नख फाईल करुन त्यांना नेलपेंट लावायला अनेकांना आवडते. पण नेलपेंट लावण्यासाठी तुमची नखंही चांगली हवीत नाही का? पायांच्या नखांबाबत सांगायचे झाले तर अनेकांना अर्धवट वाढलेल्या आणि तुटलेल्या नखांचा त्रास असतो.याला इंग्रजीमध्ये ingrow toenail असे म्हणतात. अशी नख दिसायला चांगली दिसत नाहीत. शिवाय या नखांमुळे इतर काही त्रास होण्याचीही शक्यता असते.आज आपण अर्धवट वाटलेल्या आणि तुटलेल्या नखांविषयी सगळे काही जाणून घेणार आहोत. असे होण्यामागील कारणं, त्यामागील कारणं आणि घरगुती उपाय याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत.
तुम्ही तुमच्या पायांची नखं कधी नीट निरखून पाहिली आहेत का? तर नीट पाहा. जर तुमची नखं सरळं आणि व्यवस्थित असतील तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. पण जर तुमची नखं तुटलेली, अर्धवट वाढलेली असतील किंवा तुमची नखं मध्ये दुभंगलेली असतील तर त्याला ingrown toenail असे म्हटले जाते. अनेकदा पायातील अंगठ्याची नखं ही अशी असतात. यामुळे तुम्हाला आणखी काही त्रास होऊ शकता. अनेक जण याला ‘नखाला कोर’ झाली असे देखील म्हणतात. वयोवृद्धांच्या पायांची नखं ही अनेकदा अशी झालेली असतात. काहींना हा त्रास आधीही होतो.
Ingrown toenail होण्यामागेही काही कारणे आहेत. ती कारणे तुम्ही आधी जाणून घ्यायला हवी. कारण जर तुम्ही या चुका करत असाल तर तुम्हाला ही कारणं जाणून घ्यायला मदत होईल.
तुमचे नखं तुटण्याचे पहिले कारण आहे ते म्हणजे चुकीच्या चपलांची निवड. जर तुमचे फुटवेअर फार घट्ट असतील तर त्यामध्ये तुमची नखं तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुमची नखं तुटण्यामागचे पहिले आणि महत्वाचे कारण आहे ते म्हणजे चुकीच्या चपला.
उदा. काही जणांना त्यांच्या पायांची नखं वाढवायला फारचं आवडतात. अशावेळी जर तुम्ही घट्ट बूट किंवा पायांची नखं कव्हर करणारे फुटवेअर घातले तर तुमच्या नखांवर ताण पडतो. जर नखांना इजा झाली तर नखं तुटू शकते. आता पुन्हा नखं येताना नख दुंभगलेली किंवा तुटलेली येऊ शकतात.
पायांची स्वच्छता हे देखील या मागचे कारण असते. पायांची स्वच्छता केली नाही. तर तुमच्या नखांच्या कडांमध्ये घाण राहण्याची शक्यता असते ही घाण योग्यवेळी काढली गेली नाही. तर मग तुमच्या नखांच्या कडांमध्ये ही घाण राहून तुमच्या नखांचे कोपरे दुखू लागतात. त्याचे पुढेही काही भयावह परिणाम होतात. नखांना दुखापत होण्यामागे अनेकदा ही पायांची स्वच्छताही कारणीभूत असते. त्यामुळेही तुम्हाला ingrown toe nail नखांचा त्रास होऊ शकतो.
उदा. पावसातून बाहेर आल्यानंतर तुम्ही तुमचे पाय स्वच्छ धुवायला हवे. पाय नुसते पाण्याने धुण्यापेक्षा तुम्ही पायाला साबण लावून स्वच्छ धुवा
अनेकदा नखं कापतानाही खूप चुका होतात.नखं कापताना नख खूप खोलवर कापली गेली तरी देखील नखांचा नर दुखावण्याची शक्यता असते.अशावेळी तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.
उदा. काही जणांना नखं अगदी आतपर्यंत कापण्याची सवय असते.या सवयीमुळे नखांखालील असलेली त्वचा दुखावली जाते. आणि त्यामुळे ingrow toenail चा त्रास होतो.
अनेकांना नखांना झालेल्या जखमांमुळे देखील तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता असते. नखांना ठेच लागणे, नखं तुटणे असे होते. पण पुन्हा नखं आल्यानंतर त्याची काळजी घेतली नाही तर हा त्रास पुन्हा होऊ शकतो.
उदा. नखांना ठेच लागल्यानंतर किंवा नखांच्या कडांना जखमा झाल्यानंतर नखांची काळजी घेणे गरजेचे असते. जर नखांची योग्य काळजी घेतली नाही तर मग तुमच्या नखांना हा त्रास होऊ शकतो.
सततच्या वातावरणातील बदलामुळेही अनेकांना हा त्रास होऊ शकतो. पाण्यात भिजलेली नखं, कोरडी पडणारी नखं यामुळे नखांना एकप्रकारे बाक येतो. पाहायला गेले तर ही एक प्रकारे नखांची एलर्जीच आहे त्यामुळेही तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.
उदा. जर तुम्हाला तुमची नखं रुतलेली वाटत असतील.त्वचेला फार चिकटलेली वाटत असलीत तर तुम्हालाही हा त्रास असण्याची शक्यता आहे.
जर तुमच्या नखांच्या कडा किंवा नखांच्या आजूबाजूच्या दुखत असेल तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला सतत दुखत नसेल पण ठुसठुसत असेल तर तुम्हाला Ingrown toenail चा त्रास असू शकतो. जर तुम्हाला साधारण 5 किंवा त्या दिवसांपेक्षा जास्त काळासाठी असे होत असेल तर तुम्हाला नखांशी संबधित त्रास असण्याची शक्यता आहे.
Ingrown toenail चा त्रास झाला असेल तर नखांच्या आजूबाजूला सतत सूज चढत राहते. तो भाग लाल दिसू लागतो. त्याला जरासा धक्का लागला तरी देखील तो भाग खूप दुखू लागतो. जर तुमच्या अंगठ्याच्या नखाच्या आजूबाजूला सूज आली असेल तर तुम्हाला हा त्रास झालेला असू शकतो.
जर नखांच्या जखमांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर अंगठ्याच्या नखांच्या बाजूने तुम्हाला रक्तस्राव होऊ लागतो. हा रक्तस्राव वाढू लागला की, तुम्हाला याचा त्रास वाढू शकतो. जर तुम्हाला असे होत असेल तर तुमचा त्रास हा वाढला आहे असे समजावे
जर हा त्रास जास्त वाढला तुम्हाला रक्तस्राव न होता जर तुमच्या पायाच्या अंगठ्याशेजारी पू साचू लागला असेल तर तुम्हाला Ingrown toenail चा त्रास झालेला आहे. जर तुम्ही वरील सगळ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असाल तर मात्र तुम्हाला याचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.
Ingrown toenail त्रास झाल्यानंतर काही जणांच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा कडक होते. ही त्वचा इतकी कडक होते की, त्यामुळेही अंगठा फार दुखू लागतो. पर्यायाने पायही सतत दुखू लागतात.
अनेकांना पायांची नखं कापण्याचा खूप कंटाळा असतो. पण असे करु नका. तुम्ही तुमची नखं नियमित कापायला हवी. पायांची नखं लांब असतील तर तुमच्या नखांना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही तुमची नखं योग्यवेळी कापायला हवीत. जर तुम्हाला नखं वाढवायची असतील तर ती फार वाढवू नका.
जर तुमचे पाय सतत बुटांमध्ये असतील तर तुमच्या पायांना नखांना ऑक्सिजन मिळणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही योग्य बूट आणि सॉक्सची निवड करा. शक्य असल्यास तुम्ही तुमच्या चपल सतत बदलत राहा. म्हणजे तुमच्या पायांनाही वेगवेगळ्या गोष्टींची सवय होईल.
जर तुमचे पाय ओले झाले असतील तर तुम्ही ते कोरडे पुसून घेणे जितके आवश्यक असते. त्याहून कितीतरी तरी पटीने जास्त तुम्हाला तुमच्या नखांची काळजी घ्यायची असते जर तुमची नखं ओलिचिंब असतील. तुमच्या नखांच्या आजूबाजूला पाणी असेल तर पाणी टिपून घ्या आणि नखं कोरडी करुन घ्या.
जर तुमची नखं दुखावली गेली असतील तर तुम्ही अशा नखांची काळजी घेणे फारच गरजेचे असते. जर त्याकडे योग्यवेळी लक्ष दिले नाही तर मात्र तुम्हाला Ingrown toenail चा त्रास अधिक होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर योग्य काळजी घ्या.
काही घरगुती उपायांनी तुम्हाला ingrown toenailची काळजी घेता येऊ शकते. हे उपाय सोपे आहेत. पण तुम्ही त्याचे सातत्य राखणे गरजेचे आहे. जाणून घेऊया काही घरगुती उपाय
जर तुम्हाला याचा त्रास सुरु झाला असेल. औषधं सुरु असतील .पण पायाचे ठसठसणे कमी होत नसेल अशावेळी तुम्ही तुमचा पाय गरम पाण्यात शेकू शकता. Ingrow toe nailमुळे तुमच्या नखांच्या सुजलेल्या कडांना आराम मिळेल. शिवाय जर तुमच्या नखांमध्ये काही घाण अडकली असेल तर ती देखील काढायला मदत मिळेल. त्यामुळे Ingrow toe nail चा त्रास लवकर बरा करण्यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा तुमचा पाय गरम पाण्याच बुडवा. किमान 5 ते 10 मिनिटं तुमचा पाय पाण्यात असू द्या.
कापसाचा बोळा ऑलिव्ह ऑईलमध्ये बुडवून तुमच्या नखांवर फिरवा. ऑलिव्ह ऑईलमुळे तुमच्या नखांना बळकटी मिळते शिवाय जर तुमची त्वचा कडक झाली असेल तर त्याला नरम करण्याचे काम करते. याशिवाय ऑलिव्ह ऑईल तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले व्हिटॅमिन पुरवते.
वर तुम्हाला आम्ही गरम पाण्यात पाय बुडवण्याचा सल्ला दिला. याशिवाय तुम्हाला तुमचा पाय स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही एका भांड्यात फूट स्पाचा शॅम्पू घेऊन त्यात तुमचा पाय बुडवून ठेवा. जर तुम्हाला तुमच्या नखांमध्ये अडकलेली घाण काढणे शक्य असेल तर ती अलगद काढून टाका म्हणजे तुम्हाला Ingrow toenailचा जास्त त्रास होणार नाही. आणि हा त्रास लवकर बरा होईल.
तुम्ही तुमच्या गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगरही टाकू शकता. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमच्या पायाची घाण अगदी सहज निघू शकते. त्यामुळे तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचाही वापर करु शकता.
तुम्हाला कोणतेही अन्य पर्याय वापरायचे नसतील तर तुम्ही जंतूनाशक क्रिमचा वापर करु शकता. त्यामुळेही तुमचा त्रास कमी होऊ शकतो.
तुम्हाला जर या दिवसांमध्ये घराबाहेर पडायचे असेल तर तुम्ही टो ब्रेस लावूनच घराबाहेर पडायला हवे कारण त्याचा उपयोग केल्यामुळे तुमच्या नखांना कोणतीही दुखापत होणार नाही. ऑनलाईन किंवा अनेक मेडिकलमध्ये या गोष्टी सहज उपलब्ध होतात
लिंबाचा आणि कांद्याचा रस लावून देखील तुम्हाला आराम पडू शकतो. तुम्हाला तुमच्या नखांच्या कडांना लिंबाचा रस आणि कांद्याचा रस लावायचा आहे. कापसाच्या बोळाने तुम्ही हा रस तुमच्या पायांना लावू शकता. कांद्याचा रस आणि लिंबाचा रस तुम्हाला आराम देतो.
Ingrown toenail वर घरगुती उपायांमध्ये आलं आणि हळदं देखील लावले जाते. आल ठेचून त्यात तुम्ही हळदपूड घाला. तयार पेस्ट तुमच्या त्रास असलेल्या नखाला लावून त्याला कपड्याने बांधून ठेवा. हळद आणि आलं उष्ण असल्यामुळे नखांमधील फंगस बरी होण्यास मदत होते. तुम्हाला हा प्रयोग नखं बरं होईपर्यंत करु शकता. तुम्ही झोपताना हा उपाय केलात तर फार उत्तम म्हणे आलं आणि हळदीचा अर्क तुमच्या पायांना चांगला लागेल.
नारळाचे तेल अगदी प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या नखांना खोबरेल तेल लावल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. खोबरेल तेल लावल्यानंतर तुम्ही तुमच्या पायांमध्ये सॉक्स घाला आणि मस्त झोपून घ्या
हल्ली सगळ्याच गोष्टीसाठी इसेन्शिअल ऑईलचा उपयोग केला जातो. इतर कोणत्याही तेलाप्रमाणे तुम्हाला Ingrow toe nailचा त्रास झाला असेल तर तो कमी करण्यासाठी इसेनन्शिअल ऑईल मदत करते.
घरगुती उपायांनी Ingrown toenailची काळजी घेतली जाऊ शकते. पण तुम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नसेल तर यावर काही उपचारपद्धतीही आहेत. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार घेऊ शकतात. नखं फार खराब झाले असेल तर डॉक्टर नखं काढून टाकण्याचा सल्ला देतात. या शिवाय औषधांमुळे ही नखांशेजारी झालेली जखम बरी होऊ शकते.
तुमच्या नखांच्या आजूबाजूला जर फारच दुखत असेल. रक्तस्राव होत असेल किंवा पू जमा झाला असेल तर तुम्हाला ingrown toenail चा त्रास झाला असेल असे समजावे.
नखांचा हा त्रास घरच्या घरी बरा होऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. पण नखं बरे होण्यासाठी लागणारा कालावधी हा वेगळा असू शकतो. जर तुम्ही घरगुती उपाय करुन योग्य काळजी घेतली तर ते घरच्या घरी बरे होऊ शकते. पण त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
ingrown toenail वर उपचारपद्धती आहेत. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला ते योग्य उपचारपद्धती सांगू शकतील. त्यांनी सुचवलेल्या औषधांमुळेही तुम्हाला आराम मिळू शकतो.
आता हे बरे होणे प्रत्येकावर अवलंबून असते. जर तुम्ही नखांची योग्य काळजी घेतली तर तुमचा हा त्रास अगदी 5 दिवसात बरा होऊ शकतो. पण जर तुम्ही नखं स्वच्छ ठेवली तर तुमचा हा त्रास लवकर बरा होईल.
तुमचे नखं infected आहे हे तुम्हाला तुमच्या लक्षणांवरुन कळून येईल. जर तुमच्या नखामधून पू येत असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर तुम्हाला हा त्रास जास्त झाला आहे असे समजावे.