7 जुलै 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या तरूणांना करिअरची नवीन संधी

7 जुलै 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या तरूणांना करिअरची नवीन संधी

मेष - मेष राशीच्या तरूणांना करिअरची नवीन संधी

तरूणांना करुअरची नवीन संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी कौतुक करतील. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. प्रियकरमुळे आज तुम्ही निराश व्हाल. जोडीदारासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - दातदुखी जाणवेल

आज तुम्हाला दातदुखी जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी समस्या वाढण्याची शक्यता आहे. अधिकारी वर्गासोबत तणाव वाढू शकतो. वाहन चालवताना सावध रहा. आज नवीन घराचे पजेशन मिळू शकते. बिघडलेली कामे सुधारल्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

मीन- विवाहातील अडचणी दूर होतील

आज तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. जोडीदाराच्या सहकार्याने व्यवसायात प्रगती होऊ शकते. घरात मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना वरिष्ठांची मदत मिळेल. विरोधक नमतील. घरातील लोकांसोबत प्रवासाला जाल. 

वृषभ - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

आज तुम्ही घाईघाईत व्यवसायातील एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकता. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मेहनतीपेक्षा उत्पन्न कमी असेल. सासरच्या लोकांकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. राजकारणातील व्यस्तता वाढेल. देणी आणि घेणी सावधपणे करा. 

मिथुन - जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा

आज तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा होईल. घरात मौजमजेचे वातावरण असेल. बिघडलेली कामे सुधारण्यात यश मिळेल. सामाजिक सन्मान आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाची संधी मिळेल. वादविवादांमध्ये तुमचा विजय होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.

कर्क - कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद

आज तुमचे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींचे वाईट वाटून घेऊ नका. विरोधक नमण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. रचनात्मक कार्यात मन रमवा. वाहन चालवताना सावध रहा.

सिंह - मान अथवा पाठीदुखीचा त्रास

आज तुम्हाला अती कामामुळे मान अथवा  पाठदुखीचा त्रास जाणवेल. कर्जातून मुक्तता मिळेल. व्यवसायात चढ-उतार येतील. नोकरीत बदल होण्याचा योग आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 

कन्या - व्यवसायात नवीन काम मिळेल

व्यवसायातील कामे वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पगारवाढ होईल. घरातील सुखसाधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट फायदेशीर ठरेल. परदेशी जाण्याचा योग आहे. भावंडाची साथ चांगली मिळेल.

तूळ - कौटुंबिक तणाव कमी

कौटुंबिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी वाढू शकतात. मित्रांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत मंगल कार्यांत सहभागी व्हाल. व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल.

वृश्चिक - दुर्लक्षपणामुळे संधी गमवाल

आज तुम्ही तुमच्या दुर्लक्षपणामुळे एखादी चांगली संधी गमवाल. कामाच्या  ठिकाणी अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. राजकारणातील आव्हाने वाढतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या नात्यात एकमेकांवर विश्वास ठेवा. वाहन चालवताना सावध रहा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

धनु - रोजगाराची नवी संधी मिळेल

आज तुम्हाला एखादा नवा रोजगार मिळण्याची शक्यता आहे. नवीन संपत्ती खरेदी कराल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक सन्मान आणि धनवृद्धी होईल. विरोधक नमण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन रमवावे.

मकर- विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळणार नाही

आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनूसार यश मिळणार नाही. अधिकारी वर्गाकडून कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. सरकारी कामात उशीर होईल. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. रक्तदाब वाढण्याची  शक्यता आहे.

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

या राशीच्या व्यक्ती असतात Romanceसाठी नेहमीच तयार