23 जुलै 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना वारसाहक्क मिळण्याची शक्यता

23 जुलै 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना वारसाहक्क मिळण्याची शक्यता

मेष - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

आज तुम्हाला कौटुंबिक संपत्ती  भेट मिळण्याची शक्यता आहे. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणमी पदोन्नती मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत नाते मजबूत होतील.

कुंभ - कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल

आज तुमची कौटुंबिक जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल. मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात यश मिळेल. धनलाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत नातं मजबूत होईल. राजकाराणातील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. 

मीन- कामात दुर्लक्षपणा केल्याने नुकसान होण्याची शक्यता

आज तुमचे कामात लक्ष लागणार नाही. ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी दगदग करावी लागेल. मात्र जास्त फायदा होणार नाही. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाची बातमी मिळेल. जोडीदाराची साथ उत्तम मिळेल.

वृषभ - व्यवसायासाठी दगदग करावी लागेल

कामाच्या ठिकाणी थोडीशी दगदग होण्याची शक्यता आहे. एखादे काम होता होता बिघडण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मनस्थिती कमजोर होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाचे साधन वाढणार आहे.

मिथुन - वडिलांना कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो

वडिलांना कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे आज तुमचं दैनंदिन काम अव्यवस्थित होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा.

कर्क - जोडीदारासोबत असलेला तणाव दूर होईल

कौटुंबिक सहकार्याने व्यवसायात वाढ होण्याची आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढणार आहे. जोडीदारासोबत असलेला  तणाव कमी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवास कराल.

सिंह - मनाप्रमाणे नोकरी मिळेल

आज तरूणांना मनसारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

कन्या - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

आज तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कमी वेळात अधिक पैसा कमविण्याचा प्रयत्न करू नका. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जोखिम घेऊ नका. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास होऊ शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

तूळ - आरोग्य उत्तम राहील

आज तुमचे आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे राहील. रचनात्मक कार्यात रस वाढेल. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. कौटुंबिक संबध चांगले होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - भागिदारीत धोका मिळेल

व्यवसायात तुम्हाला भागिदाराकडून धोका मिळू शकतो. कौटुंबिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. वादविवाद करणे टाळा. तोट्याच्या व्यवहारात पैसे  गुंतवू नका. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाहनातून प्रवास करताना सावध रहा.

धनु - डोकेदुखी जाणवेल

आज तुम्हाला डोकेदुखी अथवा डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी समस्या येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सध्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे टाळा. उत्पन्न आणि खर्चात समतोल साधा.

मकर- रखडलेले पैसे मिळतील

एखादे नवे काम सुरू करण्याची योजना आखाल. रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकतो. विरोधक यशस्वी होतील. कोर्ट कचेरीत फसण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पुन्हा चांगली होऊ शकतात.

 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)