ADVERTISEMENT
home / Recipes
या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी (Mouth Watering Sprout Recipes)

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी (Mouth Watering Sprout Recipes)

पावसाळ्यात नेहमीच काहीतरी वेगळे खावेसे वाटते. चटकदार चटपटीत पदार्थ खाण्याचा मोह या काळात आवरता येत नाही. पण बाहेरचे काही खाऊ नका असे वारंवार सांगितले जाते. मग काय बाहेर कितीही काहीही खावेसे वाटले तरी खाता येत नाही. पण तुम्ही असे काही पदार्थ घरीच केले तर म्हणजे असे पदार्थ जे चटपटीत पण आहेत आणि पौष्टिकसुद्धा.. मग यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही कडान्यांच्या या चटकदार रेसिपी करुन पाहायलाच पाहिजे.

कोमट पाणी पिण्याचे फायदे देखील वाचा

चना चटपटीत (Chana Chatpata)

shutterstock

ADVERTISEMENT

साहित्य: उकडलेले काबुली किंवा हिरवे चणे, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर 

कृती:  तुमच्या आवडीचे कोणतेही कडधान्य या रेसिपीसाठी चालू शकते. पण चण्याची चव या रेसिपीसाठी औरच असते. तुम्ही या रेसिपीसाठी लहान काबुली चणे, हिरवे चणे, रेग्युलर चणे घेऊ शकता. तुम्हाला मस्त चणे उकडून घ्यायचे आहे. एका भांड्यात उकडलेले चणे घेऊन त्यात चाट मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालून चणे चांगले एकत्र करुन घ्या. त्यात मस्त बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. त्यावर मस्त लिंबू पिळून खा चना चटपटीत

पावसाळ्यात नक्की ट्राय करा या पौष्टिक भजी

स्प्राऊट भेळ (Sprout Bhel)

ADVERTISEMENT

Instagram

साहित्य: भिजत घातलेले कोणतेही कडधान्य, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आंबट-गोड चटणी, शेव

कृती:  भिजत घातलेले कडधान्य वाफवून घ्या. कडधान्यातील पाणी तुम्हाला आवडत नसेल तर कडधान्य तव्यावर हलकेच परता.  एका बाऊलमध्ये काढून त्यात कांदा,टोमॅटो आणि उकडलेला बटाटा घाला. चवीनुसार चटण्या घालून वरुन शेव आणि कोथिंबीर घ्या. 

याला थोडा आणखी ट्विस्ट द्यायचा असेल तर तुम्ही यात रगडापुरीवर ज्याप्रमाणे पाणीपुरीचे तिखट पाणी घातले जाते अगदी त्याच पद्धतीने तुम्ही यात अधिक चवीसाठी घरी बनवलेले पाणीपुरीचे तिखट पाणी घालू शकता.

ADVERTISEMENT

स्प्राउट्सचे फायदे देखील वाचा

स्प्राऊट सॅलेड (Sprout Salad)

Instagram

साहित्य: कोणतेही भिजत घातलेले कडधान्य, मेयॉनीज, चिली सॉस, मीठ, लाल तिखट, कांदा, काकडी, टोमॅटो,लेट्युसची पाने

ADVERTISEMENT

कृती: एका भांड्यात भिजवलेले कडधान्य एकत्र करुन त्यात कांदा. काकडी, टोमॅटोचे  बारीक तुकडे घाला. ज्यावेळी तुम्ही हे सॅलेड सर्व्ह कराल त्यावेळी त्यात तुम्हाला आवडेल त्या प्रकारातील मेयॉनीज, चिली सॉस, थोडे मीठ आणि बारीक चिरलेली लेट्युसची पाने घाला. तुमचे रशियन स्टाईल स्प्राऊल सॅलेड तयार

 

मिक्सस्प्राऊट पराठा (Mix Sprout Paratha)

Instagram

ADVERTISEMENT

साहित्य: कडधान्य, आलं- लसूण पेस्ट, मीठ , तिखट, मऊसूत मळलेली कणीक, कोथिंबीर, टोमॅटो केचअप

कृती: सगळ्यात आधी तुम्हाला कडधान्य छान उकडून स्मॅश करुन घ्यायचे आहे.त्यात चवी नुसार आलं- लसूण पेस्ट, हळद, तिखट घालायचे आहे. कणकेत याचे कडधान्याचे सारण भरुन त्याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत तुमचे मिक्सस्प्राऊट पराठा तयार

या पावसाळी रानभाज्यांची चव तुम्ही चाखली आहे का?

मिश्रकडधान्यांचे धिरडे (Mix Sprout Chilla)

ADVERTISEMENT

shutterstock

साहित्य: भिजत घातलेली कडधान्ये, आलं- लसूण-मिरची पेस्ट, मीठ, बेसन, तांदुळाचे पीठ,हळद, तेल, टोमॅटो केचअप

कृती: भिजत घातलेली कडधान्ये मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार सारणात आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद घालून एकजीव करा. त्यात आवश्यकतेनुसार बेसन आणि तांदुळाचे पीठ घाला. तुम्हाला धिरडी टाकता येतील इतके पाणी त्यामध्ये घालायचे आहे. तयार सारणाची लहान लहान धिरडी तव्यावर काढून घ्या. गरम गरम मिश्रकडधान्यांची धिरडी टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा 

पावसाळ्यात मस्त कामावरुन घरी आल्यानंतर काहीतरी वेगळे खावेसे वाटत असेल तर या रेसिपी नक्की करुन पाहा. कडधान्यांपासून तुम्हाला कोणती रेसिपी बनवता येते ते आम्हाला नक्की कळवा.

ADVERTISEMENT

असा करा तुमचा पावसाळा एन्जॉय

04 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT