11 जुलै 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या युवांना मिळेल करिअरची नवी संधी

11 जुलै 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या युवांना मिळेल करिअरची नवी संधी

मेष - धनसंपत्तीबाबत खुशखबर मिळेल

आज तुम्हाला पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही आज इतरांची आर्थिक मदत करू शकता. नवीन योजना सफळ होतील. आत्मविश्वास वाढेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. सामाजिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. 

कुंभ - अचानक झालेली भेट नात्यात बदलेल

आज तुम्हाला अचानक भेटलेली व्यक्ती तुमची नातेवाईक होऊ शकते. जवळच्या लोकांची काळजी वाटेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. एखादी योजना वेळेत पूर्ण होईल. जोडीदाराच्या मदतीने  व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न आणि खर्च यांचा बॅलन्स साधा.

मीन- महत्त्वाची कामे करण्याचा कंटाळा करू नका

कामाच्या ठिकाणी एखादे महत्त्वाचे काम करण्याचा कंटाळा करू नका. अधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे. अती आत्मविश्वासाने काम बिघडू शकते. आज तुम्ही एखाद्या जुन्या कोर्टकचेरीच्या मामल्यामुळे व्यस्त राहण्याची शक्यता आहे. तुमच्यामधील दान देण्याची भावना वाढण्याची  शक्यता आहे.

वृषभ - कामाच्या ठिकाणी समस्या येतील

आज एखादे जरूरी काम टाळण्याऐवजी सर्वात आधी करा. कामाच्या ठिकाणी एखादी समस्या निर्माण होऊ शकते. व्यवसायानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संयम आणि धैर्याने काम करा. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

मिथुन - आईला सांधेदुखीचा त्रास होईल

आज तुमच्या आईला हाडांशी संबधीत अथवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. व्यवसायातील समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव कमी जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात मित्रांची भेट होईल. 

कर्क - प्रिय व्यक्ती दिलेलं वचन पूर्ण करतील

बिघडलेली कामे करण्यात घरातील माणसे मदत करतील. आज तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करेल. घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. कामाच्याय ठिकाणी अधिकारी चांगली साथ देतील. 

सिंह - तरूणांना करिअरची चांगली संधी मिळेल

तरूणांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन गोष्टीबाबत उत्सुकता वाढेल. अधिकारी तुमच्या बोलण्याने आणि कामामुळे प्रभावित होतील. सामाजिक संस्थेद्वारा सन्मान मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता.

कन्या - मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता

एखादी मौल्यवान वस्तू आज तुमच्याकडून गहाळ होण्याची शक्यता आहे. घरासाठी विनाकारण खर्च करून तुम्ही बजेट बिघडवणार आहात. कामाच्या  ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागतील. व्यवसायातील व्यवहार करताना सावध रहा. उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. 

तूळ - जुन्या आजारपणातून सुटका मिळेल

आज तुमची एखाद्या दीर्घ आजारपणातून सुटका होईल. ज्यामुळे तुमचं मन आज प्रसन्न  असेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. मत्सरी लोकांसोबत वाद घालत बसू नका. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. राजकारणातील काम वाढण्याची  शक्यता आहे. आज महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा.

वृश्चिक - तरूणांचा क्रोध वाढेल

घरातील बंधनांमुळे तरूण बंडखोर होतील. व्यावसायिक भागिदारी तुटण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध रहा. आत्मविश्वास कमी होईल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल.

धनु - दगदग करताना सावध रहा

आज तुमची सतत दगदग होण्याची शक्यता आहे. सावधपणे काम करा. पडण्याची आणि दुखापत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जुन्या मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण कराल. धार्मिक कार्यात रस वाढेल. 

मकर - उत्पन्नाचे साधन वाढेल

आज तुमच्या उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडून एखादी महागडी वस्तू भेट मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे बरे वाटेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. 

 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती