अॅल्युमिनिअमच्या भांड्यात जेवण करताय, मग एकदा वाचाच

अॅल्युमिनिअमच्या भांड्यात जेवण करताय, मग एकदा वाचाच

पूर्वी जेवणासाठी अॅल्युमिनिअमच्या भांड्याचा सर्रास वापर केला जायचा. पण आता या भांड्यात जेवण करणे आरोग्यासाठी हानिकारक असे म्हटले जाते. तुम्हीही हे ऐकून अॅल्युमिनियमची भांडी वापरणे सोडून दिले असेल तर आज आम्ही तुम्हाला अॅल्युमिअमबाबत काही फॅक्टस सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहीत असणे गरजेच्या आहेत.त्याच्यानंतर तुम्हाला अॅल्युमिनिअमचा वापर करायचा की नाही हे ठरवायचे आहे. मग करायची का सुरुवात???

म्हणून केली जाते अॅल्युमिनिअमच्या भांड्याची निवड

shutterstock

अॅल्युमिनिअम आरोग्यासाठी हानिकारक असे अभ्यासातून सिद्ध झाल्यानंतर अनेकांनी आपल्या किचनमधून अॅल्युमिनिअमची भांडी काढून टाकली. पण आजही अनेकांच्या घरात अॅल्यमुमिनिअमची भांडी असतात. अॅल्युमिनिअमचा वापर जास्त करण्यामागेही काही कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे इतर कोणत्याही धातूच्या तुलनेत ते स्वस्त असते. इतकेच नाही तर टिकाऊ आणि उष्णता लवकर शोषून घेत असल्यामुळे गॅसही वाया जात नाही. म्हणून याचा वापर केला जातो.

अॅल्युमिनिअम आहे का आरोग्यास घातक

shutterstock

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार अॅल्युमिनिअममध्ये असलेल्या शिशाचे प्रमाण आरोग्यास हानिकारक असते. त्याचा तातडीने कोणताही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर जाणनत नाही. तर हा फरक कालांतराने जाणवू लागतो. म्हणूनच याला ‘slow poison’ असे म्हटले जाते.अॅल्युमिनिअमसंदर्भात आणखी काही गोष्टी सांगायच्या म्हणजे अॅल्युमिनिअममध्ये सतत जेवण गरम करत राहिल्यामुळे त्यातील पोषण मूल्ये कमी होतात.

अॅल्युमिनिअममुळे होऊ शकतो हा त्रास

आता आपल्याला हे कळलं की, अॅल्युमिनिअममधील काही घटक अन्नातील पोषण मूल्ये कमी करतात. पण या शिवाय यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. अॅल्युमिनिअमधील अन्नाच्या सेवनामुळे हाडं कमजोर होतात. याशिवाय अस्थमा, मधुमेह, क्षयरोग आणि यकृताचे आजार बळावण्याची शक्यता असते.

मायक्रोव्हेवमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट रेसिपी

असा करा अॅल्युमिनिअमच्या भांड्याचा वापर

आता अनेकांच्या घरात अॅल्युमिनिअमची भांडी असतील. कोणी वापरु नाही म्हटल्यावर तुम्ही ती वापरायची बंद करता. पण ती टाकून देण्याची अजिबात इच्छा होत नाही. जर तुमच्याकडेही बरीत अल्युमिनिअमची भांडी असतील तर तुम्ही त्या भांड्यांमध्ये जेवण शिजवू शकता.  जेवण शिजवल्यानंतर ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही .  

या भांड्याचा बिनधास्त करा वापर

shutterstock

आता तुम्हाला कळलं असेल की, अॅल्यमुनिअमच्या भांडयांचा जेवणातील वापर आरोग्यासाठी चांगला नाही. जर तुम्ही घरात नवीन भांडी घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही मातीची भांडी घेतल्यास उत्तम.. कारण मातीच्या भांड्यातून चांगली पोषकतत्वे तुमच्या अन्नात जातात. पण शहरांच्या ठिकाणी याचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही स्टेनलेस स्टील, लोखंड किंवा पितळेच्या भांड्याचा अगदी बिनधास्त वापर करु शकता. लोखंडाची भांडी वापरायला जड असतात. पण त्यातून मिळणारे लोह हे आरोग्यास चांगले असते. म्हणून आजही भाकऱ्या या लोखंडाच्या तव्यावर केल्या जातात.आताच्या घडीला स्टीलची भांडी जास्ती चालतात कारण ती हलकी आणि दिसायला छान असतात. त्यामुळे स्टेनलेस स्टीलची भांडी जास्त मिळतात. मातीची सरकुलही आता अनेक ठिकाणी मिळतात. 

मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदेच फायदे

आता जर तुमच्याकडे अॅल्युमिनिअमची जुनी भांडी असतील तर त्यात अन्न शिजवल्यानंतर दुसरीकडे काढून ठेवायला विसरु नका. शक्य असल्यास या भांड्याचा वापर टाळा. नवीन भांडी घेताना अॅल्युमिनिअमच्या भांड्याना नाही म्हणा.

रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर करुन पाहा या रेसिपी