ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
आषाढी एकादशीच्या उपवासाला खा  हे ‘आरोग्यदायी पदार्थ’

आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे ‘आरोग्यदायी पदार्थ’

पंढरपूरमधील पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे मराराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे. कारण  या दिवशी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. पंढरपूरच्या वारीत भजन, कीर्तन करत सहभागी होतात.या वारीच्या प्रवासात वारकऱ्यांना लहान – भुकेचाही विसर पडतो असं म्हणतात. कारण वारीत सहभागी होणं आणि हा आनंद लुटणं हा एक अद्भूत अनुभव असतो. सर्वजण एकमेंकाना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतात. 

आषाढी एकादशीला बरेचजण उपवास करतात. वास्तविक उपवास हा एक दिवस लंघन म्हणजेच पोटाला आराम देण्यासाठी असतो. मात्र बऱ्याचजणांसाठी एकादशीचा हा उपवास म्हणजे निरनिराळ्या उपवासाच्या पदार्थांची चंगळच असते. उपवासाच्या पदार्थांमधील अपथ्यकारक पदार्थ खाण्यामुळे अॅसिडिटी आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी यंदा एकादशीचा उपवास करणार असाल तर हे पदार्थ जरूर खा. उपवासाला कंदमूळं, राजगिरा असे पौष्टिक पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. शिवाय हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगले देखील आहेत.

shutterstock

ADVERTISEMENT

आषाढी एकादशीला उपवासाच्या पदार्थांमध्ये या गोष्टींचा करा समावेश

राजगिरा –

राजगिरा हा एकादशीच्या उपवासाला खाण्यासाठी अगदी उत्तम पदार्थ आहे. कारण राजगिरा पचायला अगदी हलका पदार्थ आहे. ज्यामुळे उपाशीपोटी राजगिराचा लाडू, चिक्की खाण्याने तुम्हाला पचनाचा  त्रास होत नाही. शिवाय राजगिऱ्यामध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात इन्स्टंट एनर्जी निर्माण होऊ शकते. आषाढी एकादशी पावसाळ्यात येते. पावसाळ्यात शरीरातील वात, पित्त आणि कफ प्रकृत्तीचे असंतुलन होत असते. उपाशी राहिल्याने शरीरातील पित्त प्रकृती वाढत असते. मात्र राजगिरा खाण्यामुळे तुमचे पित्त वाढत नाही. नोकरी निमित्त उपवासाच्या दिवशी बाहेर जाताना तुम्ही राजगिऱ्याचा एखादा पदार्थ जवळ ठेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला फार वेळ उपाशी राहवं लागणार नाही.

वाचा – उपवासाचे प्रकार

instagram

ADVERTISEMENT

कंदमूळ –

उपवासाच्या दिवशी कंदमूळ खाणं नेहमीच चांगलं आहे. कारण कंदमूळं ही जमिनीच्या खाली उगवलेली असतात. ज्यामुळे त्यांच्यामध्ये जमिनीतील पोषकतत्व असतात. उपवासाच्या दिवशी तुम्ही रताळी, बटाटा, शिंगाडा  असे पदार्थ खाऊ शकता. ज्यामुळे तुमचे दिवसभर योग्य पोषण होऊ शकते. कंदमूळांमध्ये भरपूर पोषकतत्व आणि फायबर्स असतात. कंदमूळ खाण्याने तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते शिवाय अपचनाचा त्रासही होत नाही. कंदमूळ उकडून अथवा त्यापासून विविध पदार्थ तयार करून तुम्ही खाऊ शकता. मात्र अती तेलकट, तिखट पदार्थ तयार करण्यापेक्षा कंदमूळं उकडून खाणंच नेहमी चांगलं आहे.

अळीव –

अळीव हा पदार्थ लोह, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, भरपूर प्रमाणात असतात. शिवाय पावसाळ्यामध्ये वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशावेळी उपवास केल्यास तुम्ही एखादा असा पदार्थ खाणं गरजेचं असतं ज्यामध्ये भरपूर अॅंटिऑक्सिडंट असतील. अळीवामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. शिवाय अळीवामध्ये फायबर्सदेखील असल्यामुळे तुमचे पोट लवकर भरते. त्यामुळे ज्यांना शारीरिक कष्टाची कामे करायची आहेत त्यांनी उपवासाच्या  दिवशी अळीवाचे पदार्थ जरूर खावे. 

वरीचे तांदूळ –

वरीच्या तांदळाचा भात, उपमा अथवा भाकरी एकादशीला हमखास केली जाते. वरीच्या तांदळामध्येदेखील चांगले पोषक घटक असतात. शिवाय यात फायबर्सदेखील भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास नक्कीच होणार नाही.

फळं –

फळांच्या गरामध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते. आषाढी एकादशीला फळांचा रस पिण्याऐवजी फळे चावून खा. सफरचंद. डाळिंब, पिअरमधील पोषक घटकांसोबत तुमच्या शरीरात पुरेसे फायबर्सदेखील जातील. शिवाय फळं खाण्यामुळे तुमच्या शरीराला पटकन शक्ती मिळते. जर उपवासाच्या दरम्यान तुम्हाला थकवा अथवा अशक्तपणा जाणवत असेल. तर लगेच एखादे फळ खा ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. मात्र पावसाळ्यात फळे खाताना ती स्वच्छ धुवून अथवा निर्जंतूक करून मगच खा.

ADVERTISEMENT

वाचा – साबुदाण्याचे पोषक तत्व

पाणी अथवा द्रवपदार्थ –

पावसाळ्यात बाहेरील आर्द्रतेमुळे तुम्हाला वारंवार तहान लागत नाही. मात्र उपवासाच्या दिवशी पाणी अथवा  द्रवपदार्थ कमी प्रमाणात घेतल्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. आपल्या शरीराला सर्व शारीरिक क्रिया व्यवस्थित करण्यासाठी मुबलक पाण्याची आणि द्रवपदार्थांची  गरज असते. यासाठी उपवास करणार असाल तर सतत पाणी, रस, पेज, दूध असे द्रवपदार्थ जरूर प्या.

 

सुकामेवा –

उपवासाच्या दिवशी सुकामेवा खाणं देखील फायदेशीर ठरेल. काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, खारीक, अक्रोड अशा सुकामेवा आषाढी एकादशीला तुम्ही  नक्कीच खाऊ शकता. कारण सुकामेव्यात भरपूर प्रमाणात पोषकतत्वं असतात. ज्यामुळे दिवसभरात तुम्हाला फ्रेश वाटू शकेल.

ADVERTISEMENT

अधिक वाचा

महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

केस आणि त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित प्या ‘गाजराचा रस’

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

10 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT