ADVERTISEMENT
home / Sex and Comedy
#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

सरप्राईज आणि तेही वाढदिवसाच्या दिवशी मिळालं तर प्रत्येकालाच आवडतं. पण तुम्हाला कधी एकाच दिवशी दोन सरप्राईज मिळाली आहेत का? असाच काहीसा किस्सा घडला स्वीटी आणि आदिसोबत. जेव्हा स्वीटीला बॉयफ्रेंड आणि आईबाबा यांनी दिलं एकदम मेमोरेबल सरप्राईज. आजच्या #MyStory मध्ये किस्सा स्वीटीच्या बर्थडेचा. 

मला लहानपणापासूनच uniform घातलेल्या मुलांबद्दल फार आकर्षण होतं. लहानपणी दूरदर्शनवर sea hawk नावाची सीरियलही लागत असे. ज्यामध्ये हँडसम आर माधवन इंडियन कोस्ट गार्डच्या भूमिकेत होता. त्या कोस्ट गार्डच्या role मध्ये तो सुपर सेक्सी दिसत असे आणि तेव्हापासूनच मला युनिफार्म घालणाऱ्या मुलांबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना ही गोष्ट माहीत होती.

पण मला खंत आहे की, मी कधीच कोणत्याही युनिफॉर्मवाल्या मुलाला डेट करू शकले नाही. मी जितक्या वेळा प्रेमात पडले, ती सर्व मुलं non-uniform वाली होती. एका girls school शिकलेल्या, आर्ट्स कॉलेजला गेलेल्या आणि एका अॅड एजेंसीमध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला dashing मिलिट्री युनिफार्ममधला कुठे मिळाला असता. मी ज्यांना डेट केलं त्यापैकी एक होता फोटोग्राफर आणि आम्ही दोघंही एकमेंकाच्या खूप प्रेमात होतो.

 

ADVERTISEMENT

युनिफॉर्मचा किस्सा आणि वाढदिवस

Shutterstock

एक रात्री दारूच्या नशेत मी त्याला माझ्या uniform fantasy बद्दल सांगितलं. ते ऐकून तो वेड्यासारखा हसायला लागला. तो हसतहसतच म्हणाला की, तो आयुष्यात एकदा तरी मला तो अनुभव मिळण्यासाठी प्रयत्न करेल. मला काही तेव्हा कळलं नाही की, तो काय सांगण्याचा प्रयत्न करतोय.

माझ्या 30th birthday ला तो सेलिब्रेट न करण्याचा निर्णय मी घेतला. माझा मूड चांगला नव्हता आणि माझ्या बर्थडेबाबत तर मी अजिबातच excited नव्हते. तो शनिवारचा दिवस होता आणि मी स्वतःला अक्षरशः घरातच कोंडून घेतलं होतं. माझा बॉयफ्रेंड त्याच्या कामाच्या निमित्ताने शहराबाहेर गेला होता आणि त्यामुळे तर मी जास्तच depressed होते. गेल्या काही महिन्यांपासून तो सतत आमच्या भविष्यात एकत्र राहण्याबाबतच्या गोष्टी करत होता. पण त्या गोष्टींचा काय फायदा जेव्हा तो माझ्या बर्थडेच्या दिवशीच माझ्यासोबत नव्हता. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा एक-एक करून फोन आला. सगळ्यांनी मला बाहेर जाऊन पार्टी करूया, थोडं एन्जॉय करूया असं म्हटलं. पण मी सगळ्यांना नको नको म्हटलं.

ADVERTISEMENT

मी पूर्ण दिवस टीव्ही बघत होते आणि जंक फूड खात होते. संध्याकाळी कसंतरी मी बेडवरून उठले आणि आळस झटकून आंघोळीला जाण्याचं ठरवलं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मला तर रागच आला की, आता या वेळेला नेमकं तडमडायला कोण आलंय. मी दरवाज्याच्या की-होलमधून बाहेर बघितलं तर माझा बॉयफ्रेंड उभा होता.

मराठीमध्ये बॉयफ्रेंडसाठी रोमँटिक मेसेजेसही वाचा

त्याला बघताच माझ्या खराब मूडचं रूपांतर अचानक आनंदी मूडमध्ये झालं. मी एकदम खूष झाले. आता साहजिक आहे ना कोणत्या मुलीला birthday च्या दिवशी तिच्या boyfriend ने दिलेलं surprise आवडणार नाही.

मी दरवाजा उघडला. “थांब, तू हा trench coat का घातला आहेस?” असं मी त्याला पाहून विचारलं. तो नोव्हेंबर महिना होता. “तू बरा आहेस ना? ताप तर नाही आला ना?”

ADVERTISEMENT

तो काहीच बोलला नाही. त्याने उत्तर म्हणून मला एक intense kiss केलं. त्याच्या एका किसनेच मी turn on झाले. आणि आता त्याच्यापासून दूर जाणं मला शक्यच नव्हतं. पण मी जवळ जाताच त्याने मला दूर केलं आणि म्हणाला की, “माझ्याकडे तुझ्यासाठी एक surprise आहे.” हे बोलताना त्याचं हसू इतकं naughty होतं की माझ्या मनात तर त्याला थेट बेडरूममध्ये घेऊन जाण्याचा विचार आला. 

त्यासाठी मला जास्त वाटही पाहावी लागली नाही. त्याने घातलेला कोट काढला आणि ते पाहताच मी आश्चर्यचकित झाले. त्याने हसत हसत मला “happy birthday” म्हटलं !

त्याने नेव्ही युनिफॉर्म घातला होता. पांढरा शर्ट, पांढरी पँट, काळे शूज. तसंच त्याच्या शर्टवर नेव्हीचे बॅजेसही लावलेले होते. मी त्याला एकटक पाहात राहिले. तो सोफ्यावर बसला होता आणि त्याने नेव्ही कॅपही घातली होती. आता त्याचा युनिफॉर्म complete झाला होता. मला हसताना पाहून त्याने मला naughty पणे पाहत मला salute केलं आणि मी फक्त गोड हसले. 

त्या क्षणी माझा पूर्ण कंट्रोल सुटला आणि अक्षरशः त्याच्यावर अटॅक केलं. मी त्याला सोफ्यावरच आडवं पाडलं आणि त्याला सारखं किस करू लागले. त्याचवेळी मी त्याच्या शर्टची बटणंही उघडत होते. “Stop, stop!” म्हणत तो हसू लागला आणि म्हणाला की, “मला वाटलं की, तू तर मला परेड करायला लावशील.”

ADVERTISEMENT

“नाही.. I don’t care,” असं मी म्हटलं आणि त्याला पुन्हा किस करू लागले. तेव्हाच मला कळून चुकलं की, युनिफॉर्मसाठी असलेलं माझं आकर्षण माझ्या बॉयफ्रेंडवरील प्रेमापुढे काहीच नव्हतं. तो ही माझ्या ड्रेसचा बेल्ट उघडून माझ्यासोबत interesting गोष्टी करू लागला आणि तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली.

बॉयफ्रेंडबरोबर खेळण्यासाठी गेलेल्या मद्यपान विषयी देखील वाचा

तो क्षण आला आणि …

Giphy

ADVERTISEMENT

नेमकं याच वेळेला कोणीतरी यायचं होतं का, इथे मी प्रेमात बुडाली आहे आणि हा व्यत्यय आलाय. मला माझ्या बॉयफ्रेंडला सांगायचं होतं की मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. पण तेही सांगायला मला वेळ मिळाला नाही. कदाचित ती वेळ योग्य नव्हती. पण दरवाज्याची बेल वाजतच राहिली. जो कोणी दरवाज्यावर होतं त्यांना अजिबात धीर नव्हता. ते वारंवार बेल वाजवत होते आणि मला राग येत होता. 

“Okay, okay,” असं मी आदीला म्हटलं…“तू बेडरुममध्ये जा. जे कोणी आहे त्यांना लगेच परत पाठवून मी बेडरूममध्ये येते.” मी त्याची बॅग त्याच्या हातात दिली आणि आत पाठवलं. मला असं वाटलं की, कदाचित एखादा सेल्समॅन असेल किंवा मोलकरीण असेल. 

दरवाज्याची बेल वाजतच राहिली. मी रागाने की-होलमधून चेकसुद्धा केलं नाही आणि सरळ दरवाजा उघडला. तिथेच मी मोठी चूक केली. दार उघडताच समोर होते आईबाबा. 

“Surprise!!” आईने ओरडतच म्हटलं. बाबांच्या चेहऱ्यावरही मोठ हास्य होतं. 

ADVERTISEMENT

“Oh, तू बाथरुममध्ये होतीस का?” आईने विचारलं. “मी विचारच करत होते की, तू दरवाजा उघडायला एवढा वेळ का लागला ते.”

मी त्यांना आत येण्यास सांगितलं आणि विचार करू लागले की, माझ्या बॉयफ्रेंडच काय करू. माझ्या आईबाबांना हे माहीत होतं की, माझ्या बॉयफ्रेंड आहे पण त्यापेक्षा जास्त काही माहीत नव्हतं. त्यांना हेही माहीत नव्हतं की, या रिलेशनशिपबाबत मी इतकी सीरियस आहे आणि युनिफॉर्मचं आकर्षण त्यांना कसं सांगू?? मी विचार केला की, आईबाबांना किचनमध्ये किंवा दुसऱ्या खोलीत बिझी करून त्याला घराबाहेर पाठवीन. 

पण ते होणं अशक्य होतं. कारण माझ्या बॉयफ्रेंडने बेडरूममध्ये जाताना त्याचं सगळं सामान त्याला नेता आलं नव्हतं. बाबांची नजर नेव्हीच्या कॅपवर पडली. 

“ही नेव्ही कॅप कुठून आली?” बाबांनी विचारलं. 

ADVERTISEMENT

Crap. माझ्या डोक्यात काही शिरलं नाही. मी काय बोलू काहीच कळत नव्हतं. मी स्वतःच स्वतःला बर्थडे गिफ्ट केली, असं सांगू. 

“Oh!” माझी आई चकित होऊन म्हणाली, “ही तुझ्या boyfriend ची आहे का? तो इकडे आलाय का?” Double crap.

“अरे वाह!” बाबाही म्हणाले “मला माहीतच नव्हतं की, तो नेव्हीमध्ये आहे, कुठे आहे तो?”

“बाथरुममध्ये,” मी हळूच म्हटलं. मी अक्षरशः ब्लँक झाले होते. 

ADVERTISEMENT

“Sweetie, त्याला बोलावं ना!” आईने म्हटलं “आम्ही तर कधीपासून त्याला भेटायच्या विचारात आहोत.”

मी बेडरुममध्ये गेले. माझा बॉयफ्रेंड पूर्णपणे घाबरला होता. त्याने आमचं पूर्ण बोलणं ऐकलं होतं. 

“यार, तू तर मोठ्या संकटात टाकलं आहेस.” तो म्हणाला “त्यांना वाटत आहे की, मी नेव्हीमध्ये आहे.”

“मला विचारू नकोस” मी थोड्या रागातच म्हटलं. “मी नव्हतं सांगितलं, तुला हे सगळं करायाला.”

ADVERTISEMENT

“पण मी आता त्यांना काय सांगू.”

“मला नाही माहिती, तू स्वतःच विचार कर,” मी जवळजवळ ओरडलेच.

“Sweetie, ये ना बाहेर” आईने हाक मारली. 

आम्ही दोघं बाहेर आलो… “आईबाबा… हा आदित्य.” मी म्हटलं. 

ADVERTISEMENT

“अरे वा तुला भेटून बरं वाटलं, बेटा” आई म्हणाली. आई असं म्हणणं साहजिक होतं कारण आदित्य दिसायला handsome होता. प्रत्येक मुलीच्या आईला वाटतं की, तिचा जावई दिसायला छान असावा. 

“मग तुझी रँक कोणती आहे?” बाबांनी विचारलं. 

मी प्रार्थना करत होते की, लवकरात लवकर माझी आणि आदिची यातून सुटका व्हावी. 

“Um, काका मी नेव्हीमध्ये नाहीयं,” आदिने सांगितलं. 

ADVERTISEMENT

जे व्हायचं तेच झालं…आईबाबा आश्चर्याने एकमेंकाकडे पाहू लागले. त्यांनी आदिच्या युनिफॉर्मवर एक नजर टाकली  आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. 

मी मनातल्या मनात विचार करू लागले की, माझ्या  30 व्या वाढदिवसाच्या दिवशी मला माझ्या आईबाबांना माझं uniform  आकर्षण आणि role-play चं concept समजवावं लागेल का? मी काहीतरी बोलणार होते पण थांबले. 

पण नशीब आदिला काहीतरी सुचलं. “Actually, काका-काकू, तुमची मुलगी मागच्या आठवड्यात खूपच बिझी होती. मग मी आणि मित्रांनी ठरवलं की, तिला सरप्राईज देऊ आणि फॅन्सी ड्रेस पार्टी करू. खरंतर मी एक फोटोग्राफर आहे.”

OMG. नशीब युनिफॉर्म खरा नसला तरी माझा बॉयफ्रेंड खरंच हिरो होता. 

ADVERTISEMENT

“Oh, okay…” आई म्हणाली. बाबा पण थोडे कूल झाले. ते म्हणाले की, आता आम्हालाही फॅन्सी ड्रेस घालावा लागेल का?”

हे ऐकताच माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. 

त्यानंतर आदिने माझ्या आईबाबांशी छान गप्पा मारल्या. मी सगळ्यांसाठी चहा केला आणि आम्ही चांगला वेळ स्पेंड केला. या दरम्यानच मित्रमैत्रिणींना मेसेज करून डीनर आणायला सांगितला आणि काहीतरी वेगळे costume घालून येण्यास सांगितलं. कारण नंतर सांगेन असंही सांगितलं. 

काही वेळाने माझे मित्रमैत्रिणी आले. सगळ्यांनी मैत्रीखातर वेगवेगळे कॉस्च्युम्सही घातले आणि आईबाबांसमोर काही विचारलंही नाही. पण नंतर मात्र आमची रामकहाणी ऐकून अनेक महिने आम्हा दोघांना चिडवत राहिले. 

ADVERTISEMENT

दोन दिवसांनी आईबाबा परत गेले. त्यांना आदि फारच आवडला आणि त्यांनी आम्हा दोघांना आशिर्वादही दिला. आता मी आदिला प्रपोज करणार आहे फक्त तेही एका चांगल्या costume मध्ये.

हेही वाचा –

#MyStory: Dating App च्या युगातली प्रेम कहाणी

#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….

ADVERTISEMENT

#MyStory… आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

18 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT