महिन्याभरात नैसर्गिकपद्धतीने करा Weight loss,होणार नाही Side effects

महिन्याभरात नैसर्गिकपद्धतीने करा Weight loss,होणार नाही Side effects

वजन कमी करण्याच्या विचारात तुम्ही अघोरी ‘डाएट’ करुन झाला असाल तर आता त्याला थोडा ब्रेक द्या. कारण इतरांना फॉलो करुन जर तुम्ही कोणता डाएट करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्यावर होईलच असे काही सांगता येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल. पण या वजन कमी करण्याचा कोणताही side effect तुम्हाला तुमच्या शरीरावर होऊ द्यायचा नसेल तर मग तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याची गरज आहे. असे केले तरच तुम्हाला त्याचा कोणताही त्रास होणार नाही.

सकाळी उठल्यानंतर

shutterstock

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल तर तुम्हाला ती सवय बंद करायची आहे. त्या ऐवजी कोमट पाण्यात लिंबू- मध घालून हे पाणी प्यायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला जर या वेळात कॉफी पिण्याची फारच तल्लफ लागली तर तुम्ही ब्लॅक कॉफी देखील पिऊ शकता. या कोणत्याही मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला साखर घालायची नाही. त्यामुळे आाता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या पोटात जर काही जायला हवे तर हेच. 

लिंबू-मधामुळे तुमच्या शरीरातील मेद कमी होते. कॉफीमधील कॅफेनमुळे तुमची अनावश्यक भूक मंदावते. 

अॅल्युमिनिअमच्या भांड्यात जेवण करताय?मग वाचाच

नाश्ता करा भरपेट

shutterstock

काहींना रिकामी पोटी घरातून बाहेर पडायला आवडते. पण तसे करु नका त्यापेक्षा तुम्ही काहीतरी खाऊन घराबाहेर पडा. जर तुम्ही अंडी खात असाल तर सकाळी दोन अंडी उकडून किंवा त्याचे आम्लेट करुन सोबत पोळी खाल्ली तर एकदम उत्तम. या शिवाय तुम्ही पोहे, उपमा, खिचडी खाऊ शकता. पण ते खाण्याचे देखील प्रमाण असू द्या. उपाशी पोटी तुम्ही जितके जास्त राहाल तितके तुमचे शरीर स्थूल होऊ शकते. त्यामुळे नाश्ता हा करायलाच हवा

वजन कमी करण्यासाठी योगासने देखील वाचा

परिपूर्ण जेवण

shutterstock

जर तुमचा नाश्ता चांहला भरपूर आणि वेळेवर होत असेल तर तुम्हाला 12 पर्यंत भूक लागणार नाही. पण किमान 1 च्या आत तुमचे दुपारचे जेवण व्हायलाच हवे.दुपारच्या जेवणात वरण, भात, भाजी,पोळी आणि भरपूर सॅलेड , कोशिंबीर असू द्या. जर तुम्ही चौक आहार घेतला तर तुम्हाला संध्याकाळी 4 पर्यंत भूक लागणार नाही. 

आहारात पनीर, चिकन, अंडी, पालेभाज्या यांच्या समावेश असू द्या.

वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर

खाऊचा आधार

shutterstock

अनेकांना ऑफिसमध्ये मध्येच काहीतरी खाण्याची सवय असते. दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला असेच काही खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही मस्तपैकी चणे शेंगदाणे किंवा एखाद्या फळाचा आधार घ्या.चमचमीत चटपटीत असे या वेळात खाणे शक्यतो टाळा. कारण चुकीच्या वेळी खाल्लेले अन्न पचण्यास फारच अडचणी येतात.

रात्रीचे असू द्या थोडे लाईट

shutterstock

तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तो तुम्ही रात्रीच्या जेवणात करायला हवा कारण काही जणांना दुपारी पूर्ण जेवणाचा आस्वाद घेता येत नाही म्हणून रात्री भरपेट जेवायची सवय असते. रात्रीच्यावेळी मग सगळे पदार्थ अगदी साग्रसंगीत खाल्ले जातात. ही चूक करु नका. कारण हेच तुमच्या वजनवाढीचे कारण आहे. रात्री जर तुम्हाला काही खायचे असेल तर 7 ते 8 या कालावधीतच तुम्ही ते खायला हवे. 

वजन कमी करण्याआधी या गोष्टी तुम्ही नक्की वाचा

व्यायाम तर हवाच

shutterstock

अनेक जण व्यायाम न करता वजन कमी करण्याचा दावा करतात. पण तसे कधीच शक्य नाही. तुमच्या शरीराला हालचाल ही हवीच. अगदी जीम नाही पण घरच्या घरी तुम्हाला योगासने आणि व्यायाम करायलाच हवा अगदी 5 मिनिटं का होईना अंगाला व्यायामाची सवय आतापासूनच लावून घ्या. तुम्हाला व्यायामाची गोडी लागली की, तुम्ही आपोआपच व्यायाम करायला सुरु कराल.


जर तुम्ही या गोष्टींचा विचार करुन आहारात आणि एकूणच जीवनशैलीत बदल केले तर तुमचे अनावश्यक वाढलेले वजन नक्कीच कमी होतील कोणतेही side effects न होता.

You Might Like This:

वजन कमी करण्यासाठी डान्स वर्कआऊट (Dance Workout For Weight Loss

डाएटची सुरुवात केल्यानंतर आणि वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन

वजन कमी करण्यासाठी योगासने

किटो डाएटचे दुष्परिणाम