काही ब्युटी प्रोडक्ट नेमके कसे वापरायचे याचे योग्य ज्ञान आपल्याला नसते. हल्लीच काहीतरी ऑनलाईन शॉपिंग करत असताना मला Tanning oil नावाचा एक प्रकार दिसला. आता जे tan घालवण्याचा आपण प्रयत्न करतो तेच tan वाढवण्यासाठी तुम्हाला हे tanning oil मदत करते. पण आता तुम्हाला माझ्यासारखाच प्रश्न पडला असेल की, लोकांना त्वचा tan करण्यामध्ये इतका रस का? पण तुम्हाला माहीत आहे का? Tanning oil चे भरपूर फायदे आहेत आणि हे फायदे तुम्हाला माहीत असायला हवेत.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला tanning oil विषयी सगळी आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग तयार आहात तुम्ही tanning oil काय आहे ते जाणून घ्यायला.??
तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले uv किरण सूर्यकिरणांमधून मिळत असता. पण त्याला चालना देण्याचे काम हे Tanning oil करते. तुमच्या त्वचेला रंग देण्याचे काम मेलनिन नावाचे द्रव्य करत असते. त्याच्यावर Tanning oil थेट परिणाम करते. त्यामुळे तुमचा रंग थोडा गडद होतो. (आता भारतामध्ये गडद त्वचेचा रंग कोणाला आवडत नाही?त्यामुळे Tanning oil चा वापर केला जात नाही.) पण तुम्ही परेदशात जाण्याचा बेत आखत असाल किंवा तुम्हाला tanning oil म्हणजे काय? हे माहीत करुन घ्यायचे असेल तर आज तुम्हाला याची सगळी माहिती मिळेल.
वाचा - सर्वोत्तम टॅन काढण्याची मलई
आता तुम्हाला कळलंच असेल की, Tanning oil चा उपयोग तुमची त्वचा टॅन करण्यासाठी केला जातो. त्यामुळे Tanning oil आणि सनस्क्रिन यांचे फायदे आणि तोटे वेगवेगळे आहे. Tanning oil तुमच्या त्वचेवरील मेलनिनवर काम करुन तुमचा चेहरा टॅन करते तर सनस्क्रिन तुमच्या त्वचेचे uv किरणांंपासून संरक्षण करते.
Tanning oil वापरण्याचे अनेक फायदे आहेत. जे तुम्हाला माहीत हवेत. नेमक्या कोणत्या कारणांसाठी Tanning oil वापरले जाते हे तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही याचा वापर करु शकता. जाणून घेऊया Tanning oil चे त्वचेला होणारे फायदे
तुम्ही कोणत्याही उष्ण प्रदेशात फिरायला जाणार असाल समजा गोवा असं धरुन चालूया अशावेळी तुमच्या शरीराला UV किरणांची बाधा लगेच होण्याची शक्यता असते. जास्तीवेळ उन्हात राहिल्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. पण तुम्ही Tanning oil लावले तर तुम्हाला हा त्रास होणार नाही. तुमची त्वचा कोरडी पडणार नाही. उलट तिच्यातील तजेला हा टिकून राहील.
सूर्यकिरणांपासून रक्षण करण्याचे काम Tanning oil करत असते. त्यामुळे सनस्क्रिनपेक्षाही बीच किंवा अशा ठिकाणी तुम्हीTanning oil लावले तर तुम्हाला आवश्यक असलेले uv किरण तुम्हाला मिळतात. त्यामुळे हे एकप्रकारे तुमच्या त्वचेचे संरक्षण करते.
जर तुम्ही सनस्क्रिन लावत असाल तर तुम्ही ते फक्त उघड्या भागाला लावता. त्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होत असले तरी तुलनेने तुमची त्वचा काळवंडत असते. पण जर तुम्ही Tanning oil लावले तर तुमच्या त्वचेचा रंग टिकवण्यास ती मदत करते. उदा. तुम्ही अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहिले असेल की, समुद्रकिनारी मुली संपूर्ण शरीराला काहीतरी लावून नग्न उन्हात बसलेल्या असतात. कारण त्यांना उजळ त्वचेपेक्षा टॅन केलेली त्वचा अधिक आवडते.
तुमच्या त्वचेचा पोत Tanning oil मुळे सुधारतो. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले सूर्यकिरण तुम्हाला मिळाले तर त्याचा फायदाच तुम्हाला होतो. त्यामुळे तुमच्या शरीरावर एक कोट तयार होतो. Tanning oil तुमच्या शरीराला आवश्यक गोष्ट पुरवून तुमची त्वचा चांगली ठेवते.
Tanning oil चा वापर जर तुम्ही जास्त प्रमाणात केला तरी त्याचे तोटे आहे.तुमच्या त्वचेवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे Tanning oil वापरण्याआधी तुम्हाला त्याचे तोटेही माहीत हवेत.
वाचा - पेपरमिंट तेलाचा वापर
जर तुम्ही Tanning oil लावून तासनंतास किनाऱ्यावर बसून राहिलात तर त्याचा त्रास तुमच्या त्वचेला होऊ शकतो. ज्या Tanning oil चा उपयोग तुमची त्वचा चांगली होण्यासाठी होतो. त्याच Tanning oil मुळे तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते. तुमची त्वचा चांगले करणारे गुणधर्म Tanning oil मुळे नाहिसे होऊ शकतात. त्यामुळे त्याचा अधिक वापर टाळा.
त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता यामध्ये अधिक असते. जर तुम्ही जास्त लवकर टॅन मिळवण्यासाठी खूप वेळ उन्हात tanning oil लावून बसतात. त्यामुळे तुमच्या त्वचेखाली असलेले cell डॅमेज होतात. त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
काहींची त्वचा फारच नाजून असते. उन्हात गेल्यावरही त्यांना त्रास होतो. अशांनी जर Tanning oil चा वापर केला तर त्यांना त्यांच्या त्वचेवर सनबर्न होण्याची शक्यता असते. सनबर्न व्यतिरिक्तही तुमची त्वचा खराब होण्याची शक्यता असते. तुमच्या त्वचेवर त्यामुळे चट्टेही उठू शकतात. त्यामुळे जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही त्याचा वापर अगदीच जपून करायला हवा.
त्वचा सुरकुतणे, त्वचेतील तजेला निघून जाणे असा त्रासही तुम्हाला Tanning oil मुळे होऊ शकतो. Tanning oil सतत लावण्याचा त्रास हा तुमच्या त्वचेवर पटकन दिसून येतो. त्यामुळे तुम्हाला तुमची त्वचा वयापेक्षा जास्त मोठी वाटावी अशी वाटत नसेल तर तुम्ही याचा वापर जपून करायला हवा.
जर तुम्हाला टॅन आवडत नसेल तर तुम्ही Tanning oilचा अजिबात वापर करु नका.कारण जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर अनावश्यक टॅन नको असेल तर तुम्हाला हा प्रकार अजिबात आवडणार नाही. अनेकदा ज्या ठिकाणी Tanning oil लावता तितकाच हा अधिक टॅन दिसून येतो. त्यामुळे असे चट्टे चांगले दिसत नाहीत. विशेषत: चेहऱ्याला Tanning oil लावताना डोळे हे गॉगलमध्ये झाकले जातील याची विशेष काळजी घ्या.
तुम्हाला Tanning oil घ्यायचे असेल तर आम्ही बाजारात मिळणारे Tanning oil खास तुमच्यासाठी काढले आहेत. तुम्ही जर काही घेण्याचा विचार करत असाल तर popxo ने निवडलेले हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच वापरु शकता.
प्रोडक्टची माहिती (Description): ड्राय असल्यामुळे याचा वापर कोणीही करु शकल्याचा दावा कंपनीकडून केला जातो. शिवाय यामुळे टॅनिंग पटकन होते
फायदे (Pros): कोरडे असल्यामुळे हे वापरायला सोपे जाते. कोणत्याही त्वचेसाठी वापरता येते.
तोटे (cons): याची किंमत तुलनेने अधिक आहे. त्यामुळे घेताना विचार करावा लागतो.
प्रोडक्टची माहिती (Description): बनाना बोटचा हा टॅनिंग स्प्रे असून यामुळे तुमचे टॅनिंग लवकर होते असा दावा कंपनीकडून करण्यात येतो
फायदे (Pros): स्प्रे स्वरुपात असल्यामुळे हे tanning oil लावायला सोपे जाते
तोटे (cons): किंमत तुलनेने अधिक आहे. त्यामुळे याचा वापर जपून करावा लागतो.
प्रोडक्टची माहिती (Description): हवाईन ट्रॉपिक डार्क टॅनिंग या प्रोडक्टमध्ये मॉश्चरायझिंग ऑईलचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुमची त्वचा कायम मॉश्चराईज राहण्याचा दावा केला जातो
फायदे (Pros): तुमची त्वचा हे लावूनही मऊ राहते. tanning oil मुळे होणारे इतर त्रास होत नाही
तोटे (cons): किंमत तुलनेने फारच अधिक आहे.
प्रोडक्टची माहिती (Description): टॅनिंग योग्य पद्धतीने करण्याचा दावा या कंपनीकडून करण्यात येतो. शरीराला आवश्यक इतकेच टॅन या प्रोडक्टमुळे होतो.
फायदे (Pros): यामध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते.
तोटे (cons): याचा अतिरेक तुमच्या त्वचेला इजा पोहोचवू शकतो. शिवाय किंमत ही गोष्टही आहेच.
प्रोडक्टची माहिती (Description): तुम्हाला जलद गतीने टॅन करण्याचा दावा या प्रो़डक्टकडून करण्यात होते. याचे टॅनिंग तुमच्या त्वचेच्या आत पर्यंत जाते.
फायदे (Pros): तुमच्या त्वचेवर टॅन पटकन होते.
तोटे (cons): त्वचा नाजूक असेल तर याचा वापर करणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
प्रोडक्टची माहिती (Description): तुमच्या टॅनिंगला हा ऑईल स्प्रे चालना देतो. त्यामुळे तुमचे टॅनिंग पटकन आणि चांगले होते.
फायदे (Pros): टॅनिंग होण्यासाठी मदत करते.
तोटे (cons): पटकन टॅन होताना अधिक काळ उन्हात राहिल्यानंतर सनबर्न होण्याची शक्यता
प्रोडक्टची माहिती (Description): जर तुम्ही टॅनिंग नुकतेच सुरु करण्याचा विचार करत असाल तर यांचे किट उत्तम असल्याचा दावा कंपनी करते.
फायदे (Pros):begginer किट असल्यामुळे तुम्हाला वापरणे सोपे जाते.
तोटे (cons): याची किंमत तुलनेने अधिक आहे
प्रोडक्टची माहिती (Description): जेल फॉर्ममध्ये असल्यामुळे हे जेल लावणे सोपे जाते असा दावा कपंनीकडून केला जातो.
फायदे (Pros): लावणे सोपे आहे. शिवाय इन्स्टंट टॅनिंग होते.
तोटे (cons): जेल असल्यायामुळे कदाचित लोकांना आवडणार नाही. शिवाय याची किंमत तुलनेने अधिक जास्त आहे.
प्रोडक्टची माहिती (Description): अधिक चांगला आणि कोणताही त्रास त्वचेला होऊ न देता टॅन करण्याचा दावा ही कंपनी करते.
फायदे (Pros): क्लिअर स्प्रे असल्यामुळे तो तुमच्या त्वचेवर पटकन दिसत नाही.
तोटे (cons): अति वापर त्रासदायक
प्रोडक्टची माहिती (Description): हा सेल्फ टॅनर प्रकार असून त्यामुळे टॅन चांगले होण्याचा दावा कंपनी करते.
फायदे (Pros): कुठेही कॅरी करणे अगदी सोपे आहे.
तोटे (cons): याचा उपयोग करणे माहीत असणे आवश्यक आहे.
आता हे tanning oil लावण्याची योग्य पद्धत कोणती असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर थोडी काळजी घेतली तर तुम्ही अगदी सहज tanning oil लावू शकता.
होय, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. तुम्ही सतत Tanning oil चा वापर तुम्ही तुमच्या त्वचेवर केला तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर अगदी योग्य पद्धतीने करायला हवा. त्यामुळे Tanning oil चा वापर करताना त्यावरील लावण्याची पद्धत नीट वाचा
तुमच्याकडे Tanning oil नसेल तर तुम्ही नारळाचे तेल वापरु शकता. नारळाच्या तेलाचे फायदे अनेक आहेत. तुमच्याकडे tanning oil नसेल तर तुम्ही नारळाचे तेल सुद्धा वापर शकता.
tanning oil चे अनेक फायदे आहेत. तुम्ही ते त्वचेला लावल्यानंतर तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले टॅन करते. या शिवाय तुम्हाला या tanning oil चे अनेक फायदे मिळतात.
तुम्ही tanning oil लावल्यानंतर तुम्हाला हा फरक दिसण्यास थोडा वेळ जाऊ शकतो. तुम्हाला अपेक्षित टॅन मिळण्यासाठी थोडो वेळ जाऊ शकतो. हे टॅनिंग सूर्यकिरणांवरही अवलंबून आहे
जर तुम्ही कोणत्या उन्हाच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही तुमचे tanning oil सोबत ठेवायलाच हवे. उन्हात जाण्याच्या किमान 10 मिनिटं आधी तर तुम्ही tanning oil लावायला हवे.