Ganesh Chaturthi Information In Marathi - गणेश चतुर्थी माहिती, कृती, शुभेच्छा, संदेश आणि कोटस

‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती (Ganesh Chaturthi Information In Marathi)

‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती  (Ganesh Chaturthi Information In Marathi)

गणपती बाप्पा मोरया....आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो. या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवसाची म्हणजेच गणेश चतुर्थीची महती सांगणारा हा लेख खास तुमच्याासाठी.  

Table of Contents

    गणेश चतुर्थीचं महत्त्व (Significance Of Ganesh Chaturthi)

    2019 मध्ये गणेश चतुर्थी 2 सप्टेंबरला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते. 

    Instagram
    Instagram

    गणेश चतुर्थीची कथा (Ganesh Chaturthi History)

    हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चार्तुमासात येतो. चार्तुमास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत. 

    गणेश जन्माची आख्यायिका - 

    पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. 

    गणेश चतुर्थी आणि हरतालिका व्रत (Ganesh Chaturthi and Hartalika Vrat)

    Instagram
    Instagram

    गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं. हे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून तर सुवासिनी आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात. या दिवशी शंकर देव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी निर्जळ व्रत करून हा उपास गणेश चतुर्थीला सोडला जातो. गणपतीच्या विसर्जनासोबतच या व्रताच्या पूजेचेही विसर्जन केले जाते.

    गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू (Important Aspects Of Ganesh Chaturthi)

    गणेश चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं आणि सुरूवात होते ती गणेशोत्सवाच्या पर्वाला. पाहूया गणेश चतुर्थी म्हटल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. जाणून घेऊया गणेश चतुर्थीचे मुख्य पैलू.

    गणेश प्रतिष्ठापना आणि पूजा (Ganesh Pooja and Ganpati Sthapna)

    गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते. पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नेवैद्य इ. सोळा उपचारांनी षोडशोपचारे गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुलं, शमी आणि दुर्वा तसंच विविध पत्रीपानं या पूजेमध्ये वापरली जातात. या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीसोबतच त्याचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीला संपतो. तेव्हाच गणपतीचं विसर्जन केलं जातं.

    गणपतीचा आवडता नेवैद्य मोदक (Modak)

    गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केला जातात किंवा तळणीचे ही मोदक केले जातात. आजकाल तर मोदकांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की, चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोकं चतुर्थीला चंद्राकडे पाहात नाहीत. 

    दुर्वा (Durva)

    गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. 

    जास्वंद (Jaswandi)

    दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.

    गणपतीच्या आरत्या (Aarti)

    सुखकर्ता दुःखहर्ता… ही गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते. प्रचलित गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

    Instagram
    Instagram

    महाराष्ट्रातील गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi In Maharashtra)

    महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो.

    Instagram
    Instagram

    भारताबाहेरील गणेश चतुर्थी (Celebration Of Ganesh Chaturthi Outside India)

    गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्त्या विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते. तिथेही खास गणेश चतुर्थीला मोदकांचा प्रसाद दाखवून षोडशोपचारे पूजा केली जाते.

    Instagram
    Instagram

    गणपती चतुर्थीसाठी खास डिशेस (Ganesh Chaturthi Special Dishes)

    गणेश चतुर्थीला नैवेद्य म्हणून मोदकाला प्राधान्य असतं त्यातही उकडीच्या मोदकांना त्याची रेसिपी तर आम्ही देतच आहोत. त्यासोबतच काही रेसिपीज ज्या तुम्ही चतुर्थीला करू शकता. 

    १. उकडीचे मोदक (Modak Recipe)

    Instagram
    Instagram

    उकडीच्या मोदकांना गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असतं. कारण हा गणपतीला आवडता प्रसाद आहे. गणेश चतुर्थीला पारंपारिकरित्या तांदूळ, गूळ आणि नारळ यांच्यापासून बनवलेले मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात. जे चवीला तर उत्तम असतातच, पण दिसायला छान असतात. हे मोदक एकत्र बसून करण्यातही वेगळीच मजा आहे. मला आठवतंय, आमच्या काकाकडे दीड दिवसाचा गणपतीला आम्ही म्हणजे 3 काकू, आजी, वहिनी आणि बहीण मिळून उकडीचे मोदक करायचो. खूपच मज्जा यायची. आज या रेसिपीने पुन्हा त्या दिवसांची आठवण आली. 

    आवश्यक साहित्य (Ingredients)

    तांदूळाची पीठ - 1.25 कप (200 ग्रॅम) 

    खोवलेलं खोबरं - 1.5 कप 

    गूळ - 1 कप (200 ग्राम) (गूळ तुम्ही कुस्करून किंवा किसून घेऊ शकता)

    बदाम - 10-12 

    काजू - 10-12 

    तूप - 2 टेबल स्पून 

    वेलची - 6-7 

    मनुका - 1 टेबल स्पून 

    चिमूटभर किंवा स्वादानुसार मीठ 

    कृती (How to make Ukdiche Modak without Mould)

    तांदूळाचं पीठ घ्या. एका मोठ्या पातेल्यात 1.5 कप पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवा. या पाण्यात 2 छोटे चमचे तेल आणि 1 चिमूट मीठ घालून पाण्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर गॅस स्लो करून त्यात तांदळाचं पीठ घाला आणि मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका. गॅस बंद करून हे मिश्रण 5 मिनिटं झाकून ठेवा.

    सारणासाठी 

    जोपर्यंत उकड वाफेत शिजतेय तोपर्यंत सारण बनवून घ्या. एका कढईत एक चमचा तूप टाकून गरम करायला गॅसवर ठेवा. तूप तापल्यावर त्यात गूळ आणि खोवलेला नारळ घाला. हे मिश्रण मंद आचेवर चांगलं शिजवून घ्या. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडरही घालू शकता. हे मिश्रण चांगलं मिक्स झाल्यावर तुमचं सारण रेडी आहे. ते थंड करत ठेवा. 

    आता उकड एका प्लेटमध्ये काढून चांगली मळून घ्या. हाताला थोडं तेल किंवा तूप लावून चांगली मळा. तुमची उकड मोदक करण्यासाठी तयार आहे. 

    मोदक बनवा 

    मोदक बनवण्यासाठी पुन्हा एकदा हाताला तेल किंवा तूप लावून घ्या. लिंबाएवढा गोळा घ्या आणि तो हातावर चपटा करून घ्या. मग त्याची खोलगट पारी करून घ्या. लक्षात घ्या हाताला हे पीठ चिकटता कामा नये. तसंच ते जास्त कोरडंही होऊ नये. त्यात सारण भरून त्याच्या कळ्या करून मोदक बंद करा. 

    मोदकाला अशी द्या वाफ 

    एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवा. या चाळणीला तूप लावून त्यावर मोदक ठेवा. ते एकमेकांना चिकटता कामा नये एवढं अंतर ठेवा. मोदक ठेवून झाल्यावर ते झाका. वाफेवर शिजून द्या. किमान 12 मिनिट शिजू द्या. तुम्ही गॅस फास्ट ठेवू शकता. नंतर गॅस बंद करा. मोदक ठेवलेली चाळणी भांड्यातून काढा. गरमगरम मोदक फारच चविष्ट लागतात. पण बाप्पाला नैवेद्य दाखविल्याशिवाय आणि त्यावर तूप घातल्याशिवाय मोदक खाऊ नका. शास्त्र असतं ते. 

    सूचना 

    • मोदकासाठी तांदूळाची बारीक पिठी घ्या. 
    • मोदकासाठी केलेली उकड ही जास्त घट्ट किंवा मऊ नसावी. लक्षात ठेवा मोदकाची पारी बनवताना ती फाटणार नाही याची काळजी घ्या. 

    उकडीचे मोदक अजून चांगल्या रितीने करता येण्यासाठी तुम्ही पाहू शकता हा मधुराज रेसिपीजने शेअर केलेला व्हिडिओ. 

    २. पुरण न वाटता करा पुरणाच्या पोळ्या (Puran Poli Recipe)

    साधारणतः पुरणाच्या पोळ्या गणपतीत केल्या जात नाहीत. पण तुमच्याकडे सर्वांना पुरणपोळ्या आवडत असल्यास करायला हरकत नाही. पाहा मधुराज किचनमधील ही सोपी पुरण न वाटता करायची पुरणपोळी.

    ३. सुक्यामेव्याचं केशर श्रीखंड (Shrikhand Recipe)

    श्रीखंड हीसुद्धा एक मेजवानी असते. पाहा मधुराज किचनमधील चक्क्यापासून बनवलेलं केशर आणि सुकामेवायुक्त श्रीखंड.

    ४. पाकातल्या खुसखुशीत पुऱ्या (Pakatali Puri)

    पाकातल्या पुऱ्या या तुम्हाला अगदी झटपट बनवता येतील. जर तुम्ही चतुर्थीला सोपा गोड पदार्थ करायच्या बेतात असाल तर हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल. 

    ५. मूग डाळीचा हलवा (Moong Dal Halwa Recipe)

    मूग डाळीचा हलवा हा गोड पदार्थ बऱ्याच जणांना आवडतो. मग पाहा मधुराज रेसिपीजने दाखवलेला हा चवदार मूग डाळीचा हलवा.

    ६. झटपट बर्फी (Burfi Recipe)

    जर वरील कोणताही पदार्थ तुम्हाला करायचा नसेल आणि काहीतरी झटपट करायचं असेल तर पाहा हा मधुराज रेसिपीमधील झटपट बर्फीचा व्हिडीओ

    गणेश चतुर्थीसाठी खास कोटस (Ganesh Chaturthi Quotes)

    • विश्वास ठेवा...आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगल करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी बाप्पा चांगल काहीतरी घडवत असतो. गणेशोत्सव मंगलमय होवो. 
    • सुखकर्ता जय मोरया, दुःखहर्ता जय मोरया 
      कृपा सिंधू जय मोरया, बुद्धीविधाता मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
    • श्री गणेशाची कृपा तुमच्यावर कायम राहो
      प्रत्येक कार्यात सफलता मिळो, जीवनात कोणतंही दुःख ना येवो.
    • पावलोपावली फूल उमलो, प्रत्येक आनंद तुम्हाला मिळो, कधी दुःखाचा सामना ना होवो, हीच गणेश चरणी प्रार्थना.
    • गणपतीचं रूप निराळं, चेहरा किती भोळा, ज्यावरही संकट आलं, त्याला बाप्पानेच तारलं. 
    • गणपतीच्या ज्योतीने मिळतं तेज
      जो येई गणरायाच्या दारी त्याला काही ना काही मिळतं हे नक्की. 
    • मनापासून मागा हा गणपतीबाप्पाचा दरबार आहे, 
      देवाधिदेव वक्रतुंडाला समस्त भक्तांवर प्रेम आहे.
    • अंधारी रात्र नवीन सकाळ घेऊन येते
      आता डोळे उघडा बाप्पाच्या दर्शनासाठी साद येते
    • धुमधडाक्यात आले गणपती
      धुमधडाक्यात गेले गणपती, सर्वात आधी येऊन आपल्या मनात वसले गणपती
    • गणपती आले सुख-समृद्धी आली
      गणपतीच्या आशिर्वादाने आम्ही सुखाने आरती गायली 
    Instagram
    Instagram

    गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Ganesh Chaturthi Wishes)

    • आज संकष्टी चतुर्थी
      आजच्या या मंगल दिनी
    • सर्व गणेशभक्तांच्या मनातील, सर्व इच्छित मनोकामना, श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
    • देव येतोय माझा…आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची…
    • वंदन करतो गणरायाला,
      हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! सर्व गणेश भक्तानां संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
    • आज संकष्टी चतुर्थी
      श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
    • आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील, सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
    • आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
      व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
    • बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!
    • या संकष्टी चतुर्थी आपल्या जीवनात आनंद आणू शकतात.
      द्वेष आपल्या जीवनापासून दूर आहे. आपल्या हृदयात प्रेमासह आणि इतरांसाठी शुभेच्छा असलेल्या सणांचा आनंद घ्या
    • भगवान गणेश तुम्हाला सर्व वाईट
      गोष्टी दूर ठेवतील आणि नेहमीच आशीर्वाद देईल, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, आनंदी संकष्टी चतुर्थी
    • दिव्य देव आपल्या जीवनात आपल्या सर्व
      अडथळ्यांना दूर करू शकतो. आनंदी संकष्टी चतुर्थी
    • तुम्हाला आनंदी संकष्टी चतुर्थीची इच्छा आहे.
      गणपती बाप्पा आपल्या जीवनात यश आणि आनंद आणू दे
    • भगवान गणेश येतील तुझ्या घरी 
      आपली सर्व चिंता आणि दुःख दूर करी...शुभ संकष्टी चतुर्थीची होऊ दे इच्छापूर्ती 
    Instagram
    Instagram

    गणेश चतुर्थीसाठी खास संदेश (Ganesh Chaturthi Messages)

    • सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फ़ुर्ती..आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…गणपती बाप्पा मोरया
    • बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
      भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..हीच गणरायाकडे प्रार्थना! संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
    • सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
      तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
    • भक्ती गणपती, शक्ती गणपती,सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती, महा गणपती. हे गणेश चतुर्थी बाप्पा तुम्हाला भक्ती, शक्ती, सिद्धी, लक्ष्मी आणि समृद्धी देईल. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
    • वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला..प्रार्थना करतो गजाननाला, सर्वांना सुखी ठेव नेहमी..! संकष्ट चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
    • सिद्धीविनायक मजपुढे मी पाहिला...गौरीनंदन मजसमोर मी देखिला...लवकर स्पर्शप्रसाद लाभो मजला...सर्वस्व रे अर्पिता मी तुजला...दिशाहीन भरकटलेल्या सकळांना...सन्मार्गावरी चालवी तूच गजानना...तव दिव्य शुंदप्रहरे श्रीगजवंदना...क्षणात दूर करी अवघी विघ्ने नाना.
    • गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि । गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
    • तुझ्या आयुष्यातला आनंद गणरायाच्या कानाइतका विशाल असावा
      अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या...आयुष्य तुमचं गणरायाच्या सोंडेइतकं लांब असावं आणि आयुष्यातील क्षण मोदकसारखे गोड असावे...गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 
    • सांगायची गरज नाही, बाप्पाचं आगमनचं भक्तासाठी सर्वकाही आहे
      त्याच्यासमोर भक्ताचं वंदन करणं हेच बाप्पासाठी खूप आहे. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
    • एकदंतम् महाकायम् लंबोदर गजाननम् 
      विघ्ननाशंकरं देवं हेरंबम् प्रणमाम्यहम्..गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 
    मनोरंजनाविषयी अधिक वाचा
    Load More Entertainment Stories