12 जुलै 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात यश

12 जुलै 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात यश

मेष - करिअरमध्ये चढउतार येतील

आज तुमच्या करिअरमध्ये आलेल्या चढउतारामुळे तुम्ही निराश व्हाल. मेहनत जास्त घेऊनदेखील चांगला लाभ मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीसोबत झालेली भेट फायदेशीर ठरेल. राजकारणातील कामे वाढतील. आईवडीलाचे भावनिक सहकार्य मिळेल.

कुंभ - नवीन काम सुरू करण्याचा बेत आखाल

आज तुम्ही एखादे नवे काम सुरू करण्याचा बेत आखाल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. मुलांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. राजकारणातील ओळखींंमुळे लाभ होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

मीन- भावंडांमधील नातं सुधारेल

आज तुम्ही नात्याला अधिक महत्त्व द्याल. भावंडांमधील नातं अधिक मजबूत होईल. सामाजिक आणि लोकहितकारक कामांमध्ये सहभाग घ्याल. उच्च अधिकाऱ्यांशी झालेली भेट पदोन्नतीसाठी फायदेशीर ठरेल. काळानुसार तुमच्या विचारसरणीत बदल करा. 

वृषभ - व्यवसायात लाभ होण्याची शक्यता

आज तुम्हाला व्यवसायात लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चल अथवा अचल संपत्ती खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. परदेशी प्रवासाचा योग आहे.

मिथुन - कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढेल

आज कामाच्या ठिकाणी अधिकारी तणाव देण्याची शक्यता आहे. मन निराश होईल. व्यवसायात प्रतिस्पर्धी त्रास देण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. देणी घेणी करताना सावध रहा.

कर्क - डोळ्यांच्या समस्या जाणवतील

डोळे दुखी अथवा डोळ्यांच्या समस्या जाणवतील. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. वादविवादात समंजसपणा दाखवल्यास फायदा होईल. व्यवसायात राजकारणाची मदत होईल. रचनात्मक कामात वाढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

सिंह - कौटुंबिक वाद मिटतील

आज तुमच्या घरातील वाद कमी होतील. घरात आनंदाचे आणि मजेचे वातावरण असेल. जोडीदाराची मजबूत साथ मिळेल. सामाजिक सन्मान मिळाल्याने आत्मविश्वास आणि धनसंपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक भागिदारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण होईल. विरोधकांचा त्रास कमी होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल.

कन्या - विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यात रस वाढेल

विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यातील रस वाढण्याची शक्यता आहे. कामातील आवड  आणि नवी विचारशैली यामुळे स्वतःची ओळख निर्माण कराल. नव्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील. धार्मिक स्थळी प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते चांगले राहील.

तूळ - घरातील खर्च वाढेल

आज घरातील खर्च वाढण्याची शक्यता आहे. एखादी महागडी वस्तू खराब झाल्याने अथवा तुटल्यामुळे खर्च वाढेल. दगदग करावी लागेल. कामाच्या ठिकाणी धुर्त लोकांपासून सावध रहा. कुटुंबाकडून आनंदवार्ता समजेल. वाहन चालवताना सावध रहा.

वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होईल

आज तुम्हाला शारीरिक अथवा मानसिक थकवा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहाल. मात्र घरातील जबाबदाऱ्या गंभीरपणे घ्या. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. आर्थिक सुख-समृद्धी मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवास कराल.

धनु - कौटुंबिक समस्या वाढतील

आज तुमच्या कौटुंबिक समस्या वाढण्याची शक्यता आहे. वाद करणे टाळा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत बदल होण्याचा योग आहे. व्यवसायात एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल.

मकर- कौटुंबिक चिंता वाढेल

कौटुंबिक चिंता वाढणार आहे. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे.  एखाद्या वैयक्तिक कामासाठी शिफारस करावी लागेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकामी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यातील रस वाढेल.

राशी आणि राशीफळाविषयी अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम