Kitchentips : जाणून घ्या बटाटे उकडण्याची योग्य पद्धत

Kitchentips : जाणून घ्या बटाटे उकडण्याची योग्य पद्धत

बटाट्याची भाजी सगळ्यांकडे आठवड्यातून एकदा तरी नक्कीच बनवली जाते. कधी बटाट्याची सुकी भाजी, कधी रस्सा तर कधी पराठे बटाट्याची गरज आपल्याला भासतेच. बरेचदा बटाटे हे उकडून घ्यावे लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का, बटाटे (Potato) उकडण्याची योग्य पद्धत. ज्यामुळे बटाटे योग्य प्रमाणात उकडले जातील आणि त्यातील पोषक तत्त्वही कायम राहतील. 

कसे उकडावेत बटाटे (How to boil Potatoes)

साधारणतः काहीजणी बटाटे व्यवस्थित उकडले जावेत म्हणून ते कापून मग उकडायला ठेवतात. पण असं करू नये, कारण यामुळे यातील पौष्टिक सत्त्व नष्ट होतात. 

खाज सुटण्यापासून कसे मुक्त करावे ते देखील वाचा

Shutterstock

कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी साधारणतः 11 मिनिटं लागतात. एक मिनिटं तयारीसाठी आणि बाकीची 10 मिनिटं उकडण्यासाठी लागतात. 

बटाटे उकडण्याची ही आहे योग्य पद्धत

Shutterstock

- प्रेशर कुकरमध्ये बटाटे उकडायचे असल्यास मोठ्या कुकरमध्ये एक किलो बटाटे ( न कापता किंवा चिरता ) एक लिटर पाणी आणि 1/4 चमचा मीठ घालावं. नेहमी लक्षात ठेवा की, कुकरमध्ये पाणी नेहमी 75% टक्के असावं. 

- कुकरचं झाकण बंद केल्यावर गॅसची फ्लेम वाढवावी. 

- गॅसची फ्लेम वाढवल्यावर 10 मिनिटांपर्यंत किंवा 4 शिट्ट्या कराव्या. साधारणतः बटाट्यांच्या आकारानुसार त्यांना शिजण्यास कमी-जास्त वेळ लागतो. त्यानंतर गॅस बंद करा आणि कुकरची वाफ जाईपर्यंत थांबा.

*बटाटे व्यवस्थित उकडले आहेत की नाही हे पाहण्यासाठी सुरीचं टोक बटाट्यात खूपसून पाहा. जर बटाटे नीट शिजले नसतील तर पुन्हा एखादी शिट्टी करा. 

* बटाटे उकडताना त्यात थोडंसं मीठ घालायला विसरू नका. यामुळे बटाटे एकदम मऊ किंवा फुटणार नाहीत आणि सालंही पटकन निघतात. 

Instagram

बटाटे उघड्या भांड्यात उकडताना

- जर तुम्ही बटाटे एखाद्या भांड्यात किंवा पातेल्यात उकडायचे असल्यास जास्त वेळ लागतो. 

- उघड्या भांड्यात बटाटे शिजवताना किमान 20 मिनिटांचा कालावधी लागतो. 

- भांड्यात बटाटे शिजवताना तुम्ही त्यावर झाकण ठेऊ शकता. 

मायक्रोवेव्हमध्ये बटाटे उकडताना

- मायक्रोवेव्हमध्ये बटाटे उकडताना आलू स्वच्छ धुवून घ्या. 

- मायक्रोवेव्ह सेफ भांड्याच पाणी आणि बटाटे ठेवा. 

- मायक्रोवेव्ह हाय ठेवून बटाटे किमान 7 मिनिटांपर्यंत उकडा.

- मायक्रोवेव्हमधील टाईमर थांबल्यावरही बटाटे काहीवेळ त्यातच राहू द्या. 

- साधारण 2-3 मिनिटांनंतर बटाटे बाहेर काढा. 

*बटाटे उकडताना तुम्ही त्यात व्हिनेगरही घालू शकता. त्यामुळे बटाट्याची सालं लगेच निघतात.   

 

बटाटे विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

हिरवा रंगाचे बटाटे असतील तर ते कधीच घेऊ नका. हे बटाटे खराब झालेले असतात. यामध्ये सोलनिनचं प्रमाण जास्त असतं. शक्यतो असे बटाटे चुकून तुम्ही घेतलेल्या बटाट्यांमध्ये आल्यास त्याचा वापर शक्यतो हिरवा भाग काढून करा. 

 

 

Instagram

कधी आपण एकाच वेळी जास्त प्रमाणात बटाटे विकत घेतो आणि त्याचा बरेच दिवस वापर केला जातो. पण काही काळाने असे बटाटे सुरकुतात, असे बटाटे आरोग्यासाठी अपायकारक असतात. त्यामुळे असे बटाटे खाणं टाळा. 

मोड आलेले बटाटे वाईटच

Instagram


मोड आलेल्या बटाट्यांचं सेवन हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. भरपूर दिवस बटाटे ठेवल्यामुळे त्यांना मोड आले असल्यास त्या बटाट्यांचं सेवन करू नये. कारण असे बटाटे तुमच्या नर्व्हस सिस्टमसाठी हानीकारक असतात. त्यामुळे पुढच्या वेळी बटाटे विकत घेताना आणि उकडताना वरील काळजी नक्की घ्या. 

हेही वाचा -

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

Kitchen Tips : पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई