ADVERTISEMENT
home / Diet
Dates Benefits In Marathi

खजूर खाण्याचे फायदे आहेत अनेक (Dates Benefits In Marathi)

खजूराला ‘वंडरफूड’ असं म्हटलं जातं. कारण खजूरात अनेक पोषक घटक असतात जसं की मिनरल्स, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसीड, लोह आणि कॅल्शिअम… सहाजिकच या पोषक घटकांमुळे खजूर हे एक त्वरीत ऊर्जा देणारं आणि आरोग्यदायी फळ ठरतं. खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. खजूरामध्ये अनेक प्रकार आढळतात. त्यात काळे खजूर खाण्याचे फायदे (Black Dates Benefits in Marathi) भरपूर आहेत. खजूराच्या फळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यामुळे ताजे फळ खजूर म्हणून तर सुकलेले फळ खारीक म्हणून ओळखले जाते. वास्तविक खजूरमध्ये साध्या खजूर, काळी खजूर, पेंड खजूर असेही अनेक उप प्रकारर आढळतात. आयुर्वेदात खजूर खाण्याचे अनेक फयदे सांगितलेले आहेत. त्यामुळे फार पूर्वीपासून निरोगी जीवनशैलीसाठी खजूर खाण्याची पद्धत आहे. भारतात रेताड जमिनीमध्ये खजूराची झाडं सहज उगवतात. मात्र खजूराची झाडे सौदी अरेबिया, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. नियमित दोन खजूर खाण्याची सवय लावल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या खजूर खाण्याचे फायदे (khajur khanyache fayde).

पचनशक्ती सुधारते (Relief From Intestinal Disorders)

खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारी कमी प्रमाणात जाणवतात. बद्धकोष्ठता अथवा अपचनाच्या समस्या असलेल्या लोकांना नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. खजूरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत यासाठी दररोज रात्री दोन खजूर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. 

ADVERTISEMENT

ह्रदयासाठी उत्तम (Lowers Cholesterol)

Lowers Cholesterol

खजूरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. खजूर खाण्याचे फायदे (Dates Benefits in Marathi) जाणून घेताना सर्वात महत्त्वाचा फायदा हा की यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअमदेखील असते. एका संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज 100 ग्रॅम मॅग्नेशिअम असलेले पदार्थ सेवन केले तर त्याला ह्रदयरोग होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला ह्रदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर दररोज दोन खजूर जरूर खा.

रक्तदाब नियंत्रित राहतो (Control Blood Pressure)

खजूरामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो. ज्यांना  उच्च रक्तदाब अथवा कमी रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी खजूर आवर्जून खायला हवेत. कारण या सवयीमुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहील. रक्तदाब नियंत्रित राहण्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. ह्रदयाचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही निरोगी राहाल. यासोबतच जाणून घ्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहार (High Blood Pressure Diet In Marathi)

ADVERTISEMENT

हाडाचे आरोग्य सुधारते (Improves Bone Health)

खजूर खाण्याचा फायदा हा की त्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते. कारण खजूरमध्ये सेलेनियम, मॅगनिज, तांबे, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि हाडे मजबूत आणि लवचिक राहण्यासाठी या सर्व खनिजांची शरीराला गरज असते. खजूर खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी खनिजे मिळतात आणि तुमची हाडे मजबूत राहण्यास मदत होते. 

मेंदूचे कार्य सुरळीत राहते (Boost Brain Health)

Boost Brain Health

ADVERTISEMENT

मेंदूसाठी खजूर खाण्याचे फायदे दिसून येतात. कारण काही संशोधनानुसार जे लोक नियमित खजूर खातात, त्यांची स्मरणशक्ती मजबूत राहते. आजकाल माणसाला सततच्या धावपळीच्या जगात अनेक वेळा ताणतणाव, नैराश्याचा सामना करावा लागतो. मात्र खजूरमध्ये नैसर्गिक अॅंटी ऑक्सिडंट आणि डाएटरी फायबर्स भरपूर असतात. त्यामुळे खजूर खाणाऱ्या लोकांना ताणतणावाला नियंत्रणात ठेवणे उत्तम रित्या जमू शकते. शिवाय अशा लोकांना मेंदूशी निगडित आजार होण्याचा धोका कमी होतो. 

त्वचेचा पोत सुधारतो (Improves Skin)

व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या त्वचेला लवचिकता मिळते. शिवाय या व्हिटॅमिन्समुळे तुमच्या त्वचेचे पोषण होते आणि त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. जर तुमच्या त्वचेच्या काही समस्या असतील तर या व्हिटॅमिन्समुळे त्या कमी होतात. खजूरमध्ये हे दोन्ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. सहाजिकच नियमित खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत पण सर्वात महत्त्वाचा फायदा यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो आणि तुम्ही चिरतरूण दिसता.  

अॅनिमियाचा त्रास कमी होतो (Relief From Anemia)

जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेमुळे अथवा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असेल. तर तुम्हाला या समस्येवर लवकर उपाय करण्याची गरज आहे. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्यसमस्या डोकं वर काढतात. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही दररोज दोन खजूर खाण्याची सवय लावली तर तुमचा अशक्तपणा कमी होतो. यासाठी पेंड खजूर खाण्याचे फायदे नक्कीच जाणून घ्या. अशक्तपणासाठी जाणून घ्या अॅनिमियाची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार (Anemia Symptoms In Marathi)

रातांधळेपणा दूर होतो (Prevent Night Blindness)

डोळे आणि दृष्टीचे विकार दूर ठेवण्यासाठी तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे नक्कीच लाभदायक ठरू शकतात. कारण दररोज खजूर खाण्याने केवळ डोळ्यांचे आरोग्य सुधारते असे नाही तर तुम्हाला रातांधळेपणा, रंगांधळेपणा अशा समस्या निर्माण होत नाहीत. यासाठीच दररोज खजूर खाण्यास सुरूवात करा. कारण सतत ताणतणाव, मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करणे, टीव्ही पाहणे अशा जीवनशैलीचा परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर जाणवू शकतो. यासाठी वेळीच डोळ्यांची काळजी घेणे आणि त्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

डायरियामधून आराम मिळतो (Might Help Treat Chronic Diarrhea)

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अवेळी खाणे अथवा अपथ्यकारक पदार्थ खाणे यामुळे तुमची पचनशक्ती नाजूक झालेली असते. अशा वेळी एखादा चुकीचा पदार्थ पोटात गेला तर ते सहन न झाल्यामुळे डायरिआ अथवा जुलाबाचा त्रास जाणवतो. दूषित पाणी आणि दूषित अन्नपदार्थांमुळे डायरिआ होण्यााची शक्यता वाढते. मात्र जर तुम्ही नियमित खजूर खात असाल तर तुमचे अशा गंभीर डायरिआमध्ये संरक्षण होऊ शकते. कारण खजूरामध्ये भरपूर फायबर्स आणि इलेक्ट्रोलेट असतात. ज्यामुळे डायरिआमध्ये लगेच आराम मिळण्यास मदत होते. 

वजन वाढते (Promote Healthy Weight Gain)

वजन कमी करण्याप्रमाणेच अनेकांना वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कारण काही जणांची शरीरप्रकृती खूपच अशक्त असते. अशक्तपणामुळे आरोग्याच्या कुरबूरी डोकं वर काढतात. अशा लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे ते सारखे आजारी पडतात. मात्र अशा लोकांना खजूर खाण्याचे फायदे नक्कीच जाणवू शकतात.  खजूरामध्ये अनेक पोषकतत्व दडलेले असतात. ज्यामुळे दररोज सकाळी खजूर खाण्याचा अशा लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. किरकोळ प्रकृतीच्या लोकांना खजूर दुधातून खाण्याचा  सल्ला दिला जातो. शिवाय खजूरामुळे त्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

नैसर्गिक प्रसूतीसाठी लाभदायक (May Promote Natural Labor)

गरोदर महिलांसाठी खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत. जर गरोदर महिलांनी नियमित खजूर खाल्ले तर त्यांची प्रसूती नैसर्गिक पद्धतीने होण्याची शक्यता वाढते. सध्या नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होण्याचे  प्रमाण खूपच कमी झाले आहे, ज्यामुळे गरोदरपण आणि प्रसूतीदरम्यानच्या समस्या वाढताना दिसत आहेत. सी सेक्शनमुळे प्रसूती पटकन होत असली तरी या पद्धतीने बाळंतपण झाल्यास नवमाता आणि बाळाला भविष्यात काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासाठीच गरोदरपणात प्रमाणात खजूर खाणे नक्कीच फायद्याचे आहे. 

दात मजबूत होतात (Teeth Become Stronger)

दातांचे आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण दात मजबूत आणि निरोगी असेल तपर तुमचे आरोग्य निरोगी राहू शकते. कारण तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या शरीर प्रकृतीवर परिणाम होत असतो. शिवाय खाल्लेले अन्न पचण्यासाठी ते व्यवस्थित चावून खाणे गरजेचे आहे. मात्र जर दातांचे आरोग्य बिघडले तर तुमच्या पचनशक्तीवर याचा परिणाम होतो. खजूरामध्ये फ्लोरीन नावाचे एक केमिकल असते. ज्याच्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते. खजूरामुळे तुमच्या हिरड्या आणि दात मजबूत होतात. यासाठी दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज दोन खजूर अवश्य खा. थोडक्यात दातांवर खजूर खाण्याचे फायदे नक्कीच दिसू शकतात. 

ADVERTISEMENT

खजूर खाण्याचे दुष्पपरिणाम (Side Effects Of Dates)

खजूर खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेदेखील आहेत.

  • खजूर खाणे आरोग्यासाठी खाणे चांगले असले तरी ते प्रमाणात खावे. 
  • खजूर उष्ण असल्यामुळे दिवसभरात फक्त एक ते दोन खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. 
  • जर तुम्ही जास्त प्रमाणात खजूर खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. 
  • खजूर अती प्रमाणात खाण्यामुळे तुम्हाला पोटात दुखणे, पोटात गॅस होणे, डायरिआ, त्वचेवर रॅशेस येणे अशा समस्या जाणवू शकतात. यासाठीच खजूर चवीला कितीही चांगले लागले तरी बेतानेच खा. 
  • नियमित एक ते दोन खजूर खाण्याचा यासाठी सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त खजूर खाणे नेहमी टाळावे. 

खजूर खाण्याबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s

1. दररोज खजूर खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का ?

नक्कीच तुम्ही दररोज खजूर खाऊ शकता. मात्र खजूर खाताना ते प्रमाणात खावे. एक ते दोन खजूरापेक्षा जास्त खजूर खाल्लास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. मात्र वजन वाढवण्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नियमित एक ते दोन खजूर खाऊ शकता.

2. खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती ?

खजूर खाण्याचे फायदे अनेक आहेत जर खजूर तुमचे शरीर योग्य प्रकारे पचवू शकत असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही खजूर खाऊ शकता. सकाळी नाश्ता करताना, दुपारी अथवा संध्याकाळी मधल्या वेळेत भूक भागवण्यासाठी, त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही कधीही एक ते दोन खजूर खाऊ शकता.

3. उपाशी पोटी खजूर खाणे योग्य आहे का ?

खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटि ऑक्सिडंट आणि टॅनिन असते. त्यामुळे तुम्ही उपाशीपोटी खजूर खाल्यास तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळू शकते. जंत असलेल्या लोकांना उपाशीपोटी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे पोटातील जंत नष्ट होतात.

08 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT