8 जुलै 2019 चं राशीफळ, वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांना मिळणार उच्च शिक्षणाची संधी

8 जुलै 2019 चं राशीफळ, वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांना मिळणार उच्च शिक्षणाची संधी

मेष - प्रेमसंबधात यश मिळेल

आज तुमच्या मनातील भावना मोकळ्या करा. तुम्हाला प्रेमात यश मिळू शकतं. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. आर्थिक संकट दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. राजकारणात प्रतिष्ठीत व्यक्तीची भेट होईल. प्रवासाला जाणे तात्पुरते टाळा.

कुंभ - अभ्यासात समस्या येतील

विद्यार्थ्यांना  अभ्यासातील समस्या कमी होतील. व्यवसायात एखादा चुकीचा निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. सध्या प्रॉपर्टी खरेदी करणं थोडं कठीण आहे. बाहेर फिरायला जाण्याचा निर्णय पुढे ढकला. घरात वातावरण आनंदाचे असेल.

मीन- दुखणी वाढण्याची शक्यता आहे

एखादी अनामिक भीती त्रास देईल. आईला शारीरिक त्रास होऊ शकतो. छोट्या मोठ्या आजारपणांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरातील जुने वाद कमी होतील.

वृषभ - उच्च शिक्षणाची संधी मिळेल

आज तुम्हाला संशोधनासंबधीत उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळेल. जोडीदारासोबत नातं मजबूत होऊ शकतं. धार्मिक कार्यात रस वाढेल.

मिथुन - आर्थिक संकट येऊ शकतं

आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. व्यवसायातील पैसे डुबण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. घेतलेला निर्णय योग्य ठरण्याची शक्यता आहे. घरातील लोकांसोबत वाद करू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. इंजिनिअर विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.  

कर्क - दिवसभर फ्रेश वाटेल

आज तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. उत्साह वाढण्याची शक्यता आहे. आहाराबाबत मात्र सावध रहा. सासरच्या मंडळींकडून आनंदवार्ता मिळेल. वाहन चालवताना सावध रहा. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी वाढू शकते. 

सिंह - घरातील तणाव वाढेल

घरातील वादाचा वाईट परिणाम सहन करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे मत समजवण्यासाठी योग्य संधीची वाट रहा. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. व्यवसायात धोका मिळू शकतो. धार्मिक कार्यात रस वाढू शकतो.

कन्या - आईच्या आरोग्याची काळजी घ्या

आईचे  आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. नियमितचे व्यवहार आणि आहाराबाबत काळजी घ्या.कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. जोडीदाराची काळजी घ्या.

तूळ - व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळेल

व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. चल आणि अचल संपत्ती खरेदी करू शकता. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा योग आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. देणी-घेणी करताना सावध रहा.

वृश्चिक - भावंडासोबत असलेले वाद कमी होतील

आज तुमच्या भांवडांमधील कटूपणा कमी होईल. जोडीदाराशी असलेले नाते मजबूत होईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमधील रस वाढेल. सामाजिक गतिविधिया वाढण्याची शक्यता आहे. तणाव दूर झाल्याने आरोग्य लाभेल.

धनु - तरूणांना नोकरीसाठी दगदग करावी लागेल

आज तरूणांना मनाप्रमाणे नोकरीसाठी दगदग करावी लागेल. व्यवसायातील एखादे काम रद्द होईल. आर्थिक स्थिती कमजोर होईल. रचनात्मक कार्यातील रस वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मकर- शेअर बाजारातील लाभ

आज तुम्हाला शेअर बाजारात लाभ होईल. आई-वडिलांकडून भेटवस्तू मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळतील. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध रहा. आज कोणालाही उधारी देऊ नका. पैसे परत मिळणार नाहीत.

 

अधिक वाचा

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव