ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
Kitchen Tips : पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

Kitchen Tips : पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून घ्या ही काळजी

पावसाळ्यात किचनमध्ये सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती मसाल्यांची. आपल्या रोजच्या जेवणात मसाल्यांचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. काही मसाले आपण जेवणात रोज वापरतो तर काही कधी कधीच वापरतो. त्यामुळे पावसाळ्यात मसाले कसे नीट ठेवावे, हा प्रश्न प्रत्येकीसमोर असतोच. मसाले खराब होऊ नये किंवा त्यांना बुरशी लागू नये याची प्रत्येक गृहिणीला काळजी असते. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या या समस्येवरील काही खास टिप्स, ज्यामुळे मसाले राहतील पावसाळ्यातही चांगले.

मिसळणाचा डबा असा ठेवा कोरडा

Shutterstock

आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गृहिणी मिसळणाचा डबा वापरतेच. त्याची काळजी घ्या अशी.. 

ADVERTISEMENT
  • पावसाळ्याच्या दिवसात मिसळणाचा डबा आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करा. म्हणजे डब्यातील मसाल्याला ओल लागणार नाही. 
  • मिसळणाचा डबा कधीही गॅस किंवा मायक्रोव्हेवजवळ ठेवू नका. अशा ठिकाणी हा डबा ठेवल्याने फोडणी देताना किंवा वाफेमुळे डब्याला ओल लागू शकते. 
  • शक्य असल्यास मसाले मिसळणाच्या डब्यात ठेवण्याआधी ते तव्यावर थोडे भाजून घ्या. ते ताजे राहतील.
  • जेवण बनवताना मसाले वापरताना मिसळणाच्या डब्याला ओला हात लागणं किंवा ओला चमच्याचा वापर होणार नाही, याची काळजी घ्या. 
  • जर एखाद्या मसाल्याला जास्त ओल लागलीच तर ते थेट उन्हात न ठेवता एका ताटात काढून कापडाने झाकून ठेवा.

खाज सुटण्यासाठी घरगुती उपचारही वाचा

पावसाळ्यात मसाले चांगले राहण्यासाठी खास टिप्स

Shutterstock

  • पावसाळ्यात मसाले जास्त खराब होतात. यामागील महत्त्वाचं कारण आहे ओल लागणे आणि गोळे होणे. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की, हर्ब्स आणि मसाले सूक्या जागी ठेवा. जर ते ओलसर जागी ठेवले तर त्यांचे गोळे होऊन किड लागण्याची शक्यता असते. 
  • काही वेळा मसाले सुक्या ठिकाणी ठेवण्याच्या प्रयत्नात ते आपण प्रखर प्रकाशाच्या ठिकाणी ठेवतो. कारण आपल्याला वाटतं की, प्रकाशात ठेवल्याने त्याला ओल लागणार नाही. पण लक्षात ठेवा प्रखर प्रकाशही मसाल्यांसाठी फायदेशीर नाही तर उलट नुकसानदायक आहे. त्यामुळे मसाल्याच्या बरण्या थेट सुर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणीही ठेऊ नका. 
  • अनेकजणांकडे मसाल्याची पाकिटं फ्रिजमध्ये ठेवल्याचं आढळतं, पण ते चुकीचं आहे. मसाले फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा सुगंध आणि चव निघून जाते. त्यामुळे मसाले फ्रिजमध्ये ठेवताना शक्यतो एअर-लॉक कंटेनरमध्ये भरून मगच फ्रिजमध्ये ठेवा. 
  • अख्खे किंवा खडे मसाले लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे शक्यतो पावडरऐवजी खडे मसाले स्टोर करून ठेवा. गरजेप्रमाणे ते वाटून ताजेच वापरा. कारण पावडर करून ठेवलेले मसाले लवकर खराब होतात. 
  • मसाले फक्त योग्य ठिकाणी ठेवणंच नाही तर त्यासाठी योग्य प्रकारच्या बरण्या वापरणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. मसाले नेहमी अपारदर्शक बरण्यांमध्ये ठेवावे. ज्यामुळे त्यांच्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही. तसंच या बरण्या एअर-टाईट झाकणाच्या असाव्यात. जर शक्य असल्यास या बरण्या काचेच्या असाव्यात. 
  • लक्षात ठेवा मसाले नेहमी कोरड्या ठिकाणीच ठेवा. ओलसर ठिकाणी ते ठेवल्यास कीड लागू शकते. 
  • तसंच कधीही भरपूर प्रमाणात मसाले खरेदी करून ठेवू नका. त्याऐवजी गरज लागेल तेव्हा मसाले विकत आणा आणि बरणीत ठेवा. ज्यामुळे त्यांचा सुंगध नेहमी ताजा राहील. 

अशा प्रकारे काळजी घेतल्यास तुमच्या किचनमधील मसाले पावसाळ्याच्या दिवसातही चांगले राहतील आणि पदार्थांची चवही अजूनच वाढेल. 

ADVERTISEMENT

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा ओव्हनसाठी (Vinegar & Baking Soda To Clean Oven In Marathi)

हेही वाचा –

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टिप्स

ADVERTISEMENT

Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक

15 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT