ADVERTISEMENT
home / फॅशन
ठाण्यात शॉपिंग करायची आहे, मग या Designer Boutiquesला जरूर भेट द्या

ठाण्यात शॉपिंग करायची आहे, मग या Designer Boutiquesला जरूर भेट द्या

शॉपिंग हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे सुटीच्या दिवशी शॉपिंगला जाणं, मनसोक्त शॉपिंग करणं कुणाला नाही आवडणार. पण यासाठी कोणत्या ठिकाणी काय चांगलं मिळतं हे माहीत असायला हवं. जर तुम्ही शॉपिंगसाठी ठाणे शहराची निवड केली असेल तर तुम्हाला शॉपिंगसाठी भरपूर वाव आहे. कारण आम्ही तुम्हाला ठाण्यातील काही प्रसिद्ध डिझायनर बुटीक्सची माहिती देणार आहोत. डिझायनर बुटीक्स मधून खरेदी करण्याची एक वेगळीच मौज असते. कारण बुटिक म्हटलं की तुम्हाला काहीतरी खास खरेदी करता येऊ शकतं प्रत्येकाला आपल्याकडे युनिक डिझाईनचे कपडे असावेत असं वाटत असतं. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या ड्रेस अथवा साडीचा पॅटर्न इतरांनी  घातलेला पाहता तेव्हा तुम्हाला नक्कीच हिरमुसायला होतं. कारण बाजारात तशा पॅर्टनचे अनेक कपडे असतात. डिझायनर बुटीकमध्ये मात्र तुम्हाला जरा हटके आणि वन पीस डिझाईन्स मिळू शकतात. यासाठीच आम्ही तुम्हाला ठाण्यातील या बुटीक्सची माहिती देत आहोत. 

Instagram

ठाणे शहराचे वैशिष्ट्य (Thane Specialty)

ठाणे शहर हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेलं एक शहर आहे. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हटलं जातं. ठाण्यात अनेक तलावं  असल्यामुळे ठाण्याला तळ्याचं शहरअसंही म्हणतात. मुंबई शहराच्या गजबजाटापासून दूर आणि निसर्गसौदर्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी अनेकांना ठाण्यात राहणं आवडतं. मुंबई आणि गावाकडच्या लोकांना ठाण्याने जणू बांधूनच ठेवलं आहे. शिवाय ठाण्यात अनेक शॉपिंग मॉल्स, खरेदीसाठी प्रसिद्ध दुकानं आणि डिझायनर बुटीक्सदेखील आहेत. ज्यामुळे ठाण्यात शॉपिंग करण्यासाठी लोकांची गर्दी असते. जर तुम्ही ठाण्यात खरेदीचा प्लॅन आखत असाल तर या बुटीक्सनां जरूर भेट द्या.

ADVERTISEMENT

ठाण्यातील प्रसिद्ध डिझायनर बुटीक्स (Designer Boutiques in Thane)

ठाणे शहरात अनेक प्रसिद्ध डिझायनर बुटीक आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही अगदी मनसोक्त शॉपिंग करू शकता. डिझायनर साड्या, एथनिक ड्रेस, ब्लाऊज, दुपट्टा, पर्स, दागदागिने खरेदी करायचे असतील तर या ठिकाणांना जरूर भेट द्या.

1. कलापी एथनिक पॅलेस (Kalapi Ethnic Palace)

पत्ता (Address) – बी – १ शिल्पाली बिल्डिंग, पाचपाखाडी, आराध्य टॉकिज समोर ,  ठाणे (पश्चिम) 400602, 

कसे जाल (How to reach) – ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरून रिक्षाने तुम्ही पाचपाखाडी येथे जाऊ शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique speciality) – या बुटीकमध्ये तुम्हाला महिलांसाठी काही खास ड्रेस, साड्या खरेदी करता येतील. ठाण्यामधील हे एक क्लासिक दुकान आहे. या दुकानात तुम्हाला सिल्कच्या साड्या, रेडिमेड पंजाबी सूट, कस्टमाईज ब्रायडल विअर खरेदी करता येईल

ADVERTISEMENT

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth range approx) – कमीत कमी  3000 रू. पासून पुढे

Just dial

2. पेहनावा बुटीक (Pehnawa Boutique)

पत्ता (Address) – शॉप नं. 31, मंगल कार्यालय शॉपिंग सेंटर, श्रीनगर, ठाणे

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – ठाण्यातील श्रीनगरला जाण्यासाठी तुम्ही बस, रिक्षा अथवा खाजगी वाहनाचा वापर करू शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – या दुकानात तुम्हाला विविध प्रकारचे ड्रेस, वेडिंग लेंहगा, ब्लाऊज, साड्या खरेदी करता येऊ शकतात.

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 3000 रू. च्या पुढे या  ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. 

3. ग्लोबल देसी स्टोर (Global Desi Store)

पत्ता (Address) – शॉप नं. 23 आणि 24, दुसरा माळा, कोरम मॉल, कॅडबरी कंपनी जवळ, ठाणे (पश्चिम) 400602

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – कोरम मॉल मध्ये जाण्यासाठी तुम्ही बस, रिक्षा अथवा खाजगी वाहनाचा वापर करू शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – या बुटीकमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे एथनिक लुकचे कपडे सर्व प्रकारच्या साईजमध्ये उपलब्ध होऊ शकतात. शिवाय ट्रायल केल्यावर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फिटिंग करून मिळू शकते. 

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 2000 रू. च्या पुढे या ठिकाणी तुम्ही कपडे खरेदी करू शकता

ADVERTISEMENT

Just dial

4. दी लेडी (The Lady)

पत्ता (Address) – शॉप नं. ३, तारा दर्शन, चाफेकर रोड, आंध्रा ब्रॅंकजवळ,  मुलुंड पूर्व 400081

कसे जाल (How to Reach) – मुलुंडवरून रिक्षाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – या शॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या रेडीमेड कुर्ती, ड्रेस, पंजाबी सूट मिळू शकतात. हे कपडे विविध पॅर्टन्स, रंग आणि युनिक असून तुम्ही त्यांची व्यवस्थित ट्रायल घेऊन मगच विकत घेऊ शकता.

ADVERTISEMENT

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – या ठिकाणी 1000 रू. पासून तुम्ही तुमच्या बजेटनूसार शॉपिंग करू शकता.

Just dial

5. वैशाली कलेक्शन (Vaishali Collection)

पत्ता (Address) – शॉप नं. 37, पहिला माळा, आम्रपाली आर्केड, पोखरण रोड नं. 2, वसंत विहार, ठाणे, (पश्चिम) 400610

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach ) – ठाण्यातील कोणत्याही खाजगी अथवा सरकारी वाहतूकीच्या वाहनामधून या ठिकाणी जाऊ शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – ड्रेस मटेरिअल, दुपट्टा, कलकत्ता साडी, बंगाली साडी असे विविध प्रकारचे कपडे आणि ड्रेस आणि ब्लाऊज शिवण्यासाठी टेलर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळेल.

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 1000 रू. पासून पुढे तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

6. नाकोडा डिझायनर स्टुडिओ (Nakoda Designer Studio)

पत्ता (Address) – शंकर विला बिल्डिंग, खारकर अळी रोड, महाजन वाडी समोर,   ठाणे (पश्चिम) 400601

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – ठाणे स्थानकावरून तुम्ही खाजगी वाहने अथवा बस, रिक्षाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – नाकोडा बुटिकमध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीचे कपडे तयार करून दिले जातात. 

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 2000 रू. च्या पुढे तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. 

7. मौसम

पत्ता (Address) – शॉप 1, 2, 3, विश्वजेता बिल्डिंग, खारघर, अली स्ट्रीट, सी. के, पी  हॉल, ठाणे (पश्चिम) 400601

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – ठाण्यात रिक्षाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique speciality) – साड्यांची खरेदी करण्यासाठी, डिझायनर कुर्ती, ड्रेस मटेरिअल, सिल्कच्या साड्या अथवा लग्नाची  खरेदी करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता.

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 4000 रू. पुढे खरेदी करण्यासाठी चांगले ठिकाण आहे

8.हस्तकला (Hastkala)

पत्ता (Address) – शॉप नं. 5, मनोहर रतन बिल्डिंग, गोखले रोड, नौपाडा. ठाणे (पश्चिम) 400602

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – ठाणे रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ असल्याने तुम्ही अगदी चालत देखील या दुकानात जाऊ शकता. 

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे एथनिक ड्रेस, साड्या, दागदागिने, पर्स मिळू शकतात. थोडंस बजेट वाढवलं तर या ठिकाणी खरेदी केल्यामुळे तुमच्याकडे साड्या आणि ड्रेसचं अप्रतिम कलेक्शन वाढू शकतं. 

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – कमीत कमी 5000 रू. 

ADVERTISEMENT

Instagram

9. कलामंदिर (Kalamandir)

पत्ता (Address)  – शांताजी शिदीर बिल्डिंग, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) 400602

कसे जाल (How to Reach) – ठाणे रेल्वे स्थानकापासून जवळ असल्याने तुम्ही या ठिकाणी अगदी चालतदेखील जाऊ शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – सिल्कच्या साड्या, डिझायनर ड्रेस, लेंहगा अशा विविध प्रकारचे एथनिक कपडे तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

ADVERTISEMENT

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – कमीत कमी 5000 रू.

Instagram

10. ड्रेप डिझायनर (Drape Designer)

पत्ता (Address) – शॉप नं 1, माहेर बिल्डिंग, बाजी प्रभू देशपांडे मार्ग, बेडेकर शाळेजवळ,नौपाडा, ठाणे पश्चिम 400602 

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – खाजगी वाहन अथवा रिक्षाने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – या बुटिकमध्ये तुम्ही विविध प्रकारचे ड्रेस, साड्या, निरनिराळ्या पॅर्टनचे कुर्ती खरेदी करू शकता. रेडिमेड कपडे खरेदी करण्यासाठी  हे एक उत्तम ठिकाण आहे.

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 1000 रू. च्या पुढे खरेदी तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

11. संस्कृती डिझायनर स्टुडिओ

पत्ता (Address) – शॉप नं. 2, सुर्या सदन, राम मारूती रोड, जैन ट्रेडर्स जवळ, नौपाडा

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – ठाण्यात शॉपिंग करण्यासाठी राम मारूती रोड फेमस असल्यामुळे तुम्हाला अगदी चालत देखील या ठिकाणी जाता येईल.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – साड्या, रेडीमेड ड्रेस, सलवार कमीझ, डिझायनर ड्रेस आणि कुर्ती अशा विविध प्रकारच्या कपड्यांसाठी हे बुटीक मस्त आहे. 

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth range approx) – 1000 रू. पासून तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता

12. गुड्डीज कलेक्शन (Guddis Collection)

पत्ता (Address) – एलिगंस टॉवर, एलबीएस रोड, ठाणे (पश्चिम) 400602

ADVERTISEMENT

कसे जाल (How to Reach) – ठाणे स्थानकापासून तुम्ही रिक्षाने या ठिकाणी जाऊ शकता.

बुटीकमध्ये स्पेशल काय (Boutique Speciality) – कॉटनचे ड्रेस मटेरिअल, एथनिक साड्या, विविध प्रकारच्या युनिक कपड्यांची खरेदी करण्यासाठी तुम्ही या बुटीकमध्ये जाऊ शकता.

खरेदीचा अंदाजे खर्च (Cloth Range Approx.) – 1000 रू. च्या वर खरेदी करण्यासाठी

ठाण्यात शॉपिंग करताना मनात येणारे काही प्रश्न (FAQs)

ठाण्यात कोण-कोणत्या गोष्टींची शॉपिंग करता येईल ?

ठाणे शहर हे ठाणे जिल्यातील मध्यवर्ती शहर असल्यामुळे दोन्ही कडच्या लोकांसाठी ते सोयीचे आहे. शिवाय ते मुंबईपासून जवळ आहे. ठाण्यात विविध शॉपिंग मॉल्स , डिझायनर बुटीक्स ,साड्यांची दुकानं आहेत. ज्यामुळे कोणत्याही वयोगटातील माणसं इथे शॉपिंग करू शकतात. सर्वांसाठी सर्व गोष्टी ठाण्यात मिळू शकतात. 

ADVERTISEMENT

ठाण्यात साड्यांची शॉपिंग कुठे करावी ?

ठाणे  शहरात अगदी साध्या साड्यांपासून ते भरजरी साड्यांपर्यंत सर्व साड्या तुम्ही खरेदी करू शकता. ठाणे रेल्वे स्थानकापासून अगदी जवळ अनेक प्रसिद्ध साड्यांची दुकानं आहेत. जिथे तुम्ही साड्या घेऊ शकता. 

ठाण्यात कोणत्या वेळी शॉपिंग साठी जाणं सोयीचं आहे ?

ठाणे शहर मुंबईपासून जवळ असल्याने अनेक लोक सतत ठाण्यात शॉपिंगसाठी येत असतात. शिवाय काम अथवा नोकरीनिमित्त मुंबई ते ठाणे प्रवास करणारे लोकही  फार आहेत. त्यामुळे ठाण्यात सकाळी आणि संध्याकाळी फार गर्दी असते. मात्र जर तुम्हाला निवांत शॉपिंग करायची असेल तर तुम्ही दुपारच्या वेळी ठाण्यात नक्कीच जाऊ शकता. 

मुंबईहून ठाण्याला कसं जावं ?

मुंबईहून ठाण्याला येण्यासाठी रेल्वे, बस आणि चारचाकी वाहने अशी अनेक वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत. 

ADVERTISEMENT

Instagram

कोणत्या गोष्टी ठाण्यात चांगल्या मिळतात ?

ठाण्यात तुम्ही चांगले साड्या, फूटवेअर, दाग-दागिने, पर्स, ड्रेस अशी अनेक गोष्टींची  खरेदी करू शकता. 

ठाण्यात शॉपिंग करताना खाण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ?

ठाण्यात शॉपिंग करताना तुम्हाला जर भुक लागली तर अनेक हॉटेल्स आणि पार्सल कांऊटर्स आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता. ठाण्यातील तलावपाळीच्या शेजारी , राम मारूती रस्त्यावर तुम्हाला अनेक उपहारगृहे आणि खाण्यासाठी उत्तम पर्याय नक्कीच मिळतील. ठाण्यातील गजानन वडापाव, मामलेदार मिसळ, कुंजविहार, मेतकूट या ठिकाणची चव एकदा चाखलीत तर तुम्हाला पुन्हा पुन्हा या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटेल.

29 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT