14 जुलै 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना आज गृहलाभाची शक्यता

14 जुलै 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना आज गृहलाभाची शक्यता

मेष - उत्पन्नाचे साधन वाढेल

आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक लाभाचा आहे. तुमच्या उत्पन्नाची साधनं वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताला मान मिळेल. एखाद्यासोबत झालेली ओळख प्रेमात बदलण्याची शक्यता आहे. जोखिमीची कामे करू नका. वाहन चालवताना सावध रहा. 

कुंभ - गरजेच्यावेळी आपली माणसं मदत करणार नाहीत

आज तुम्हाला गरज असताना जवळच्या व्यक्ती मदत करण्यात नकार देणार आहेत. घरच्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका. व्यवसायातील विरोधकांपासून सावध रहा. समस्या वाढण्याची शक्यता आहे. राजकारणातील कामे वाढतील.

मीन- घरातील एखादी व्यक्ती आजारी पडेल

आज घरातील आजारपण वाढण्याची शक्यता आहे. नोकरी अथवा व्यवसायात मन लागणार नाही. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन न रमल्यामुळे मूड खराब असेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात रस वाढेल. जोडीदाराशी नाते दृढ होईल.

वृषभ - नातेसंबध मजबूत होतील

आज तुमच्या मनातील भावना प्रिय व्यक्तीला सांगण्यासाठी योग्य दिवस आहे. नातेसंबध मजबूत होतील. जुन्या गोष्टी विसरून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी आळस केल्यास समस्या निर्माण होतील. एखादी मोठी समस्या सोडवण्यासाठी जुने मित्र आणि नातेवाईक मदत करतील.

मिथुन - हट्टी स्वभाव तुमच्या पदोन्नतीत बाधक ठरेल

आज कामाच्या ठिकाणी तुमच्या हट्टी आणि आक्रमक स्वभावामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. स्वभावावर नियंत्रण नसल्यास पदोन्नतीची संधी गमवाल. व्यवसायात अती मेहनत घ्यावी लागेल. विरोधक त्रास देतील. विनाकारण खर्च करू नका. जोडीदारासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमवा. 

कर्क - घराचे पझेशन मिळेल

योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे आज तुमचे नुकसान टळणार आहे. घराचे पझेशन मिळण्याची शक्यता आहे. सुख समृद्धीची साधने वाढणार आहेत. सामाजिक सन्मान आणि भेटवस्तू मिळतील. काम करताना मात्र समस्या निर्माण होऊ शकतात. 

सिंह - व्यावसायिक प्रोजेक्ट बंद होण्याची शक्यता

कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद विवाद होऊ शकतात. व्यावसायिक प्रोजेक्ट बंद होण्याची शक्यता आहे. रागात कोणताही निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होऊ शकते. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण कराल.

कन्या - वृद्ध व्यक्तींचे आरोग्य बिघडेल

आज घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मनातील चिंता वाढेल. कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील. विनाकारण वाद करू नका. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. राजकारणात लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ - प्रेमसंबध निर्माण होतील

आज तरूण  प्रेमात पडण्याची शक्यता आहे.  जोडीदाराची व्यवसायात मदत होईल. मुलांच्या यशावर अभिमान वाटेल. कामाच्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्या. पदोन्नती होऊ शकते.

वृश्चिक - व्यवसायात लाभ होण्याची शक्यता

आज व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता. घरगुती कामे वेळेत पूर्ण करा. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्यामुळे समाधान मिळेल. कौटुंबिक जीवन सुखाचे असेल.

धनु - आर्थिक समस्या वाढतील

विनाकारण खर्च आणि दुर्लक्षपणा करू नका. जमाखर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. व्यवसायातील एखादे प्रोजेक्ट हातातून निसटण्याची शक्यता आहे.

मकर- नियमित व्यायामामुळे निरोगी राहाल

नियमित व्यायामाचा परिणाम दिसू लागेल. दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. वेळेवर घेतलेले निर्णय लाभदायक ठरतीलल. सहकाऱ्यांसोबत प्रवास करू नका. देणीघेणी सावधपणे करा.

अधिक वाचा-

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

ळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी