18 जुलै 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या सुखसाधनांमध्ये होणार वाढ

18 जुलै 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या सुखसाधनांमध्ये होणार वाढ

मेष - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज एखाद्याच्या प्रभावाखाली गेल्याने तुम्ही तुमचे नुकसान करून घेऊ शकता. देणी-घेणी करताना सावध रहा. विनाकारण खर्च करताना सावध रहा. तुमचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. एखादा महत्त्वाचा प्रश्न आज सुटण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत असलेल्या प्रेमसंबधांमध्ये संयम राखा. प्रवास करणं टाळावं लागेल. विरोधकांचा त्रास कमी होईल.

कुंभ - कामाच्या ठिकाणी जुने वाद मिटतील

आज तुमचे भाग्य तुमच्या बाजूने आहे. कारण आज तुमची एखाद्या जुन्या अधिकाऱ्याशी भेट होणार आहे. ज्या भेटीमुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत कला आणि संगीताचा आस्वाद घ्याल. कामाच्या ठिकाणी असलेले जुने वाद मिटतील. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा नवा स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे.

मीन- आयात- निर्यातीच्या व्यवसायात यश

आयात निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमात त्रिकोण होण्याची शक्यता आहे.

वृषभ - आरोग्याच्या समस्या जाणवतील

आज तुमच्या आरोग्य समस्या दूर होण्याची शक्यता आहे. दिवसभर ताजे आणि फ्रेश वाटेल. व्यवसायात यश मिळेल. सहकारी त्रास देण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास वेळेत करावा लागेल. यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांची कर्तव्य पूर्ण होतील. 

मिथुन - भावंडांमध्ये भांडण होऊ शकते

आज तुमच्या भावंडासोबत तुमचे भांडण होऊ शकते. इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. कारण यामुळे तुमच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या भावनांसोबत खेळ करण्याची शक्यता आहे. बोलताना सावध रहा. एखाद्या संस्थेकडून मानसन्मान मिळेल.

कर्क - पोट खराब होण्याची शक्यता

आज तुमचे पोट बिघडण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यापारातील व्यवहार फायदेशीर ठरतील. कामात व्यस्त रहाल. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने नातेसंबंध सुधारतील.

सिंह - सुखसाधनांमध्ये वाढ होईल

चलअचल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. भौतिक साधनेदेखील वाढणार आहेत. नवीन व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक मानसन्मान वाढेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात रस वाढेल. परदेशी जाण्याची शक्यता  आहे. 

कन्या - संतान सुख मिळण्याची शक्यता आहे

आज तुमच्या भावंडांच्या मदतीने व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. संतान सुख वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे साहित्यामधील रस वाढण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करण्याचा बेत आखाल. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यात यश मिळेल. वृद्धांच्या आरोग्याची  काळजी घ्या.

तूळ - कामात दुर्लक्षपणा करू नका

दुसऱ्यांची कामं करताना स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते. कामाच्या ठिकाणी मनाविरूद्ध कामे करावी लागू शकतात. व्यवसायात अती मेहनत घ्यावी लागेल. मित्रांच्या मदतीचा फायदा होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

वृश्चिक - वारसाहक्क मिळण्याची शक्यता आहे

कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. सुख साधनांमध्ये वाढ होणार आहे. विवाहयोग्य तरूणांना मनासारखे स्थळ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मन रमेल. व्यवसायातील नवीन ओळखी वाढतील.

धनु - अपचनाची समस्या होऊ शकते

आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास जाणवू शकतो. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. वादविवाद करणे टाळा. वाहन चालवताना सावध रहा. कटू बोलण्याने मित्र नाराज होतील. दुसऱ्यांच्या नादाला लागून स्वतःचे नुकसान करू नका. 

मकर- थकवा आणि आळस जाणवेल

आज तुम्हाला थकवा आणि आळस जाणवू शकतो. नियमित दिनक्रम आणि आहाराबाबत सावध रहा. विनाकारण वाद घालू नका. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल.

 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी