामुळे आनंदी राहा - श्री श्री रवी शंकर
आनंदी राहण्यासाठी विचारात्मक कोट्सचीदेखील कधी कधी आयुष्यात गरज भासते. कधीकधी आपण आयुष्यात खूपच चिंता करू लागतो. सतत विचार करण्याने काहीच होत नाही. त्यासाठी तुम्हाला असे कोट्स नक्कीच उभं राहण्यासाठी मदत करतात.
1. तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला नीट समजावून सांगू शकत नसाल तर ती गोष्ट तुम्हालाच नीट कळलेली नाही. त्यामुळे दुसऱ्याकडून आपल्याला आनंद मिळत नाही हे खापर फोडू नका
2. एखादी गोष्ट मिळवण्याठी जर आपण आयुष्यभर थांबायला तयार असू तर तो आपला एकप्रकारे आनंद आहे
3. तुम्ही काय निवडत आहात याचं तुम्हाला नक्कीच स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही जे निवडलं आहे त्याचे परिणाम भोगण्यासाठी तुम्ही स्वतः तयार असायला हवं. त्यातून आनंद न मिळाल्यास, कोणीही इतर त्याला जबाबदार नसेल
4. मनात कोणत्याही शंका असतील अथवा तुमचा मूड खराब असेल तर आपल्या मुलांबरोबर काही वेळ घालवा. कारण यासारखा दुसरा आनंद काहीच नाही
5. सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत बसलात तर तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही
6. लहान सहान गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाला तोड नाही
7. कोणत्याही गोष्टीविषयी मनात खंत बाळगू नका कारण ती खंत तुम्हाला कधीच आनंद मिळवू देणार नाही
8. पाण्यात भिजण्याचा आनंद घेता यायला हवा नाहीतर नुसतं भिजणंच होतं
9. दुसऱ्यांसाठी काही करत राहण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका त्यातला आनंद काही औरच
10. तुमच्याकडे गार्डन आणि लायब्ररी या दोन गोष्टी असतील तर जगातील सर्वात मोठा आनंद तुमच्याकडे आहे हे लक्षात ठेवा. गौतम बुद्धांची शिकवण आणावी आचरणात, आयुष्य होते सुखकर आणि आनंदी
जोडीदारासोबत सुखाने जीवन जगण्यासाठी नात्याची प्रत्येक भावना मांडणारे हे कोट्स तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतील.
1. आनंदी राहण्यासाठी जगा, कोणालाही इंप्रेस करण्यासाठी जगू नका
2. खरं प्रेम करताना आनंद साहजिकच मिळतो
3. दोघांमधील प्रेम जपणं हाच आनंद पण दोघांमधील तफावत नेहमी दूर करून एकत्र राहणं हा सर्वात मोठा आनंद
4. आपल्या कठीण काळात त्याचं अथवा तिचं आपल्याबरोबर असणं हा सर्वात मोठा आनंद
5. तुम्ही जेव्हा खरंच प्रेमात असता तेव्हा तुमच्याासाठी ती एक व्यक्ती हीच मोठा आनंद असते
6. केवळ चेहऱ्यावर नाही तर व्यक्तीच्या आत्म्यावर प्रेम करणं म्हणजे खरं जगणं आणि आनंद
7. मी मेसेज करत असताना तुझ्या चेहऱ्यावर येणारं हसू हे माझ्या जगण्यासाठी मिळणारा सर्वात मोठा आनंद आहे
8. तुझ्याबरोबर जगण्यात मला आनंद मिळतो कारण तू जसा अथवा जशी आहेस तसंच राहण्याचा प्रयत्न करतोस वा करतेस
9. तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम केलं की, तुम्हाला जे हवं आहे त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळतो
10. तू जर मला विचारलंस की, तू माझ्या मनात किती वेळा गेला आहेस, तर माझं उत्तर असेल एकदाच...कारण एकदा तू मनात जागा केलीस तिथून तू कधी जाऊन शकला नाहीस.
आपण एखाद्याला जेव्हा मेसेज करत असतो तेव्हा त्यांना नेहमीच आनंदी राहा असं सांगतो. अर्थात या आपल्या मनातील भावना असतात. अशावेळी असे काही कोट्स असतात जे तुम्ही वापरू शकता
1. नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा
2. जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का?’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल
3. नेहमी असे आनंदी राहा की, तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल
4. जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या
5. तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका
6. कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा. यामुळेच तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील
7. आनंदी राहा आणि आरोग्य चांगलं ठेवा
8. आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा म्हणजे आनंद सहज मिळेल
9. भूतकाळाला कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका. कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करत असतो
10. आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल
बऱ्याचदा आयुष्यात सर्व काही निरर्थक वाटायला लागतं. त्यावेळी सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांची आणि चांगल्या प्रेरणादायी विचारांची. कारण माणूस हा असा प्राणी आहे ज्याचं संपूर्ण जग हे विचारांवर चालू असतं. आपण आपल्या आजूबाजूला जशी माणसं पाहतो किंवा त्या माणसांमध्ये वावरतो तसंच आपले विचारही असतात. त्यामुळेच मराठीमधील एक उक्ती आहे, जशी संगत तसा विचार त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्यामुळे मुळात चांगली संगत असेल तर विचारही चांगले राहतात हे महत्त्वाचं आहे. बरेचदा माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे चढउतार येत असतात. अशावेळी खचून जाणं हे साहजिकच आहे. पण अशावेळी मनाची समजून घालत आपल्याला असे प्रेरणादायी विचार हे जगण्याला अधिक बळ देत असतात.
1. स्वत:ला कमी लेखणं सोडा
2. स्वत:च स्वत:ला गृहीत धरणं सोडा
3. इतरांशी सतत तुलना करणं टाळा
4. एखाद्या समस्येवर रडण्यापेक्षा त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा
5. चुकतो तो फक्त आपला निर्णय
6. कर्तृत्ववान माणसं कधी नशीबाच्या आहारी जात नाहीत आणि नशीबाच्या आहारी गेलेली माणसं कर्तृत्ववान ठरत नाहीत
7. तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार कधीच करू नका
8. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा
9. संकटाबरोबर नेहमी संधी येते
10. स्वप्न तीच आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत
कोणत्याही गोष्टीत यश हे सहजासहजी प्राप्त होत नाही आणि जे यश सहजासहजी प्राप्त होतं ते जास्त काळ टिकून राहात नाही असं म्हटलं जातं. जगात अशी कितीतरी प्रसिद्ध माणसं आहेत, ज्यांची प्रत्येकाची स्टोरी ही जगण्यासाठी बळ देते. त्यांचे प्रयत्न हे जगण्यासाठी आनंद देऊन जातात.
1. माझ्याबरोबर जे झालं आहे तो मी नाही, तर आज मी जे काही बनलो आहे ते मी निवडलं आहे
2. तुमची स्वप्नं पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्नं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद त्याला कसलीच तोड नाही
3. तडजोड, मेहनत आणि स्वप्न याशिवाय कोणताही व्यक्ती मोठा होत नाही. त्यातूनच खरा आनंद मिळतो
4. या क्षणाचा आनंद उपभोगा कारण हा क्षण म्हणजे तुमचं आयुष्य आहे
5. लोकांना पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या मागे पळता पळता खरा आनंद नक्की काय आहे हेच विसरायला होतं
6. तुम्हाला नक्की काय हवंय हा आनंद नाही तर तुम्हाला नक्की काय मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं हा आनंद आहे
7. असं कुठेच म्हटलेलं नाही की, एकट्याने कोणत्याही गोष्टीचा आनंद उपभोगता येत नाही
8. तुमच्या अंतर्मनातील साद म्हणजे खरा आनंद
9. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय नाही याचा विचार करत बसलात तर आनंद कधीही मिळणार नाही
10. तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता हा विश्वास तुमच्यामध्ये आणणं हीच आनंदाची पहिली पायरी आहे
हेदेखील वाचा -
जगण्याला बळ देतात प्रेरणादायी विचार (Inspirational Quotes In Marathi)
यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi)
मराठीतील प्रसिद्ध 125 म्हणी (Famous Marathi Proverbs)
स्वातंत्र्यदिनाचं महत्त्व सांगणारे खास कोटस
Marriage Anniversary Wishes In Marathi