शस्त्रक्रियेद्वारे (बेरिअॅट्रिक सर्जरी) वजन कमी झाल्यानंतर अशी घ्या काळजी

शस्त्रक्रियेद्वारे (बेरिअॅट्रिक सर्जरी) वजन कमी झाल्यानंतर अशी घ्या काळजी

रोजच्या धावपळीच्या जीवनात हल्ली आपल्याला लक्ष द्यायला वेळ नसतं. त्याचा सर्वात मोठा परिणाम होत असतो तो आपल्या शरीराच्या वजनावर. बऱ्याचदा काही लोकांचं वजन इतकं वाढतं की, ते नुसत्या व्यायामाने कमी होणं शक्य नसतं. अशावेळी त्यांना शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा लागतो. अतिरिक्त जमा झालेली चरबी कमी करणं काही जणांना शक्य होत नाही. अशा व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाऊ लागतात. पण त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय असतो. पण ही शस्त्रक्रिया केल्यानंतरही योग्य ती काळजी घ्यावी लागते. याबद्दलच आम्ही चर्चा केली ती ‘डॉ. मोहन थॉमस, सिनिअर कॉस्मेटिक सर्जन, कॉस्मेटिक सर्जरी इन्स्टिट्यूट’ यांच्याशी. त्यांनी अशावेळी नक्की काय काळजी घ्यायला हवी याची सविस्तर माहिती दिली. तीच आम्ही तुमच्यासाठी या लेखाद्वारे घेऊन आलो आहोत. 

स्त्रियांमध्ये शस्त्रक्रियेनंतर सामान्यपणे ओटीपोट, मांड्या, हात व नितंबांवरील चरबी कमी होते, शिवाय त्यांच्या स्तनांचे आकारमानाही लक्षणीयरित्या घटते. म्हणूनच, या भागातील त्वचा साधारणपणे सैल पडलेली दिसते. पुरुषांमध्ये पोट, छाती व नितंबांवरील चरबी कमी होते, त्यामुळे त्यांचे हात आणि पाय सहसा योग्य आकारात दिसतात. अनेकजण वयस्कर दिसू लागतात, कारण, त्यांच्या चेहऱ्यावरील चरबी नाहीशी झाल्याने चेहऱ्याची त्वचा ओघळते. शस्त्रक्रियेनंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात. 

वजन कमी केल्यानंतर शरीराला आकार देण्यासाठी काय करावं

shutterstock

वजन कमी केल्यानंतर ते त्याचप्रमाणे आपल्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला योग्य आकार देण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या लागतात. या शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतात याचीही माहिती डॉक्टरने दिली आहे. 

लायपोसक्शन

Instagram

वजन कमी झाल्यानंतर शरीर आकारात आणण्यासाठी साधारणपणे लायपोसक्शन आणि अतिरिक्त तसेच लोंबणारी त्वचा काढून टाकणे यांचे कॉम्बिनेशन केले जाते. ही प्रक्रिया प्रत्येक रुग्णानुसार वेगवेगळी असते. कारण, प्रत्येकाचे वजन कमी होण्याचे क्षेत्र वेगळे असते आणि त्यानुसार गरजा वेगवेगळ्या असतात. म्हणून, त्यांच्या गरजांनुसार प्रक्रियेची शिफारस केली जाते.

टमी टक

टमी टक किंवा बॉडी लिफ्ट प्रक्रिया करून डोक्याखालील शरीराची त्वचा घट्ट ओढली जाते, मांड्या थाय लिफ्ट प्रक्रियेद्वारे घट्ट केल्या जातात आणि स्तन/छातीची स्थिती स्त्रियांमध्ये ब्रेस्ट लिफ्ट ऑगमेंटेशनने सुधारली जाते. टमी टक (ओटीपोटावरील त्वचा घट्ट करणे), आऊटर थाय लिफ्ट आणि बटक लिफ्ट सर्कमफेरेन्शिअल बॉडी लिफ्ट या एकत्रित प्रक्रियेद्वारे केले जातात. रुग्णाच्या स्वत:च्या उती वापरून बटक ऑगमेंटेशन (नितंब फुगवणे) प्रक्रिया केली जाते. यात नितंब भरून काढली जातात, जेणेकरून ती सपाट दिसू नयेत आणि गोलसर आणि उभारयुक्त दिसावीत.

स्तन आणि हातांचे रिशेपिंग

बॉडी कोंटोरिंग प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात शरीराच्या वरील भागाचा समावेश होतो. यामध्ये स्तनांना आकार दिला जातो (ब्रेस्ट लिफ्ट आणि/किंवा स्त्रियांमध्ये एनलार्जमेंट व पुरुषांमध्ये स्तनाग्रांचे रिपोझिशन) तसेच हातावरील अतिरिक्त त्वचेला आकार दिला जातो. यामध्ये त्वचेचे सैल आच्छादन घट्ट केले जाते. त्यामुळे हात शरीराशी प्रमाणबद्ध दिसू लागतात. ही प्रक्रिया पहिल्या प्रक्रियेनंतर ६-१२ आठवड्यांनी केली जाते.

महत्त्वाचा मुद्दा

तुमचे वजन कमी होण्याची प्रक्रिया स्थिर होत नाही तोवर या प्रक्रिया करवून घेऊ नका. वजनामध्ये कोणताही बदल न होता ३ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर ३ महिन्यांनी या प्रक्रियांचा विचार करा. शिवाय, या प्रक्रिया करवून घेण्यासाठी तज्ज्ञ व अर्हताप्राप्त सर्जनचीच निवड करा.