ADVERTISEMENT
home / Budget Trips
Flight चे तिकिट्स स्वस्तात book करायचे असतील तर हे आहेत सिक्रेट्स

Flight चे तिकिट्स स्वस्तात book करायचे असतील तर हे आहेत सिक्रेट्स

फिरणं हे तर सगळ्यांनाच आवडत असतं. पण ट्रॅव्हलचा खर्च आणि तिकिट्सच्या किमतींमुळे बऱ्याचदा प्लॅनवर पाणी फिरण्याची शक्यता असते. आजकाल तर जास्त लोक हे फ्लाईटने प्रवास करणं चांगलं समजतात कारण यामध्ये वेळ कमी जातो आणि जिथे जायचं आहे त्याठिकाणी पटकन पोहचता येतं. आपण जेव्हा कुठेही जायचा प्लॅन करतो तेव्हा पहिल्यांदा आपण तपासतो ती विमानाच्या अर्थात फ्लाईटच्या प्रवासात नक्की तिकिट्सची किंमत किती आहे? बऱ्याचदा आपल्या बजेटमध्ये तिकिट्स असतात पण बऱ्याचदा हे तिकिट्स आपल्या बजेट्सच्या बाहेर असतात. त्यामुळे प्लॅन कॅन्सल होऊ नये म्हणून अशा परिस्थितीत आपल्याला कितीही किंमत असली तरीही तिकिट्स बुक करावे लागतात. अथवा सेल लागण्याची वाट पाहावी लागते. जेणेकरून तिकिट्स स्वस्त होतील. पण आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही अगदी सहजरित्या फ्लाईटचं तिकिट बुक करू शकता आणि तेही कोणत्याही सेलची वाट न पाहता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं? तर जाणून घेऊया –

स्वस्तात फ्लाईट तिकिट बुक करण्याच्या ट्रिक्स आणि टिप्स How To Book Cheap Flight Tickets Tips In Marathi

प्रत्येकाला वाटत असतं की, देश आणि विदेशात आपण प्रवास करताना फ्लाईटचा वापर करावा कारण बचतीबरोबरच यामध्ये आरामही मिळतो आणि दगदग होत नाही. काही खास टिप्स फॉलो केल्यास, तुम्ही स्वस्तात आपल्या फ्लाईटचं तिकिट बुक करू शकता –

तिकिट बुकिंगची योग्य वेळ निवडा

तुम्ही जर कोणत्याही सणाच्यावेळी अथवा शासकीय सुट्ट्या असताना प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फ्लाईटच्या तिकिट्सची दुप्पट किंमत मोजावी लागेल. त्यामुळे प्रयत्न करा की, तुम्ही अशी वेळ निवडाल जेणेकरून कोणत्याही प्रकारचा सण अथवा सुट्टी नसेल. शनिवार आणि रविवारऐवजी तुम्ही सोमवार ते शुक्रवार या दिवसांमधील तिकिट्स बुक करा. तसंच इतर वेळेच्या तुलनेत पहाटेचे फ्लाईट तिकिट्स हे स्वस्त असतात.

ADVERTISEMENT

टेक्निकली स्मार्ट व्हा

तुम्ही नेहमी निरीक्षण केलं असेल की, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी फ्लाईटची किंमत पाहता तेव्हाची किंमत आणि दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा किंमत पाहिली तर ती तुम्हाला वाढलेली दिसून येते. असं यासाठी होतं कारण तुमच्या कॉम्प्युटरमधील अथवा फोनमधील कुकीज आणि सर्व्हरचा सर्व तपशील हा तिकिट बुक करणाऱ्या वेबसाईटजवळ पोहचतो. त्यांना यावरून तुम्ही तिकिट्स खरेदी करण्यास उत्सुक आहात हे कळतं आणि मग ते फ्लाईटच्या तिकिटांची किंमत वाढवण्यास सुरुवात करतात. त्यांना चकवा देण्यासाठी तुम्ही इकॉग्निटो विंडो अर्थात प्रायव्हसी मोड अथवा प्रायव्हेट सर्च उघडून तिकिटांची किंमत पाहू शकता. अथवा तिकिट्सची किंमत पाहून झाल्यावर सर्चिंग कुकीज डिलीट करा. त्याशिवाय तुम्ही तिकिट बुक करण्यासाठी दुसरा कॉम्प्युटर अथवा फोनदेखील वापरू शकता. 

सेंटर रो असते स्वस्त

बऱ्याच एअरलाईन्स या तिकिट विकण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना करत असतात. जसं ग्राहकांना एकाच फ्लाईटमध्ये वेगवेगळ्या किंमतीची तिकिट्स दिली जातात. बऱ्याचदा इकॉनॉमी क्लासमध्ये सेंटर रो अर्थात मधल्या लाईन्समध्ये चेक इन बॅगेजची संमती नसते. तसंच यामध्ये खाण्यापिण्याचा समावेशही नसतो. पण ही तिकिट्स स्वस्त मिळतात. तुम्हाला जर स्वस्त तिकिट्स हवी असतील तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. तुम्हाला भूक लागणार असेल तर तुम्ही फ्लाईटमध्ये विकत घेऊ शकता अथवा तुम्ही तुमच्याबरोबर बॅगेत खायलाही नेऊ शकता. 

ऑफर्सचा वापर करा

वेगवेगळ्या एअरलाईन्स हा वेगवेगळ्या डेबिट आणि क्रेडिट कार्डावर कॅशबॅक आणि डिस्काऊंटच्या ऑफर्स देत असतात. तुम्ही या ऑफर्सचा लाभ घेऊन तिकिट्स बुक करू शकता. बऱ्याचदा तर तुम्हाला यावर फ्लॅट 50% अशादेखील ऑफर्स असतात. त्यामुळे तिकिट्स खरेदी करत असताना या ऑफर्सवर लक्ष ठेवा. तुम्हाला हवं तर तुम्ही पेटीएम, फ्रीचार्ज,  गुगल पे यावरही पेमेंट करू शकता. यावर चांगली कॅशबॅकही मिळते. जर तुम्ही अॅपवरून फ्लाईट तिकिट्स बुक करणार असाल तर वॉलेट पेमेंट करा. यानेही तुमचा फायदा होतो. 

ADVERTISEMENT

एकटे प्रवास करणार असाल तर करून घ्या फायदा

तुम्ही एकटे प्रवास करणार असाल आणि तुमच्याजवळ जास्त सामान नसेल तर फ्लाईट बुक करताना तुम्ही हँडबॅग असा पर्याय निवडा. सामान जास्त असेल तर खर्च वाढतो. त्यामुळे कमी सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इन्सेन्टिव्ह देण्यात येतं. ज्याचा तुम्ही वापर करू शकता. 

वेवसाईट्सवर तुलना करा

प्रत्येक एअरलाईन्सचं तिकिट सेमच असेल असं नाही. त्यामुळे तिकिट्स बुक करत असताना तुम्ही पहिले फ्लाईटच्या किंमतींची तुलना करा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट्स तपासा. तुम्हाला हवं तर स्कायस्कॅनर, मोमोन्डो आणि कायाक अशा साईट्सवर तुम्ही किंमत तपासून पाहू शकता. 

हेदेखील वाचा

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे (beaches in maharashtra)

पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं

Valentines Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी

 

ADVERTISEMENT
27 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT