नीता अंबानीच्या या बॅगला जडलेत 240 हिरे, किंमत कोटींच्या घरात

नीता अंबानीच्या या बॅगला जडलेत 240 हिरे, किंमत कोटींच्या घरात

नीता अंबानी या नेहमीच त्यांच्या स्टाईलिश लुकसाठी ओळखल्या जातात. भारतातील श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या अंबानींसाठी महाग ते काय म्हणा. आता नीता अंबानी यांची ही नवीन बॅगच पाहा ना! सध्या या बॅगची सर्वदूर चर्चा होत आहे. लहानशी ही हँडबँग चक्क 240 हिऱ्यांनी जडलेली आहे. त्यामुळे साहजिकच या बॅगची किंमत कित्येक कोटी रुपये आहे. सध्या ही बॅग आणि बॅगची किंमत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

नीता अंबानींच्या बॅगची वैशिष्टये

Instagram

आता अंबानी यांची बॅग म्हणजे खास असणारच नाही का? मिळालेल्या माहितीनुसार नीता अंबानी यांची ही बॅग Hermès Himalaya Birkin Bag यांची आहे. या बॅगवर 240 हिरे जडवण्यात आले असून या बॅगसाठी वापरलेले कापड म्हणजे खऱ्याखुऱ्या मगरीची त्वचा आहे. अर्थात त्यामुळेच या बॅगची किंमत सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. आता तुम्हाला या बॅगच्या किंमतीची उत्सुकता असेल तर ही बॅग चक्क 2 कोटी 6 लाख इतकी आहे.

सूनमुख पाहून नीता अंबानी यांनी दिले सूनेला हे महागडे गिफ्ट

का झाली बॅग व्हायरल?

Instagram

सेलिब्रिटींकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं. करिश्मा कपूर लंडनला असताना तिने तिचा एक फोटो शेअर केला. हा फोटो थोडा जुना असला तरी त्यामध्ये अंबानी यांची बॅग लक्ष वेधून घेणारी आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटीझन्सनी त्यांची बॅग निरखून पाहिली आणि अंबानीच्या या बॅगचा फोटो चांगलाच व्हायरल केला. त्यामुळे या बॅगमध्ये इतकं काय विशेष हे पाहण्याचा आमचाही मोह आवरला नाही.

नीता अंबानीचे सबकुछ खास

Instagram

नीता अंबानी यांचे नेहमीच सगळे खास असते. त्यांच्या सगळ्याच गोष्टी नेहमी वेगळ्या आणि हटके असतात. त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटचे अनेक चाहते आहे. त्यांना ज्वेलरी, अॅसेसरीजची विशेष आवड असल्याचे दिसून येते. त्या कोणत्याही इव्हेंटला अगदी वेगळ्याच दिसतात. पार्टी असो की मिटींग त्यांची स्टाईल एकदम हटके असते.

आकाश-श्लोकाचं स्वप्नवत घर समोर आला फर्स्ट लुक

बडे लोक बडी बडी बाते

Instagram

नुकताच नीता अंबानीचा मुलगा आकाश आणि ईशा यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. या दिमाखदार सोहळा सगळ्यांनीच पाहिला असेल. या लग्नसोहळ्यातील नीता अंबानी यांचा लेहंगा आणि ब्लाऊजची देखील जोरदार चर्चा झाली. आकाश आणि ईशाच्या कपड्यांपेक्षाही अधिक चर्चा ही नीता अंबानी यांची होती. त्यामुळे नीता अंबानी यांचा अंदाजच वेगळा आहे. असे म्हणायला हवे.

आकाशच्या लग्नातला नीता अंबानीचा लेहंगा होता खास.. रेशीम कामामुळे लेहंग्याला आला वेगळा लुक

अनंत अंबानी अडकणार लग्नाच्या बेडीत

Instagram

आताच्या आता अंबानी कुटुंबात दोन लग्न पार पडली. आकाश आणि ईशा ही नीता- मुकेशची जुळी मुले. आधी ईशा हिचे लग्न आनंद पिरामल याच्याशी झाले. त्यानंतर आकाश अंबानी श्लोका मेहता सोबत विवाहबंधनात अडकला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता नीता अंबानी यांचा धाकटा मुलगाही विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत लग्न करणार असून त्यांचे काही फोटोदेखील या आधी व्हायरल झाले आहेत. ईशा आणि आकाशच्या लग्नातही राधिका दिसली होती. त्यामुळे आता अंबानी कुटुंबात आणखी एक सून लवकरच येणार आहे. या लग्नाचा थाट कसा असणार ? किती कोटींचा खर्च अंबानी कुटुंब करणार ते पाहावे लागेल.