ADVERTISEMENT
home / Dating
#MyStory: Dating App च्या युगातली प्रेम कहाणी

#MyStory: Dating App च्या युगातली प्रेम कहाणी

आधी मुलंमुली कॉलेज किंवा ऑफिसेसमध्ये एकमेकांना भेटून जोड्या जुळत असत. पण आजचं युग आणि आजची तरूण पिढी ही जास्त वेगवान आहे. आजच्या डिजीटल युगात प्रत्येक नात्याची व्याख्या बदलत आहे. अशीच एक डिजीटल युगातली म्हणजेच Dating App च्या काळातली #MyStory तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

कोणतंही नातं टिकवणंं सोपं नसतं, खासकरून जर तुम्ही 4 वर्ष लांब रिलेशनशिपमधून बाहेर पडला असाल. त्यामुळे पुन्हा एकदा सीरियस रिलेशनशिपच्या शोधात नव्हते. या नात्यातून बाहेर पडल्यावर मी जवळजवळ एक वर्ष सिंगल होते. त्याचवेळी माझ्या संपादकांनी मला एका डेटींग अॅपबाबत स्टोरी लिहण्यास सांगितलं. मी पण ती स्टोरी करण्यास होकार दिला. तसंही मी माझ्या एक्स विसरायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतच होते. हा एक चांगला बहाणा होता. पण यातून माझ्या हाती काही लागेलच, असं मला अपेक्षित नव्हतं. 

डिजीटल प्रेम कहाणीची सुरूवात

Giphy

ADVERTISEMENT

या सगळ्याला सुरूवात सहजच झाली. त्या अॅपच्या प्रोसेसनुसार मी एका मुलाला उजवीकडे स्वाईप करून निवडलं. मला तो मुलगा खरंच चांगला आणि क्युट वाटला. कदाचित याला अतिशयोक्ती म्हणता येईल पण त्याच्याशी माझं इन्स्टंट कनेक्शन असल्यांच मला जाणवलं. आम्ही रोज एकमेकांशी तासनतास बोलू लागलो. बरेच दिवस झाले तरी त्याने माझा नंबर काही मला विचारला नाही. कदाचित त्यामुळेच तो मला इतरांपेक्षा वेगळा वाटला. त्या अॅपवरील बरेच जण मला घाई करून नंबर मागणारे आणि मग वॉट्सअप चॅट करून डेटसाठी विचारणारे होते. त्यामुळे हा नंबर न मागणार मुलगा मला खरोखरच वेगळा वाटला.

एक आठवड्यानंतरच्या चॅटींगनंतर माझ्या संपादकांनी (ज्यांना माझ्या लव्हस्टोरीत इंटरेस्ट निर्माण झालेला) मला त्याचा नंबर मागण्यास सांगितलं. तो खरोखरंच चांगला निर्णय होता. तो खूपच चांगला आणि क्युट तर होताच पण माझ्यावर काही जबरदस्तीही करत नव्हता. तो माझ्याशी नेहमी एका मित्राप्रमाणेच बोलायचा आणि कधीही जास्त रोमँटिक होत नसे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही एकमेकांना जाणून घेण्यात अजून रस निर्माण झाला होता.

नशिबाचा खेळ

नशिबानेही आम्हाला साथ दिली आणि तो नेमका माझ्या कलिगचा चांगला मित्र असल्याचं कळलं. त्यामुळेच की काय मी त्याला एक आठवड्यानंतर भेटण्यास होकार दिला. काय हरकत होती नाही का, तो काही सीरियल किलर नव्हता. असो…आम्ही कॉफीसाठी शनिवारी संध्याकाळी भेटायचं ठरवलं. मला तो चांगला वाटत असला तरी माझ्या पर्समध्ये मी पेपर स्प्रे घेऊन ठेवला. ज्याबद्दल तो मला आजही चिडवतो. आम्ही त्याच्या आवडत्या कॅफेमध्ये भेटायचं ठरवलं. आश्चर्य म्हणजे ती जागा मलाही लहानपणापासूनच आवडत होती. मुंबईतील एक प्रसिद्ध पण अगदी साधा कॅफे जिथे जास्त वर्दळ नसायची.

ADVERTISEMENT

Giphy

आमची फर्स्ट डेट

ती जागा निवडल्यामुळे मला तो अजूनच आवडू लागला. मला कळलं की, त्याने आमच्याा पहिल्या भेटीबाबत फारच विचारपूर्वक जागा निवडली आहे. म्हणजे तो भविष्यातही किती चांगला वागेल. आम्ही दोघं छान भेटलो आणि बोललो. त्याने मला घरी सोडलं. साधी मिठीही मारली नाही. मला तर अगदी हृदयात वाजे समथिंग…. असं झालं होतं. त्याने माझा आदर केला होता आणि मला कशाच्याच बाबतीत घाई केली नव्हती.

एक वर्षानंतर….

त्या भेटीला आता एक वर्ष उलटून गेलं आहे. तो आजही अगदी पहिल्या भेटीत वागला होता तसाच चांगला आहे. आज आम्ही दोघंही खूष आहोत.  खरंतर आता आम्ही कुठे एकत्र कार्यक्रमांना गेल्यावर आम्ही कसं भेटलो हे सांगणं थोडं अवघड आणि मजेशीर वाटतं की, मी माझ्या बॉयफ्रेंडला डेटींग अॅपवर भेटले. पण काही गोष्टी अशाच घडायच्या असतात. 

*वरील #MyStory जरी खरी असली तरी डेटींग अॅपवर ओळख झालेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याआधी त्याची योग्य माहिती जरूर मिळवा आणि मगच भेटा. कारण प्रत्येक कहाणी वर सांगिलतलेल्या प्रेमकहाणीप्रमाणे घडेलच असं नाही. 

ADVERTISEMENT

हेही वाचा – 

#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….

#MyStory त्याने मला अचानक पाठवली घटस्फोटाची नोटीस

#MyStory: आणि तेवढ्यात त्याची आई आली….

ADVERTISEMENT
14 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT