पावसाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त त्रास होतो तो डासांचा. मस्तपैकी पाऊस एन्जॉय करायला गॅलरीत किंवा गार्डनमध्ये बसावं म्हटलं तर लगेच डास चावू लागतात. त्यामुळे सगळी मजाच निघून जाते. एकतर डास चावला की, खाज उठते. त्यातच भर म्हणून की काय मलेरियासारखा आजारही होऊ शकतो. डासांपासून सुटका करण्यासाठी अनेकजण मॉस्किटो रिप्लंट क्रीम आणि हर्बल मॉस्किटो लोशनचा वापर करतात. पण काही जणांना या वासाची किंवा क्रिमची एलर्जी असू शकतो. त्यामुळे डास चावल्याने नाक, त्वचा आणि गळ्यांशी संबधित समस्या उद्भवू शकतात. काहीजण तर डासांपासून सुटकेसाठी केमिकल्सचाही वापर करतात. पण हे आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी नुकसानदायक आहे.
जर तुम्हाला नैसर्गिकरित्या डासांपासून सुटका हवी असेल तर तुमच्या घरच्या बागेत लावा मॉस्किटो रिप्लंट प्लांट्स. या मॉस्किटो रिप्लंट झाडांमुळे ना फक्त डासांपासून सुटका मिळेल तर तुमच्या बागेचीही सुंदरता वाढेल. तसंच घरातील हवाही स्वच्छ राहील आणि तुमच्या खोल्या, गार्डन आणि बाल्कनीही सुगंधी राहील. चला जाणून घेऊया कोणती आहेत ही झाडं.
लेमन ग्रासचा सुवास सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे अनेक मॉस्किटो रिप्लंट्समध्ये याचा वापर केला जातो. जिथे एकीकडे आपल्याला याचा ताजा सुगंध चहा आणि हर्बल टीमध्ये आवडतो तर डासांना हाच वास नकोसा वाटतो.
झेंडूची फुल तुमच्या बाल्कनी आणि खिडकीचं सौंदर्य नक्कीच वाढवतील. पण याचा झेंडूच्या झाडाचा वास डासांना आणि इतर उडणाऱ्या किटकांना आवडत नाही.
लवेंडरचा सुवासामुळे तुम्हाला खोलीत आल्या आल्या अगदी स्वर्गसुखाचा अनुभव येईल. पण हाच सुवास डासांना मात्र तुमच्या घरापासून दूर घेऊन जाईल. त्वचेवर लावण्यासाठी मिळणाऱ्या मॉस्किटो रिप्लंट्समध्ये नेहमीच लवेंडर ऑईलचा वापर केला जातो. घर सुवासित ठेवण्यासाठी आणि डासांपासून बचावासाठी नक्की लावा लवेंडरचं झाड.
गावाकडे आजी नेहमी सांगायची की, लसूण खाल्ल्याने तुमच्या रक्ताला एक वेगळा वास येतो. जो डासांना आवडत नाही. यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच की, डासांना लसूणचं झाडंही नक्कीच आवडणार नाही.
तुम्ही कधी विचार केला आहे का की, पूर्वी प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन का असायचं. कारण तुळस आपल्या घराच्या आसपासची हवा स्वच्छ तर करतेच शिवाय छोटे छोटे किटक आणि डासही आपल्या घरापासून दूर ठेवते. खरंतर आजही प्रत्येकाच्या घरी तुळसही असतेच. जर तुमच्याकडे तुळशीचं झाड नसेल तर आजच लावा.
कडूलिंबाचं झाड हे एक उत्तम मॉस्किटो रिप्लंट आहे. या झाडात किटक आणि डासांना दूर ठेवण्यासाठी अनेक तत्त्वं आहेत. त्यामुळेच बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक मॉस्किटो रिप्लंट्स आणि बाममध्ये कडूलिंब फ्लेवर असतो. डासांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता.
लेमन बाम हे झाडंही डासांना घरापासून दूर ठेवण्यात उपयोगी ठरतं. लेमन बाम हे झाडं वेगाने वाढतं. या झाडाच्या पानात सिट्रोनेलाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे अनेक कमर्शियल मॉस्किटो रिप्लंट्समध्ये याचा वापर केला जातो. लेमन बाममध्ये 38 टक्के सिट्रोनेला असतं. त्यामुळे डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी हे झाड नक्की लावा.