5 जुलै 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांच्या जीवनातील वैवाहिक समस्या होतील दूर

5 जुलै 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांच्या जीवनातील वैवाहिक समस्या होतील दूर

मेष - हेल्थ रिपोर्ट नॉर्मल असेल

आज तुमचे आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसायातील नवीन योजनांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचा परिणाम दिसेल. विद्यार्थ्यांचे  अभ्यासात मन रमेल. राजकारणात सक्रियता वाढेल. विनाकारण इतरांच्या गोष्टीत नाक खूपसू नका. ज्या कामाबद्दल तुम्हाला चिंता वाटत आहे ते लवकरच पूर्ण होईल. 

कुंभ - राजकारणात सक्रियता वाढेल

लोखंड, स्टील फर्निचर अथवा हार्डवेअरच्या व्यवसायातील लोकांना फायदा होईल. राजकारणातील सक्रियता वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धीमत्ता आणि कौशल्य यामुळे लाभ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सुधारेल.

मीन- आर्थिक नुकसान होऊ शकते

आज तुमचे एखादे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादा व्यवहार करताना सावध रहा. विरोधक त्रास देऊ शकतात. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. 

वृषभ- विद्यार्थ्यांना यश मिळेल

आज तुमचे वडीलांसोबत मदभेद होण्याची शक्यता आहे. रागात कोणताही अपशब्द बोलू नका. वातावरण बिघडण्याची  शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. 

मिथुन - आज तुम्हाला आळस जाणवेल

आज दिवसभर तुम्हाला सुस्ती आणि आळस जाणवेल. कोणावरही विश्वास ठेऊ नका. विरोधकांचा हेतू अयशस्वी होईल. कौंटुंबिक सुखसुविधा वाढतील. ज्यामुळे तुमचा  खर्च वाढू शकतो. वाहन चालवताना सावध रहा. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात मित्रांशी भेट होईल. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

कर्क - प्रॉपर्टी खरेदीतून फायदा होईल

प्रॉपर्टीसंबधीत फायद्याची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. मित्रांसोबत नाते सुधारेल. एखादी चल अथवा अचल संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता. 

सिंह - वैवाहिक अडचणी कमी होतील

आज तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत भेट होईल.  तुमच्या वैवाहिक अडचणी कमी होऊ शकतात. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. व्यवसायातील भागिदारी फायदेशीर राहील. विरोधक नमतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कन्या - कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील

कामाच्या ठिकाणी अचानक एखादी समस्या निर्माण होऊ शकते. कामानिमित्त घराबाहेर जावं लागेल. आत्मविश्वासामध्ये कमतरता जाणवेल. कोर्टकचेरीत तुमच्या बाजूने निकाल लागेल. धार्मिक कार्यात मन रमवा.

तूळ - आयात- निर्यातीच्या व्यवसायात लाभ मिळेल

नोकरी अथवा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आयातनिर्यातीचा व्यवसाय लाभदायक ठरेल.घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे.रखडलेली कामे पूर्ण कराल. रचनात्मक कार्यात वाढ होईल. आरोग्य सुधारेल.

वृश्चिक - व्यवसायात समस्या येतील

रोजच्या कटकटीमुळे नोकरी सोडण्याचा विचार कराल. व्यवसायात समस्या येऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधक त्रास देऊ शकतात. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. राजकारणातील काम वाढेल.

धनु - वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या

आज तुमच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडू शकते. खर्च वाढल्याने तणावा वाढू शकतो. धार्मिक कार्यात सहभाग घ्या. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. व्यवसायात चढउतार येतील.

मकर - मतभेद दूर होतील

भावनिक नातेसंबंधांमधील मतभेद दूर होतील. महत्त्वाची कामे आधी करा. ओळखीचा चांगला फायदा होईल. विवादास्पद समस्या सुटतील. बिघडलेली कामे सुधारतील. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. प्रतिष्ठित लोकांसोबत झालेली ओळख फायद्याची ठरेल. 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

या राशीच्या व्यक्ती असतात Romanceसाठी नेहमीच तयार