तुमचीही 'फॅशन'आहे जरा हटके… मग तुमच्यासाठी खास (Fashion Quotes In Marathi)

तुमचीही 'फॅशन'आहे जरा हटके… मग तुमच्यासाठी खास (Fashion Quotes In Marathi)

आपली बाबा फॅशनच एकदम हटके असते.. तुम्ही पण असेच असाल म्हणजे लोक काय म्हणतील या पेक्षा तुम्हाला काय वाटतं याचा विचार तुम्हाला करायला आवडत असेल. आजचा हा विषय खास तुमच्यासाठी आहे बरं का? अहो का काय? तुम्ही करत असलेली फॅशन आणि तो करण्याचा आत्मविश्वास दिसला पाहिजे नाही का? म्हणूनच आज खास तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत असेच काही हटके fashion quotes. मग करुया सुरुवात?

कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करणारे family quotes

 

Table of Contents

  बोल तो आपली फॅशन एकदमच अलग (Witty Fashion Quotes In Marathi)

  GIPHY

  • आपला अंदाजच एकदम भारी आहे, कारण आपली फॅशनच एकदम न्यारी आहे.
  • लोक त्याच गोष्टींना नाव ठेवतात ज्यांना काही गोष्टी कळत नाही.
  • मी फॅशनसोबत लग्न केले आहे आणि आता तीच माझी परफेक्ट बायको आहे-  फ्रँको मॉस्किनो
  • शॉपिंग हा कधीच  वाया न जाणारा प्लॅन आहे. 
  • इतर कोणत्याही कलेप्रमाणे फॅशन ही देखील एक कला आहे. 
  • कपडे घालायला मी अजिबात लाजत नाही.. कारण त्याचे पैसे मीच दिलेले असतात. 
  • फॅशन हे एखाद्या भुकेप्रमाणे आहे… नेहमी तुमची वेगळी खाण्याची इच्छा ती ताजी ठेवत असते.
  • कपडे निवडणे हे वयाच्या अगदी 5 वर्षांपासून सुरु होते आणि ते मरेपर्यंत तसेच राहते. 
  • हो आहे मला खरेदी करण्याचे व्यसन आणि मला यातून बाहेर पडायचे नाही.
  • माझे एकच प्रेम आहे ते म्हणजे माझे कपाटातील ढिगभर ‘कपडे’
  • आयुष्यात मला काही नको फक्त कधीही इच्छा झाल्यावर शॉपिंग करायला मिळायला पाहिजे.
  • आयुष्य खूप लहान आहे… म्हणून चांगली फॅशन करुन चांगले दिसा.
  • काळा असो वा पांढरा.. कोणत्याही रंगाची फॅशन ही उठूनच दिसते.
  • मी कोणाशीही eyecontact करण्याआधी shoe contact करतो. 
  • तुमची फॅशन युनिक असेल तर लोकांना तुम्ही कोण हे सांगण्याची वेळच येत नाही.
  • इतकं काम करा की, तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी खूप पैसे मिळतील.
  • एक चांगली फॅशन एखाद्या शास्त्रीय संगीतासारखी असते.. अजरामर!
  • हो आहे माझी फॅशन विचित्र पण मला त्याचा अभिमान आहे.
  • अरे माझी फॅशन बघून हसता काय? माझा आत्मविश्वास पाहा.
  • मी दुसऱ्यांची फॅशन नाही माझी फॅशन फॉलो करते.

  शॉर्ट हाइट गर्ल्ससाठी फॅशन टिप्सही वाचा

  महिलांना प्रेरणा देतील असे फॅशन कोट्स (Inspirational Fashion Quotes)

  GIPHY

  • कोण काय म्हणेल याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला हवं ते करा.
  • मी फॅशन माझ्यासाठी करते इतरांच्या कमेंट्ससाठी नाही.
  • माझ्या कपड्यांना नाव ठेवण्याआधी स्वत:कडे एकदा पाहा.
  • फॅशन तुमची इमेज खराब करत नाही तर तुम्हाला आत्मविश्वास देते. 
  • मी आधुनिक युगातील स्त्री आहे आणि मला फॅशन करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
  • माझे पैसे, माझी निवड, माझे शरीर, माझी फॅशन.. आणि मला त्याचा अभिमान आहे.
  • मी कशात चांगली दिसते हे सांगण्याचा अधिकार फक्त मला आहे. अजून कोणालाही नाही.
  • फॅशन माझी नाही इतर कोणाची.. 
  • लोक तुमच्याकडे पाहतात याचा अर्थ असा नाही की, तुम्ही वाईट दिसत आहात.
  • तुम्ही चांगले दिसता म्हणूनच तर लोकं वळून वळून तुमच्याकडे पाहता. 
  • मी फॅशन करते फक्त माझ्यासाठी इतर कोणासाठीही नाही.
  • लोक तुमच्याकडे पाहत असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फॅशन तर करायलाच हवी.
  • तुमचा प्रत्येक दिवस हा एक फॅशन शो आहे…आणि तुमचे संपूर्ण जग हे रनवे 
  • एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.. स्वत:च्या प्रेमात पडायला कधीही विसरु नका.
  • फॅशन ही अशी गोष्ट आहे.. जी इतर कोणत्याही complicated गोष्टींपेक्षा अधिक लवकर सोडवता येते. 
  • मी फॅशन करत नाही… तर मीच एक फॅशन आहे.
  • महिला तेव्हाच sexy दिसतात… जेव्हा त्या comfortable फॅशन करतात. 
  • तुम्हाला काहीही कळत नसले तरी माझी फॅशन मलाच कळते.
  • तुम्ही तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट अगदी बिनधास्त करा. अगदी फॅशनही..
  • नेहमी अशीच फॅशन करा.. जसे तुम्ही famous आहात.

   

  तुमचा प्रवास झक्कास करतील हे travel quotes

  महिलांसाठी खास फॅशन कोट्स (Fashion Quotes For Women)

  GIPHY

  • कपडे कधीच जग बदलू शकत नाही जो पर्यंत तुम्ही ते घालत नाही.
  • मला फॅशन आवडते… आणि यातूनच मी स्वत:ला व्यक्त करते.
  • कपडे घालण्यासाठी लिंग पाहण्याची काहीही गरज नाही. 
  • फॅशन शिवाय तुम्ही म्हणजे कॉफीशिवाय रोजची सकाळ
  • नवीन चपलांचे जोड हे तुमचे आयुष्य बदलू शकतात.. सिंड्रेला याचे उत्तम उदाहरण आहे.
  • जगातल्या सगळ्या ट्रेंडमध्ये मला सगळ्यात जास्त Classy राहायचे आहे.
  • फॅशन ही तुम्ही कपड्याने खरेदी करता.. आणि स्टाईल जी तुम्ही करता.
  • जर फॅशन करणे हे तुम्हाला गुन्हा वाटत असेल तर हा गुन्हा करायला मला कायमच आवडेल.
  • जर तुम्हाला खरेदी करण्याचा आनंद मिळत नसेल तर तुम्हाला दुकान बदलण्याची गरज आहे.
  • महिलांनी दोनच गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक classy दिसा आणि दुसरे म्हणजे  fabulous राहा. 
  • फॅशन ही एक इन्स्टंट भाषा आहे. जी सगळ्यांना पटके समजते. 
  • जर तुम्ही काय घेऊ याचा खूप विचार करत असाल तर  ते लगेच विकत घ्या.
  •  फॅशनही तुम्ही करायलाच हवी.. नाहीतर मग कपड्यांचा काय उपयोग
  • मूड खराब असेल तर शॉपिंग ही सर्वोत्तम आयडिया आहे.
  • मला फ्लॅट गोष्टी आवडत नाही कारण मला उंच दिसण्यात आणि हिल्स घालायला मनापासून आवडते.
  • फॅशनही नेहमीच चांगली वाटते जेव्हा तुम्ही यात असता.
  • जर तुम्हाला कोणी सांगत असेल की, पैसा आनंद देऊ शकत नाही… पण तुम्ही शॉपिंग नक्कीच करु शकता.
  • मला जे आवडतं तेच मी घालते.. कारण माझ्या फॅशनचा पॅटर्नचं वेगळा आहे. 
  • तुमची स्टाईल तुमचा अॅटिट्युट ठरवत असते.
  • बिनधास्त राहा. स्टाईलिश राहा. फॅशन करा…. आणि आयुष्य जगा.

   

  मराठीतील एकापेक्षा एक सरस उखाणे खास तुमच्यासाठी

  मजेशीर फॅशन कोट्स (Funny Fashion Quotes)

  GIPHY

  • मला शॉपिंगला न्या… मी तुमचीच आहे.
  • शॉपिंग करणे हा सगळ्या आजारांवर उत्तम इलाज आहे.
  • काल मी एक स्वप्न पाहिले.. लोक पावसात अडकले होते आणि मी एका कपज्यांच्या दुकानात अडकले होते. 
  • सगळ्यात वाईट स्वप्न म्हणजे ‘सेल संपला’
  • मला माझ्या पैशाची काही investment करायची असेल तर मी आयुष्यभराच्या कपड्यांसाठी करीन.
  • मला सगळ्यात जास्त वाईट तेव्हाच वाटतं जेव्हा मॉलमध्ये गेल्यानंतर मला माझ्या साईजचे कपडे मिळत नाही.
  • फॅशन ही तिच असते जी कोणाला कळत नाही. 
  • रोज उठल्यावर मी एकच गोष्ट कपाट उघडल्यावर म्हणते.. माझ्याकडे तर कपडेच नाहीत यार
  •  कपडे नाही कपडे नाही असे म्हणत माझे महिन्यातील किमान 30 दिवस जातात.
  • माझी फॅशन बघून जर तुम्हाला हसायला येत असेल तर नक्की हसा.. मला काय
  • मी फॅशन माझ्या पैशाने करते… त्यामुळे कमेंट देऊन  माझं डोकं फिरवू नका.
  • नाही येत मला बाकी काही करता… फॅशन तेवढी जमते.
  • मला कितीही ताण आला तरी मी फॅशन करायची कधीच सोडत नाहीआमला याचा अभिमान आहे.
  • आयुष्य कधीच परफेक्ट नसते पण तुमचा ड्रेस तुम्हाला नक्कीच परफेक्ट होऊ शकतो.
  • हे देवा! मला काही द्यायचे असेल तर सेलमध्ये चांगले कपडे मिळण्याचा आशीर्वाद दे
  • माझ्या 100  तक्रारी असतील...पण कपड्यांच्या बाबतीत माझ्या काहीच तक्रारी नाही
  • माझ्या हृदयात जर कशासाठी जास्त प्रेम आहे तर ते माझ्या कपड्यांवर 
  • मला फक्त मी आणि माझी फॅशन आवडते.
  • जर मला कुठे हरवायचेच असेल तर मी कपड्यांच्या दुकानात हरवेन.
  • मी आणि फॅशन याच्यामध्ये मला कोणीही आलेले आवडत नाही.

  शॉर्ट हाइट गर्ल्ससाठी फॅशन टिप्सही वाचा

  तुमच्या इन्स्टाग्रामसाठी खास कॅप्शन (Fashion Captions For Instagram)

  GIPHY

  फॅशनेबल असाल तर तुम्ही इन्स्टाग्राम नक्की वापरत असाल. तुमच्या इन्स्टाग्रामसाठी काही हटके कॅप्शन शोधत असाल तर त्याही तुम्ही ठेऊ शकता.

  • मला कधीच कमी समजू नका… कारण माझी फॅशन बेस्टच असते.
  • नेहमी चमकत राहा… एखाद्या हिऱ्यासारखे 
  • हिरा है सदा के लिए.. त्यामुळे चमकत राहा
  • मला कशाचीच भीती वाटत नाही… नवीन ट्राय करायला मला कधीच भीती वाटत नाही.
  •  मी आणि माझी फॅशन कायमच कुठेही खुश राहू शकतो. 
  • मी निवडलं.. मी घातलं .. कारण मला ते आवडलं.
  • नव्या आऊटफिट आणि कॉफीसोबत सगळे काही शक्य आहे.
  • आयुष्य एक पार्टी आहे… तुम्ही त्यासाठी नेहमी तयार असायला हवे. 
  • तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही आऊडडेटेड कधीच होणार नाही. 
  • फॅशन ही कधीही जुनी होणारी नसते.
  • चांगले कपडे घालणे.. हे चांगलेपणाचे लक्षण असते.
  • मी तारा आहे आकाशातील नाही  तर पृथ्वीतलावरचा
  • कोणतेही हवामान तुमच्या फॅशनला अडथळा ठरु शकत नाही. 
  • मी आहे म्हणून फॅशन आहे. 
  • मला आयुष्यात सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे…. फॅशन आणि मी 
  • आरामदायी फॅशन हाच माझा फॅशनफंडा
  • शांत राहा आणि सुंदर दिसा.. हे कायम लक्षात असू द्या. 
  • आयुष्यात बस miss झाली तरी चालेल पण fashion करुन अजिबात चालणार नाही.
  • बघताय काय like करा.
  • फोटोकडे टकमक पाहण्यापेक्षा like करा. म्हणजे तुमच्या बघण्याला अर्थ प्राप्त होईल.

  उंच मुलींसाठी मॅक्सी ड्रेस देखील वाचा

  मग काय आता फॅशन करा आणि मस्त चमकत राहा. एक कायम लक्षात असू द्या तुम्ही फॅशन तुमच्यासाठी करता इतर कोणासाठीही नाही. त्यामुळे इतरांचा विचार करणं सोडा. मिळालेलं एक आयुष्य मस्त आरामात आणि फॅशनेबल जगा