9 जुलै 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात यश

9 जुलै 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात यश

मेष - जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. तुम्हालादेखील थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती बिघडू शकते. आईकडून आर्थिक आणि भावनिक सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

कुंभ - रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे

रखडलेले पैसे परच मिळतील. घरात सुखसमृद्धीची साधने वाढतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. साहित्य अथवा संगीतातील रूची वाढू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रचनात्मक कार्यात प्रगती होईल.

मीन- बेरोजगार निराश होण्याची शक्यता

आज बेरोजगार लोकांना निराशा पदरात पडू शकते. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. कामाच्या  ठिकाणी घ्या. र्लक्षपणा केल्याने समस्या येतील. जोडीदारशी नातं मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. आहाराबाबत सावध रहा.

वृषभ - व्यवसायात प्रगती

आज तुम्हाला तुमच्या आईवडीलांच्या मदतीमुळे व्यवसायात लाभ होणार आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यांत सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन - तरूणांना नोकरीची संधी मिळेल

आज तरूणांना नोकरीची योग्य संधी मिळेल. स्पर्धा परिक्षांमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. रचनात्मक कार्यात यश मिळण्याची शक्यता. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदारासोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय ठरेल.

कर्क - पैशांची काळजी घ्या

आज तुमच्यासाठी दिवस आव्हानात्मक असेल. तुमचे पाकीट चोरीला जाण्याची शक्यता आहे. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करू नका. कुटुंबात तणाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवहार कौशल्याने तुमची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. 

सिंह - आरोग्य सुधारेल

दीर्घ आजारपणामुळे आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. काहीवेळ चांगला आराम करा. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात नवीन संबंध निर्माण होतील. भविष्यात चांगला फायदा मिळेल. नोकरीत प्रगती होईल विद्यार्थ्यांना खेळात चांगले यश मिळेल.

कन्या - जोडीदारासोबत नात्यात कटूपणा येईल

आज तुमचे जोडीदासासोबत वाद होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या वागणूकीमुळे दुःखी व्हाल. व्यवसायातील नवीन संबंध विचारपूर्वक निर्माण करा. पैशांबाबत एखादा निर्णय घेताना सावध रहा. धार्मिक कार्यात रस वाढेल. आहाराबाबत विशेष काळजी घ्या.

तूळ - लहान मुलांना दुखापत होईल

आज मुलांना पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. मन निराश होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना साहित्य अथवा संगीतामध्ये रस वाढेल. आज एखादे नवीन काम सुरू कराल. येणाऱ्या काळात धनसंपत्ती आणि मानसन्मानात वाढ होईल. व्यवसायात चढउतार येतील.

वृश्चिक - पैसे परत मिळतील

आज तुम्हाला पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल.  दिलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. नवीन लोकांच्या ओळखीमुळे व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून अमुल्य भेटवस्तू मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल.

धनु - जुनी मैत्री नात्यात नवं वळण घेईल

आज तुमची एखाद्या प्रिय व्यक्तीशी भेट होईल. जुनी मैत्री नातेसंबंधांमध्ये बदलेल. कुटुंब आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांना मात देण्यात यश मिळेल. व्यावसायिक भागिदारी लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. 

मकर- व्यवसाय अथवा नोकरीमध्ये समस्या येतील

विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. आज व्यवसाय अथवा नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. आर्थिकबाबतीत निर्णय घेताना सावध रहा. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. वृद्ध व्यक्तीचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

अधिक वाचा

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)