त्वचेला डीटॅन करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं, जे करतील तुमच्या त्वचेचं संरक्षण

त्वचेला डीटॅन करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं, जे करतील तुमच्या त्वचेचं संरक्षण

भारतात पाऊस पडो अथवा थंडी तरीही वर्षभर आपल्याला त्वचेच्या डीटॅनची समस्या सतावत असते. ही चिंता सर्वांनाच असते. भारतामध्ये कितीही गारवा निर्माण झाला तरीही त्वचा डीटॅन करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. सूर्याची किरणं आपल्या त्वचेच्या डायरेक्ट संपर्कात येत असल्यामुळे आपल्याला अनेक लोकांना त्वचेच्या समस्या उद्भवलेल्या दिसतात. तुम्ही यासाठी त्वचेवर आणि चेहऱ्यावर अनेक क्रिम्सचा वापर करता, त्यावर अनेक सनस्क्रिन्सचाही वापर करता येतो. पण बाजारामध्ये इतके पर्याय उपलब्ध असतात की, नक्की कशासाठी कोणत्या क्रिम अथवा रिमूव्हलचा वापर करायचा आणि काय घ्यायचं हेच कळत नाही. याच सगळ्या उत्पादनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या लेखात त्वचा डीटॅन करण्यासाठी कोणती उत्पादनं चांगली आहेत याबद्दल पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ. पण त्याआधी जाणून घेऊया टॅन त्वचा म्हणजे नेमकं काय. 

Table of Contents

  टॅन त्वचा म्हणजे नेमकं काय? (What Is Tan Skin?)

  बऱ्याचदा तुमच्या त्वचेचा रंग वेगळा असतो पण सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेवर काळपटपणा यायला लागतो यालाच टॅन असं म्हणतात. हा रंग तुमच्या मूळ रंगापेक्षा वेगळा उठून दिसतो. त्यामुळे तुमचा चेहरा आणि तुमच्या मांडी अथवा पोटाचा रंग यामध्ये तफावत दिसते. कारण हे भाग कपड्यांनी झाकले असल्यामुळे त्याचा मूळ रंग तसाच राहतो. त्याचा संपर्क सूर्याच्या किरणांशी येत नाही. तो भाग टॅन होण्यापासून सुरक्षित राहातो. पण बाकीच्या भागाचा रंग हा पूर्ण बदललेला असतो. बऱ्याचदा हे डिटॅन करण्यासाठी अनेक क्रिम्स आणि इतर गोष्टींचा वापर करण्यात येतो.

  वाचा - चेहरा आणि त्वचेची काळजी घेताना टीप्स

  भारतातील 8 टॅन रिमूव्हल उत्पादनं (Best Tan Removal Products In India)

  आपल्याकडे वर्षभरात उन्हाळा कायमच असतो असं म्हटलं तर ते नक्कीच वावगं ठरणार नाही आणि यामध्ये सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर टॅन होणंही कायमचं झालं आहे. पण त्यासाठी आपल्याकडे अनेक उत्पादनं आहेत जी त्वचा डीटॅन करण्यासाठी मदत करतात आणि फायदेशीर ठरतात. फक्त ही उत्पादनं वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचेसाठी योग्य आहेत की नाही हे एकदा तपासून पाहा. आम्ही तुम्हाला 10 अप्रतिम टॅन रिमूव्हल उत्पादनांची माहिती देत आहोत. 

  1. Lotus Herbals Safe Sun Detan Face Pack

  Beauty

  Lotus Herbals Safe Sun UV Screen Matte Gel, SPF 50, 100g

  INR 330 AT Lotus

  सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. हा फेसपॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर आलेला टॅन काढून टाकण्यास मदत तर करतोच. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेची जळजळ होत असल्यास, थांबते

  2. Biotique Bio Papaya Revitalizing Sun tan removal Scrub

  Beauty

  Biotique Bio Papaya Revitalizing Sun tan removal Scrub

  INR 149 AT Biotique

  या क्रिमचा उपयोग तुम्ही स्क्रबप्रमाणे करू शकता. साधारण राखाडी असं दिसणारं हे क्रिम तुमच्या त्वचेसाठी अजिबातच वाईट नाही. मुळात यामध्ये असणारे लहान लहान कण हे तुमच्या त्वचेवरील टॅन काढून टाकण्यास मदत करतात. तुमच्या त्वचेवर हे क्रिम घासल्यानंतर त्वचेत रूतून बसलेले किटाणू बाहेर काढून टाकण्यास मदत होते आणि तुमची टॅन त्वचा उजळण्यासही मदत होते. 

  चांगल्या त्वचेसाठी टोनर वापरणेही आहे आवश्यक, जाणून घ्या बेस्ट टोनरविषयी

  3. VLCC clear Tan with cucumber extract

  Beauty

  VLCC Clear Tan Fruits Face Pack with Cucumber Extract, 100g

  INR 249 AT VLCC

  नैसर्गिक फळांचा वापर करून तयार करण्यात आलेलं हे उत्पादन आहे. काकडी, अननस आणि मलबेरी असे तुमच्या त्वचेसाठी उपयुक्त असणारे घटक यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून तुमच्या त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

  4. Aroma magic tan removing milk pack

  Beauty

  Aroma magic tan removing milk pack

  INR 140 AT Aroma

  तेलकट त्वचेसाठी हे खूपच उपयुक्त आहे. यामध्ये असणारे घटक हे तेलकट त्वचेसाठी पोषक आहेत. यातील दूध हे त्वचेवरील मळ साफ करण्यास मदत करून त्वचा तजेलदार करण्यासही मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरावर कितीही जुना टॅन पॅट असला तरीही तो काढून टाकण्यासाठी याची मदत होते. 

  5. Banjara’s Multani plus Orange Oil clearing Exfoliating Face Wash

  Beauty

  Banjara’s Multani plus Orange Oil clearing Exfoliating Face Wash

  INR 110 AT Banjara

  यामध्ये संत्र्याच्या सालीचे पोषक तत्व असतात. जे तुमच्या त्वचेवरील टॅन काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्वचेवरील टॅन काढून त्वचा उजळवण्याचं काम हे फेसवॉश करतं. त्यामुळे अतिशय साधा आणि सोपा उपाय म्हणून तुम्ही या फेसवॉशचा वापर टॅन काढून टाकण्यासाठी करू शकता.

   

  6. Just herbs body luster sandal turmeric ubtan face pack

  Beauty

  Just herbs body luster sandal turmeric ubtan face pack

  INR 725 AT Just Herbs

  कडिलिंब, हळद, संत्र्याच्या सालीचे पोषक तत्व असे सर्व घटक यामध्ये मिक्स असल्यामुळे हे 100 टक्के नैसर्गिक फेसपॅक आहे. तुमच्या त्वचेवरील टॅन काढून टाकण्यासाठी तुम्हाला यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. केवळ टॅन काढण्यासाठीच नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील तुम्हाला नको असलेले केस काढून टाकण्यासाठीही याची मदत होते. 

  वाचा - बीबी क्रीमसाठी परफेक्ट ब्रॅंड

  7. Sattvik Organics Sun Ban Remedy for Tan removal

  Beauty

  Sattvik Organics Sun Ban Remedy for Tan removal

  INR 370 AT Sattvik

  केशर आणि हळदीचे घटक यामध्ये समाविष्ट असतात. जे तुमच्या त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच तुमच्या त्वचेचा मूळ रंग येण्यासाठीही याचा उपयोग होतो. इतकंच नाही तर या उत्पादनाचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाही कारण हे नैसर्गिक वस्तूंपासून बनवण्यात आलं आहे. 

  8. Herbals Roots Sandalwood Face Pack

  Beauty

  Herbals Roots Sandalwood Face Pack

  INR 429 AT Herbal Roots

  त्वचेवरील सूर्यकिरणांमुळे आलेले डाग अर्थात टॅन काढण्यासाठी चंदनाइतका दुसरा चांगला पर्याय नाही. याचा तुम्ही नियमित वापर केल्यास, तुमच्या त्वचेवरील टॅन नक्कीच निघून जाईल. याशिवाय तुमच्या त्वचेवरील टॅनिंगमुळे पिंपल्स येत असतील तर तेदेखील दूर करण्यासाठी या फेसपॅकचा अप्रतिम उपयोग करून घेता येतो. 

  टॅनिंग काढण्यासाठी 5 उत्तम फेशियल किट (5 Facial Kit to remove tan)

  सूर्याची किरणांचा त्वचेवर परिणाम होत असतो. पण वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर त्याचा तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम होताना दिसून येतो. त्यामुळे याची काळजी वेळीच घ्यायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी तुम्हाला फेशियलचा वापर करता येतो. आम्ही तुम्हाला टॅन काढण्यासाठी अप्रतिम पाच फेशियल किटची माहिती इथे देत आहोत. 

  1. VLCC anti tan facial kit

  Beauty

  VLCC anti tan facial kit

  INR 150 AT VLCC

  हे अतिशय चांगलं अँटीटॅन फेशियल किट आहे. तुमच्या त्वचेचा मूळ रंग येण्यासाठी या फेशियलचा उपयोग होतो. या फेशियल किटमध्ये ओटमीट स्क्रब, मेलाव्हाईट जेल, मेलाव्हाईट पावडर, पिस्ता मसाज क्रिम आणि मेटाव्हाईट पॅक याचं मिश्रण असतं. यामुळे टॅन तर निघून जातंच. पण त्याशिवाय प्रदूषणापासूनही संरक्षण होतं. हे फेशियल किट सर्व वयाच्या महिलांना वापरता येतं. 

  2. Lotus Radiant Pearl Cellular Lightening Facial Kit

  Beauty

  Lotus Radiant Pearl Cellular Lightening Facial Kit

  INR 808 AT Lotus

  सर्व तऱ्हेच्या त्वचेवर याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये पर्ल एक्स्फोलिएिंग क्लिंन्झर, पर्ल अॅक्टिव्हेटर, पर्ल मसाज क्रिम आणि पर्ल मास्क या गोष्टींचा समावेश असतो. हे सर्व त्वचेसाठी उपयोगी असून त्वचेवरील काळे डाग घालवण्यास उपयुक्त आहे. तुमच्या त्वचेवर झालेल्या डार्क स्पॉट्ससाठीदेखील हे उपयुक्त आहे. 

  3. VLCC Papaya Fruit Facial Kit for tan removal

  Beauty

  VLCC Papaya Fruit Facial Kit for tan removal

  INR 188 AT VLCC

  सर्व ऋतूंमध्ये तुम्ही तुमच्या त्वचेचं टॅन घालवण्यासाठी या फेशियल किटचा वापर करू शकता. घरच्या घरी तुम्हाला हे फेशियल करता येतं. यामध्ये विटामिन ई असल्यामुळे तुमच्या त्वचेला होणारी हानी कमी करण्यास हे उपयोगी ठरतं. तसंच यामध्ये पपई आहे. पपई हा तुमच्या त्वचेसाठी अप्रतिम ठरणारा पदार्थ आहे. त्यामुळे याचा तुम्हाला चांगलाच फायदा होतो. याचा वापर केल्याने तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि नितळ होते. 

  4. Raaga Professional Fairness Facial Kit

  Beauty

  Raaga Professional Fairness Facial Kit

  INR 349 AT Raaga

  हे मुळातच टॅन आणि लायटनिंग फेशियल किट आहे. याचा अर्थ तुमच्या चेहऱ्यावरील टॅन नष्ट करून तुमचा चेहरा उजळवण्यासाठी याचा उपयोग करता येतो. यामध्ये हिरवं सफरचंद आणि स्ट्रॉबेरी या दोन्ही फळांचा समावेश असतो. ही दोन्ही फळं तुमच्या त्वचेला अधिक चमकदार करण्यासाठी मदत करतात. तुमच्या त्वचेला या फेशियल किटमुळे अधिक तजेलदारपणा येतो. 

  5. Jovees Pearl Whitening Facial Kit

  Beauty

  Jovees Pearl Whitening Facial Kit

  INR 1,348 AT Jovees

  या फेशियल किटमध्ये पाच नैसर्गिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये फेस क्लिंन्झर कम स्क्रब, विटामिन ए सह मसाज क्रिम, पर्ल व्हाईटनिंग फेशियल मास्क आणि पर्ल व्हाईटनिंग फेस व्हाईटनिंग सिरम या घटकांचा समावेश आहे. जे तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करून तुमची त्वचा उजळण्यासाठी मदत करतात.

  क्रिम उत्पादन जे तुमच्या त्वचेवरील टॅन काढायला करतात मदत (12 Best Tan Cream Products)

  त्वचेवरील टॅन काढण्यासाठी काही क्रिम्सदेखील खूपच चांगलं काम करतात. नक्की कोणते क्रिम्स वापरायला हवेत ते जाणून घ्या. या क्रिमची किंमतही वाजवी असते आणि टॅन काढण्यासाठी याचा चांगला उपयोगही करून घेता येतो. 

  1. Nature’s essence Lacto Tan clear

  Beauty

  Nature’s essence Lacto Tan clear

  INR 175 AT Lacto

  दूध प्रोटीन, जेरानियम ऑईल इत्यादी समाविष्ट असणाऱ्या या क्रिममुळे तुमच्या त्वचेवरील टॅन काढायला मदत होते. बरेच डॉक्टर्सदेखील या क्रिमचा वापर करण्याचा सल्ला देतात. कारण हे क्रिम तुम्हाला तुमच्या त्वचेचा मूळ रंग आणून देण्यास मदत करतं. 

  2. Lotus Herbals Nutranite Skin Renewal Nutritive Night Cream

  Beauty

  Lotus Herbals Nutranite Skin Renewal Nutritive Night Cream

  INR 341 AT Lotus

  तुमचा नैसर्गिक रंग परत आणण्यासाठी आणि टॅन नष्ट करण्यासाठी दूध आणि मधयुक्त असं हे क्रिम फायदेशीर आहे. सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी आणि उष्ण वातावरणाचा परिणाम तुमच्या त्वेचवर न होऊ देण्यासाठीही याची मदत होते. 

  वाचा - सर्व प्रकारच्या त्वचेसाठी ‘या’ नाईट क्रीम आहेत बेस्ट

  3. Lotus Herbals Whiteglow Skin Whitening and Brightening Gel Creme

  Beauty

  Lotus Herbals Whiteglow Skin Whitening and Brightening Gel Creme

  INR 309 AT Lotus

  त्वचेवर परिणाम करणाऱ्या UVA किरणांपासून बचाव करण्यासाठी या क्रिमचा वापर करण्यात येतो. या क्रिमचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्रिम तुमच्या त्वचेला योग्य मॉईस्चराईजरदेखील देतं. तसंच याचा सुगंध अतिशय माईल्ड असल्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच हे क्रिम लावल्यानंतर तुमची त्वचा दिवसभर फ्रेश राहते आणि कोणताही डलनेस त्वचेमध्ये दिसून येत नाही. 

  4. Clarins White Plus Whitening Repairing Night Cream

  Beauty

  Clarins White Plus Whitening Repairing Night Cream

  INR 1,400 AT Clarins

  रासबेरी, विटामिन सी अशा घटकांनी युक्त हे क्रिम तुम्हाला तुमचा मूळ रंग त्वचेला मिळवून देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हे नाईट क्रिम असून तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या त्वचेवर लावणं गरजेचं आहे. रात्रभर हे क्रिम तुमच्या त्वचेवर काम करतं आणि त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. 

  5. Olay natural White Fairness Cream

  Beauty

  Olay natural White Fairness Cream

  INR 899 AT Olay

  हे क्रिमदेखील नाईट क्रिमच आहे. रात्रभर तुम्हाला हे क्रिम लावून ठेवावं लागतं. तरच त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्यासाठी होतो. तुमच्या त्वचेवरील काळे डाग काढून टाकण्यासाठी या क्रिमचा वापर करता येतो. 

  6. L’Oreal Paris White Perfect Laser Whitening Cream

  Beauty

  L’Oreal Paris White Perfect Laser Whitening Cream

  INR 971 AT L'Oreal

  त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी या क्रिमचा चांगला उपयोग होतो. साधारण एक महिना नियमित हे क्रिम वापरल्यास, तुम्हाला तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम दिसून येतो. तसंच तुमच्या त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी करण्यासाठीही या क्रिमचा वापर करता येतो. या क्रिममुळे तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम होते. तसंच तुमचा चेहरा उजळण्यासाठीही या क्रिमचा उपयोग होतो. 

  7. Lakme Perfect Radiance Intense Whitening Day Creme

  Beauty

  Lakme Perfect Radiance Intense Whitening Day Creme

  INR 329 AT Lakme

  ही एक ट्रॅव्हल फ्रेंडली ट्यूब असून तुम्ही हे क्रिम कुठेही कधीही नेऊ शकता हे सर्वात महत्त्वाचं. तुमची त्वचा हे क्रिम त्वरीत उजळवतं हे याचं वैशिष्ट्य आहे. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी हे क्रिम खूपच फायदेशीर आहे. तेलकट त्वचेवरील टॅन हे त्वरीत काढून टाकतं. शिवाय हे क्रिम खिशाला परवडण्यासारखं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही ठिकाणी हे सहज उपलब्ध होतं.

  8. Spinz Sun tan remover Instant Detan Cream

  Beauty

  Spinz Sun tan remover Instant Detan Cream

  INR 149 AT Spinz

  काही वेळा त्वचेवरील टॅन काहीही उपाय केला तरी निघत नाहीत. तर अशा लोकांसाठी हे क्रिम अतिशय फायदेशीर आहे. घट्ट टॅनचे डाग काढून टाकण्यासाठी या क्रिमचा उपयोग होतो. तसंच हे क्रिम कुठेही घेऊन जाण्यासाठी सोपं आहे. एका ट्यूबमध्ये येत असल्याने याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. टॅनिंग त्वरीत घालवायचे असतील तर तुम्हाला या क्रिमचा वापर नक्कीच करता येतो. 

  9. Neutrogena Fine Fairness Cream with SPF 20

  Beauty

  Neutrogena Fine Fairness Cream with SPF 20

  INR 296 AT Neutrogena

  हे क्रिम तुम्हाला संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनाही वापरता येतं. तुमच्या त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी याचा चांगला वापर होतो. बरेच डर्मेटोलॉजिस्टदेखील हे क्रिम वापरण्याचा सल्ला देतात. तसंच याचा सुगंध चांगला असल्यामुळे हे वापरण्यास बरं वाटतं. यामध्ये विटामिन सी, विटामिन बी3 चा समावेश असल्यामुळे तुमच्या त्वचेवर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

  10. Himalaya Tan Removal Cream

  Beauty

  Himalaya Tan Removal Cream

  INR 125 AT Himalaya

  संत्र्याचं साल आणि मधाचं मिश्रण असलेलं हे क्रिम नैसर्गिक घटकांनी युक्त आहे. त्यामुळे याचा त्वचेवर वाईट परिणाम होत नाही. टॅनमुळे तुमची त्वचा खराब झाली असल्यास या क्रिमने टॅन काढून टाकण्यास मदत होते. तसंच हिमालया हे नैसर्गिक घटकांनी वापरण्यात आलेली उत्पादनं करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे त्वचेला नुकसान पोहचत नाही. 

  11. Lacto Bleach Tan Remvoal Cream For Face, Hands and Legs

  Beauty

  ExpertGlow Lacto Bleach Cream for Face with Milk and Honey, Anti Tan Cream for All Type Skin - 500 gm

  INR 450 AT Lacto

  तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंगनंतर नैसर्गिक रंग उजळत राहावा यासाठी या रिमूव्हलचा उपयोग होतो. दूध आणि मधयुक्त हे रिमूव्हल क्रिम तुमच्या त्वचेवरून सूर्यकिरणांमुळे आलेला टॅन घालवून टाकण्यास मदत करते. यामध्ये असणाऱ्या लवेंडर ऑईलमुळे तुमच्या त्वचेवर येणाऱ्या सूर्यकिरणांचा दुष्परिणाम टाळण्यास याची मदत होते. 

  Beauty

  Oxyglow Lacto Bleach Cream

  INR 215 AT Lacto

  दूध आणि मध या दोन्ही घटकांनी युक्त असणारे हे क्रिम तुमच्या त्वचेवरील टॅन काही वेळातच काढून टाकायला मदत करतं. मुळात यामध्ये कोणत्याही प्रकारचं जास्त केमिकल नसल्यामुळे त्वचेला हानी पोहचत नाही.