1 जुलै 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना नवीन प्रॉपर्टी खरेदीचा योग

1 जुलै 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांना नवीन प्रॉपर्टी खरेदीचा योग

मेष - एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल

अविवाहीत लोकांसाठी अनुकूल काळ आहे. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. एखाद्या संस्थेद्वारा सन्मानित व्हाल. धनप्राप्ती होईल. जोडीदाराच्या सहकार्यामुळे धनलाभ होऊ शकतो.

कुंभ - त्वचेच्या समस्या जाणवतील

आज तुम्हाला कडक उन्हाचा त्रास होऊ शकतो. उन्हामुळे त्वचेच्या समस्या जाणवतील. जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण होतील. धार्मिक कार्यात रस घ्याल. रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे साधन वाढेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते.

मीन - आर्थिक संकट दूर होईल

आर्थिक संकट दूर होऊ शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. बचत करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात फायदा होईल. राजकारणात आव्हानांना सामोरे जाल. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. नातेवाईक भेटतील. वादविवादापासून दूर राहील्यास फायदा होईल.

वृषभ - कामाच्या ठिकाणी समस्या येतील

कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. मनासारखे काम करण्यासाठी थोडी दगदग करावी लागेल. आहाराबाबत सावध रहा. वाहन चालवताना सावध रहा. अचानक बिघडलेले काम पूर्ण कराल वादविवाद करणे टाळा.

मिथुन - नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल

नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात नवीन कामे मिळतील. प्रवास करताना सावध रहा. प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जाण्याचा बेत रद्द होईल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील.

कर्क - व्यावसायिक योजना रद्द होतील

कामाच्या ठिकाणी धुर्त लोकांपासून सावध रहा. कामाचा अधिक ताण आल्यामुळे त्रस्त व्हाल. एखादे काम अचानक रद्द होण्याची शक्यता आहे. काही लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. नव्या घराचे पजेशन मिळू शकते. घरातील वातावरण उत्साहाचे असेल.

सिंह - मन निराश राहील

आज तुमचे मन थोडेसे निराश असण्याची शक्यता आहे. पोटाचा त्रास जाणवू शकतो. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. वादविवादामध्ये तुमचे मत ग्राह्य धरले जाईल. कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्रात समस्या येतील.

कन्या - जोडीदाराशी नाते मजबूत होईल

रोमॅंटिक होण्यासाठी आज उत्तम दिवस आहे. जोडीदाराशी तुमचे नाते चांगले राहील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याची संधी मिळेल. देणी-घेणी करताना सावध रहा.

तूळ - व्यावसायिक विस्तार होण्याचा योग

आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे अधिकारी प्रभावित होतील. व्यावसायिक यात्रा सफळ होतील. गृहिणींनी त्यांच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना लक्ष प्राप्त करण्यात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदाचे असेल.

वृश्चिक - व्यवसायात आर्थिक चणचण जाणवेल

आज तुम्हाला तुमचे घरखरेदीचे स्वप्न पुढे ढकलावे लागेल. व्यावसायिकांना आर्थिक चणचण जाणवू शकते. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी जोडीदारापासून दूर जावे लागल्याने निराश व्हाल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

धनु - आरोग्य चांगले राहील.

नियमित व्यायाम केल्यामुळे आरोग्य सुधारेल. दिवसभर फ्रेश राहाल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या टाळू नका. धुर्त लोकांपासून सावध रहा. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल.रचनात्मक कार्यात मन रमण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल.

मकर - कुटुंबातील ताण वाढेल

आज तुम्हाला घरातील ताणतणावाच्या वातावरणाचा  त्रास होईल. घरातील प्रॉपर्टीच्या वादापासून दूर रहा. डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका. प्रवास करताना त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.