‘Indian Idol’ फेम मराठमोळा राहुल वैद्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

‘Indian Idol’ फेम मराठमोळा राहुल वैद्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

अनेक रियालिटी शो येतात आणि जातात पण काही रियालिटी शो मधील कलाकार हे कायम मनात घर करून जातात. त्यापैकीच एक ‘Indion Idol’ फेम राहुल वैद्य. राहुल वैद्यचा आवाज या रियालिटी शो मधून घराघरात पोचला आणि त्यानंतर राहुलचं करिअरदेखील जोमात सुरु झालं. राहुल सध्या गाण्याचे अनेक शो करत असतो. राहुल वैद्यचं आतापर्यंत अनेक मुलींबरोबरही नाव जोडण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा राहुल वैद्य चर्चेत आला आहे तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलंय. ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ मधील दिशा परमारला राहुल वैद्य डेट करत असल्याचं सध्या समोर आलं आहे. याची चर्चा सुरु झाल्यानंतर आता राहुल आणि दिशाने खुद्द यावर आपलं मत दिलं आहे.

ती माझी बेस्ट फ्रेंड आहे - राहुल वैद्य

https://www.instagram.com/p/B0ORsV_Btec/

आपल्या नात्याबद्दल अगदी प्रामाणिकपणे राहुलने मत व्यक्त केलं आहे. राहुलने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे की, ‘दिशा आणि मला एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडतो. पण आपण अजून प्रेमात आहोत की नाही हे आम्हालाच माहीत नाही.’ राहुल आणि दिशाची भेट एका कॉमन मित्रामार्फत झाली. तसंच या दोघांनी राहुल वैद्यच्या ‘याद तेरी’ या गाण्याच्या अल्बममध्येही एकत्र दिसले होते. राहुलने आपल्या दिशाबद्दलच्या भावना व्यक्त करताना पुढे सांगितलं की, ‘दोन वर्षापूर्वी माझी आणि दिशाची भेट एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली. आम्हाला दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवणं आवडायला लागलं. आम्ही प्रेमात आहोत की नाही याबाबत भाष्य करणं हे आता योग्य नाहीये. पण हे खरं आहे की आम्ही एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. दिशा अतिशय साधी मुलगी आहे. तसंच ती अतिशय नम्र आणि दयाळू आहे. तिचा हा स्वभाव मला खूपच आवडतो.’ तर पुढे राहुलने दिलेल्या मुलाखतीत असंही म्हटलं की, ‘काही दिवसांपूर्वी पुण्याला माझी एक कॉन्सर्ट होती, त्या कॉन्सर्टला मी तिला यायचं आमंत्रण दिलं होतं. आम्ही बेस्ट फ्रेंड असल्यामुळे आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवावा वाटला इतकंच. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे हे अजून तरी मला माहीत नाही’

जवळचे मित्र असल्याचं केलं दिशानेही मान्य

दरम्यान दिशानेही राहुल आणि ती जवळचे मित्र असल्याचं मान्य केलं आहे. पण याव्यक्तिरिक्त अजूनही कोणत्या नात्याबाबत स्पष्टता नाही. दिशा गेले काही वर्ष इंडस्ट्रीमध्ये असून तिचं आतापर्यंत कोणाहीबरोबर नाव जोडलं गेलेलं नाही. शिवाय राहुल आणि दिशा या दोघांचीही जोडी खूप चांगली दिसत असून त्याच्या चाहत्यांनाही त्यांच्यामध्ये मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी असायला हवं असं वाटू लागलं आहे. या दोघांनीही त्याचा विचार करावा अशीही सध्या कुजबूज आहे. मात्र हे दोघेही सध्या एकमेकांना समजून घेत एकत्र वेळ घालवत असल्याचं दोघांनीही मान्य केलं आहे. पण भविष्यात जर या दोघांनीही एकमेकांबद्दल प्रेमाची कबुली दिली तर आश्चर्य वाटायला नको. त्याचीच वाट सध्या त्यांचे चाहते नक्कीच बघत असतील. शिवाय हे दोघं कधी प्रेमाची कबुली देतील याकडेही चाहत्यांचे डोळे लागून राहिले आहेत. सध्या तरी मैत्री स्वीकारली असून लवकर प्रेमही स्वीकारतील असाच लोकांचा कयास आहे.